pune rain update rainfall in pune today monsoon weather bridge under water dam water level Sakal
पुणे

Pune Rain News : पावसाचा दणका स्मशानभूमीत पाणी, तर पादचारी भुयारी मार्ग बुडाला

पुण्याला आज दुपारपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली याचा तडाखा नागरिकांना बसला.

सकाळ वृत्तसेवा

पुणे/कर्वेरस्ता : पुण्याला आज दुपारपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली याचा तडाखा नागरिकांना बसला. शहरात रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी तुंबले कर्वेनगर येथील स्मशानभूमीत पाणी घुसले, तर डहाणूकर कॉलनी येथील पादचारी मार्गामध्ये पाणी शिरलाने भुयारी मार्ग बुडाला होता.

शहरातकर्वेनगर, वारजे, सिंहगड रस्ता, धनकवडी, बिबवेवाडी, आंबेगाव, कात्रज, नगर रस्ता, वडगीव शेरी या परिसराला शनिवारी दुपारी झालेल्या पावसाने झोडपले. महापालिकेने पावसाळी गटारांच्या चेंबरच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्याने जाळ्यांवर मोठ्या प्रमाणात यापूर्वीच कचरा अडकलेला होता. हा कचरा न काढल्याने जोरदार पावसाला सुरुवात होताच वाहनारे पाणी पावसाळी गटारात न जाता चेंबरच्या वरून रस्त्यावरूनच वाहू लागले. त्याचा फटका वाहनचालकांना बसला.

रस्त्यावरून एक ते दोन फूट पाणी वाहत असल्याने गाडी चालवताना तारांबळ उडत होती आणि त्यांच्या गाडीमध्ये पाणी गेल्याने बंद पडल्या. कर्वेनगर येथील स्मशानभूमी पाण्याखाली गेली, या परिसरातील पाणी काढण्याचे काम वारजे-कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाकडून सुरू करण्यात आले.

कर्वे रस्ता येथे डहाणूकर कॉलनी चौकातील भुयारी मार्गात पावसाचे पाणी शिरले त्यामुळे संपूर्ण भुयारी मार्ग पाहण्याखाली गेला या निमित्ताने महापालिकेच्या ढसाळ कारभाराचा नमुना सर्वांपुढे आला. पादचारी भुयारी मार्ग रस्त्याला समांतर असल्याने हे पाणी थेट व्यायामार्गामध्ये आले यापूर्वीही अनेकदा या भुयारी मार्गात पाणी शिरले होते तरी देखील महापालिका प्रशासनाने या सुधारणा केलेली नाही.

सिंहगड रस्त्यावर सलग दुसऱ्या दिवशी धायरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर पु.ल.देशपांडे उद्याना समोरील महावितरण कार्यालय, इनामदार चौक, हिंगणे चौक तसेच, संतोष हाल ये थे पाणी साचले होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली.

दरम्यान, हवामान विभागाने मोठ्या पावसाची शक्यता वर्तवल्यानंतर महापालिकेने सर्व ठिकाणी मदत कार्यासाठी पथके तैनात केली आहेत. आज पाणी तुंबल्यानंतर पाण्याचा निचरा करण्यासाठी कर्मचारी कामास लागले आहेत. असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Result 2024: एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांचं काय झालं? महाराष्ट्राचा कल काय सांगतोय? जाणून घ्या

Maharashtra Assembly Results: लाडकी बहीण पावली! महायुतीला 'एक हे तो सेफ हे'ची जोड अन् झटक्यातच मविआचा हिरमोड

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: पुन्हा निवडणुका घ्या, हा जनमताचा कौल नाही - संजय राऊत

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

SCROLL FOR NEXT