Pune rain update esakal
पुणे

Pune Rain Update: पुण्यात पावसाची दाणादाण! घरं सोडून शाळेत थाटला संसार... पाटील इस्टेटमधील नागरिकांची वणवण

समाधान काटे

पुणे, २५ जुलै: शिवाजीनगर परिसरातील पाटील इस्टेटमध्ये मुळा आणि मुठा नदीचे पाणी गुरवार मध्यरात्रीपासून वाढल्यामुळे जवळपास चारशे नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. पाटील इस्टेटमध्ये सुमारे दहा ते बारा हजार नागरिक राहतात. या परिसरातील नागरिकांना मुळा आणि मुठा नदीच्या संगमाजवळील जलप्रवाहामुळे दरवर्षी पुराचा धोका असतो. यंदाही परिस्थिती बिकट झाल्यामुळे तीनशेहून अधिक घरे पाण्याखाली गेली आहेत.

नागरिकांची शाळांमध्ये व्यवस्था

पुराच्या पाण्यामुळे विस्थापित झालेल्या पाटील इस्टेटमधील नागरिकांना महापालिकेच्या शाळांमध्ये हलवण्यात आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळा (पीएमसी कॉलनी), न.ता वाडी शाळा क्र ४७, मेजर राणे शाळा (संगमवाडी), खशाबा जाधव शाळा (वाकडेवाडी) आणि आपटे प्रशाला (पुलाचीवाडी) येथे त्यांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती शिवाजीनगर घोले रस्ता सहायक आयुक्त रवि खंदारे यांनी दिली.

प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे नागरिकांची तारांबळ

रात्री पाटील इस्टेटमध्ये पाणी शिरल्यानंतर नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी महापालिकेच्या शाळांमध्ये व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, जोराचा पाऊस आणि गोधळलेल्या प्रशासकीय कारभारामुळे संबंधित शाळेच्या चाव्या नागरिकांना वेळेवर मिळू शकल्या नाहीत. त्यामुळे सामाजिक कार्यकर्त्यांनी तात्पुरती सोय एका मंदीरामध्ये केली होती. रात्री पावसात नागरिकांना महापालिकेच्या शाळेत जाण्यासाठी बस उपलब्ध नव्हत्या. ज्या नागरिकांना रिक्षा मिळाल्या त्यांनी रिक्षामध्ये तर काही नागरिक पावसात भिजत शाळेत पोहोचले.

स्थानिक रहिवासींचा अनुभव-

स्थानिक रहिवासी अविनाश जाधव म्हणाले, "पाटील इस्टेट येथील नागरिकांना आम्ही सुरक्षित स्थळी घेऊन जात असताना महापालिकेच्या बस उपलब्ध नव्हत्या. रिक्षावाल्यांची मदत घेऊन नागरिकांना शाळेत पाठवले. शाळेमध्ये चाव्या लवकर मिळाल्या नाहीत. त्या ठिकाणी पाणी, स्वच्छतागृह, अंथरूण, पांघरूण काही नव्हते. सकाळी चहा व जेवणाची सोय सामाजिक कार्यकर्त्यांनी केली."

पुराच्या पाण्यामुळे झालेल्या नुकसानीमुळे पाटील इस्टेटमधील नागरिकांचे जीवन उध्वस्त झाले आहे. प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून परिस्थिती नियंत्रणात आणावी, अशी नागरिकांची मागणी आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT