Pune Flood sakal
पुणे

Pune Rain Update : पाणी सोडले; संसार बुडाले

सकाळ वृत्तसेवा

पुण्यात मंगळवारपासून सुरू झालेला संततधार पाऊस बुधवारची रात्र आणि गुरुवारीही कोसळत राहिला. धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाचा जोर वाढल्याने धरणांतून विसर्ग करण्यात आला. त्यामुळे मुळा-मुठा नद्यांची पातळी झपाट्याने वाढली.

नद्यांची वाढती पाणी पातळी, खळाळून वाहणारे नाले-ओढे आणि तुंबलेले रस्ते यामुळे नागरिकांचे अपरिमित हाल झाले. कित्येक घरांमध्ये पाणी शिरले आणि संसार बुडाले. हजारो पुणेकरांनी बुधवार, गुरुवारची रात्र अक्षरशः पावसाच्या दहशतीत काढली.

माझे घर तळमजल्यावर असल्याने दोन्ही खोल्या पूर्णपणे पाण्यात बुडाल्या. टीव्ही, फ्रिज, सोफा, पलंग, कपडे यासह सर्व साहित्य पाण्यात भिजले. घरात सर्वत्र गाळ जमा झाला आहे. माझा सगळा संसार उद्‍ध्वस्त झाला आहे,’ अशी संतप्त भावना एकतानगरमधील भीमा गायकवाड यांनी व्यक्त केली.

जीव वाचविण्यासाठी घर सोडले

रात्रभर पडणाऱ्या धो-धो पावसामुळे पुणेकरांची दाणादाण उडाली. जनजीवन विस्कळित झाले. खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील वाढलेल्या पावसामुळे धरणातून मध्यरात्री पाण्याचा विसर्ग टप्प्याटप्प्याने वाढविण्यात आल्याने मुठा नदीने दुथडी भरून वाहू लागली. महापालिकेकडून सतर्कतेचा इशारा देण्यास विलंब केला. तोपर्यंत नदीकाठच्या वस्तीत, सोसायट्यांमध्ये पाणी शिरण्यास सुरुवात झाली होती.

घरातील सामान, महागड्या वस्तू आहेत, तशा सोडून जीव वाचविण्यासाठी नागरिकांना पहाटे घरातून बाहेर पडावे लागले. याचा सर्वाधिक फटका सिंहगड रस्त्यावरील अनेक सोसायट्यांना बसला. वारजे, रजपूत वस्ती, पुलाची वाडी, पाटील इस्टेट, नारायण पेठ, बाणेर, बालेवाडी, बावधन या भागातील नागरिकांना मोठा फटका बसला आहे.

शहरातील सर्वच रस्‍त्यांना नद्यांचे स्वरूप आले होते. त्यात परत रस्त्यांना खड्डे पडले असल्याने व पाण्यामुळे त्यांचा अंदाज येत नसल्याने वाहनचालकांची चांगलीच तारांबळ उडाली. पुण्यात गेल्या तीन चार दिवसांपासून पावसाच्या सरी बसरत आहेत. पण बुधवारी रात्रभर मुसळधार पावसाने पुणे शहरासह घाटमाथ्यावर झोडपून काढले. पावसाचा जोर वाढत असल्याने खडकवासला धरणातून टप्प्याटप्‍प्याने पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला.

अन् सकाळी उडाला हाहाकार

रात्री धरणातून विसर्ग वाढविण्यात आल्याने सिंहगड रस्त्यावरील एकता नगरी भागातील नदीकाठच्या सोसायट्यांमध्ये पाणी शिरण्यास सुरुवात झाली. साडेचारच्या सुमारास अग्निशामक दलाच्या जवानांनी भोग्यांवरून नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आवाहन केले. धास्तावलेल्या नागरिकांनी घरे रिकामी केली. घराला कुलूप लावून ते पाहुण्यांकडे गेले, तर काही जणांनी सोसायटीतच वरच्या मजल्यावरील शेजाऱ्यांकडे आसरा घेतला. सकाळी सहा वाजता ३५ हजार ५७४ क्युसेस पाणी नदीत सोडल्यानंतर मात्र हाहाकार उडला.

रमाबाई आंबेडकर वसाहत

  • ताडीवाला रस्ता वसाहतीमधील स्विपर चाळ, शूरवीर तरुण मंडळ, विश्‍वदीप तरुण मंडळ, भीम संघटना, राजरत्न बुद्ध विहार, काची वस्ती, भैय्यावाडी येथील घरांना पुराचा फटका

  • पहाटे सहाच्या सुमारास घरांमध्ये पाणी येण्यास सुरुवात झाली. त्यानंतर नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली.

  • पाणी हळूहळू वाढू लागल्याने झोपेत असणाऱ्या मुलांना, ज्येष्ठ नागरिकांना घेऊन बहुतांश नागरिक बाहेर पडले.

  • २०० ते २५० घरांना पुराच्या पाण्याचा फटका बसला.

झोपडपट्टीमध्ये हाल

  • पाटील इस्टेट झोपडपट्टीतील ७,८,९, १० या गल्ल्यांमधील घरांना पुराच्या पाण्याचा सर्वाधिक फटका बसला. १ ते ६ क्रमांकाच्या घरांमध्येही पाणी शिरले.

  • मुळा नदीच्या सीमाभिंतीवरून पाणी झोपड्यांवर पडू लागले. पाण्याच्या पातळीत वाढ होऊ लागल्याने नागरिकांनी घरे सोडण्यास सुरुवात केली.

  • पोलिस, महापालिका, अग्निशामक दलाची यंत्रणा पोहचण्यापूर्वीच नागरिक, कार्यकर्त्यांनी लोकांना सुरक्षित स्थळी पोहचविले.

खडकवासला धरण

खडकवासला धरणातून बुधवारी रात्री एक वाजता १६ हजार क्युसेक पाणी नदीत सोडण्यात आले. पाणी सोडण्याचा वेग रात्रभर वाढतच गेला. गुरुवारी सकाळी सहा वाजता ३५ हजार क्युसेकने पाणी सोडण्यास सुरुवात झाली आणि नदीकाठच्या उपनगरातील नागरिकांची दाणादाण उडाली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: कोणते 'पवार' जिंकणार? महाराष्ट्र पाहणार आणखी एका काका पुतण्याची लढाई? जाणून घ्या बारामतीची परिस्थिती

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Shubh Muhurat For Shopping 2024: घर किंवा दुकान खरेदी करण्यापूर्वी 'या' गोष्टी ठेवा लक्षात, वाचा एका क्लिकवर खरेदीचा शुभ मुहूर्त

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

SCROLL FOR NEXT