पुणे : रेमडेसिव्हिर इंजेक्शन मिळावं यासाठी कोविड रुग्णांच्या नातेवाईकांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केलं. Source by ANI
पुणे

पुणे : रेमडेसिव्हिरसाठी रुग्णांच्या नातेवाईकांचा जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ठिय्या

रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा पुण्यात मोठा तुटवडा निर्माण झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

पुणे : रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा पुण्यात मोठा तुटवडा निर्माण झाला असून रुग्णांचे नातेवाईक अक्षरशः हतबल झाले आहेत. शासनानं कोविड रुग्णांसाठी हे इंजेक्शन उपलब्ध व्हावं आणि त्याचा काळाबाजार थांबावा यासाठी कन्ट्रोल रुमची स्थापनाही केली. मात्र, तरीही रुग्णांची परवड थांबलेली नाही. शेवटी वैतागून रुग्णांच्या नातेवाईकांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ठिय्या मांडला आणि शासनाकडे लवकरात लवकर रेमडेसिव्हिरचा पुरवठा करण्याची मागणी केली.

जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलनासाठी बसलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांनी माध्यमांसमोर आपलं गाऱ्हाणं मांडलं आणि आपल्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवण्याची मागणी केली. दरम्यान, इथं आंदोलनासाठी बसलेली एक महिला म्हणाली, माझे वडील गेल्या ६ दिवसांपासून रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांचे औषधांचे डोस अद्याप पूर्ण झालेले नाहीत. त्यांना सध्या आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं आहे. मी राज्यातील सर्व प्रमुख शहरांमध्ये या इंजेक्शनबाबत विचारणा केली मात्र मला कुठेही ते उपलब्ध झालं नाही.

या महिलेप्रमाणेच इतर आंदोलक नातेवाईंचीही सारखीच परिस्थिती होती. अनेकांनी मोठी धावाधाव आणि प्रयत्न करुनही त्यांना रेमडेसिव्हिर इंजेक्शन उपलब्ध होऊ शकलं नाही. शासनानंच या इंजेक्शनचा सध्या तुटवडा निर्माण झाल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे या लोकांनी आता थेट सरकारसमोरच येऊन आपल्या मागण्या मांडल्या आहेत.

दरम्यान, पुणे-मुंबईसह राज्यातील प्रमुख शहरांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर कोरोनाच्या संसर्गात वाढ झाली आहे. यापार्श्वभूमीवर कोविड-१९ आजारावर प्रभावी ठरलेल्या रेमडेसिव्हिर इंजेक्शनच्या मागणीतही अचानक वाढ झाली असून त्यामुळे याचा तुटवडा निर्माण झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

SA vs IND: 23 Six, 17 Fours! जोहान्सबर्गच्या मैदानात सॅमसन-तिलकचं वादळ; भारताचं द. आफ्रिकेला तब्बल 284 धावांचं लक्ष्य

SA vs IND: संजू सॅमसनने तिसऱ्या शतकासह रचला इतिहास! तिलक वर्मानेही ठोकली सलग दुसरी Century

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

Dhruv Rathee: ध्रुव राठीचं चॅलेंज आदित्य ठाकरेंनी स्वीकारलं! ‘मिशन स्वराज’साठी शेअर केली मुद्द्यांची यादी

SCROLL FOR NEXT