mulashi 
पुणे

पुणेकरांना ताम्हिणी घाट, अंधारबन खुणावतोय, पण...

मकरंद ढमाले

माले (पुणे) : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर वर्षाविहारासाठी पुणे जिल्ह्यातील धरणांचा परिसर जिल्हाधिकाऱ्यांनी 
पर्यटकांसाठी बंद केला आहे. त्यामुळे पुणेकरांना पावसाळ्यातील आवडते डेस्टीनेशन असलेले ताम्हिणी घाट, मुळशी धरण, अंधारबन, लवासा या परिसरात जाता येणार नाही. तसेच, परिसरातील रोजगार प्रामुख्याने वर्षाविहाराच्या पर्यटनावर अवलंबून असतो. गेल्या वर्षी रस्त्याच्या दुरवस्थेमुळे पर्यटकांनी या भागाकडे पाठ फिरवली, तर यंदा वर्षाविहारास बंदी आहे. त्यामुळे सलग दुसऱ्या वर्षी पर्यटन व हॉटेल व्यावसायिकांना फटका बसणार आहे.

पुण्यातील सुमारे 400 लहानग्यांची कोरोनावर मात
 
मुळशी तालुक्‍यामध्ये पावसाचे प्रमाण जास्त आहे. पावसाळ्यात निसर्गाची मुक्‍त हस्ते उधळण दिसून येते. त्यामुळे तालुक्‍यात वर्षाविहारासाठी पर्यटक मोठ्या संख्येने येतात. मुळशी धरणाचा परिसर, ताम्हिणी घाट, पळसे धबधबा परिसरात अनेकांनी चहा, मका कणीस, वडापाव, हॉटेल आणि लॉजिंग आदी व्यवसाय थाटले आहेत. पावसाळ्याचे चार महिने हा पर्यटनाचा हंगाम असतो. या हंगामात व्यावसायिकांची मुख्य कमाई होते. पाऊस थांबला की व्यवसाय कमी होतो. उन्हाळ्यात तुरळक ग्राहक असतात. अशा वेळी कर्मचारी, आचारी, स्टाफ आदींना व्यावसायिकांना सांभाळावे लागते. 

मुळशी तालुक्‍यात पुणे- कोलाड रस्त्याच्या कॉंक्रिटीकरणाचे काम संथगतीने सुरू आहे. मागील वर्षी खड्डे, अर्धवट कामांमुळे रस्त्यांची दुरवस्था झाली होती. सोशल मीडियावर या रस्त्यांचे व्हिडिओ व्हायरल झाल्याने पर्यटक, प्रवाशांनी मुळशीत येण्याचे टाळले होते. यामुळे पर्यटनाचा हंगाम वाया गेला व स्थानिकांचा रोजगार बुडला होता. 

यंदाचा हंगाम चांगला जाईल, या आशेवर पर्यटन व्यावसायिक होते. परंतु, कोरोनामुळे धरण, किल्ले आणि घाटांचा परिसर पर्यटनासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे पर्यटन व्यावसायिकांना सलग दुसऱ्या वर्षी मोठा फटका बसणार असल्याचे हॉटेल व्यावसायिक अमोल गांधी, दीपक मरगळे, विजय पासलकर यांनी सांगितले.

मद्यपी व हुल्लडबाजीही कारणीभूत 
वर्षाविहाराच्या नावाखाली मद्यपान, गोंधळ, हुल्लडबाजी करून धरणांच्या पाण्यात बुडून अनेक पर्यटकांचे मृत्यू होतात. पावसाळ्यात धरणांतील पाणीसाठ्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी अचानक विसर्ग वाढवावा लागतो. अनेक जण त्यात उतरल्याने वाहून जातात, असेही कारण जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात स्पष्ट केले आहे. 

जीवितहानीचे प्रकार टाळण्यासाठी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर मुळशी तालुक्‍यातील धरण परिसर, ताम्हिणी घाट, टेमघर धरण, हाडशी डॅम व इतर सर्व जलसाठ्यांचे परिसर पर्यटकांसाठी बंद राहतील. हे प्रतिबंध पर्यटकांची जीवितहानी टाळणे, या कारणांसाठी आहे. 
 - अभय चव्हाण, तहसीलदार, मुळशी 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: छत्रपती संभाजीनगरमध्ये मतमोजणीसाठी भाजपचे प्रतिनिधी मतमोजणी केंद्रावर दाखल

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुंबईत नक्की कोण मारणार बाजी? वाचा एका क्लिकवर

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT