पुणे : रस्ते व पुलांवरून पावसामुळे वाहणारे पाणी... काही ठिकाणी रस्त्यांवर साचलेल्या पाण्यामुळे वाहन चालविताना अडचण... जागोजागी वाहतुककोंडी... त्यामुळे विविध कामांसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांची गैरसोय, असे काहीसे चित्र शुक्रवारी (ता. २३) पुण्यात पाहायला मिळाले. सकाळपासूनच जोर धरलेल्या पावसाने शहरात चांगलाच धुमाकूळ घातला. शहरासह उपनगरात पावसाने जोरदार हजेरी लावत पुणेकरांना हैरान करून सोडले होते. दरम्यान पुढील दोन दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
गेल्या काही दिवसांपासून शहरात पावसाचा जोर वाढत आहे. जुलै महिना निम्मा उलटून गेला तरी पावसाच्या प्रतिक्षेत असलेल्या पुणेकरांना मात्र पावसाने दमदार ‘कम बॅक’ केल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. हवामान विभागाने पुणे जिल्ह्याला शुक्रवारी मुसळधार पावसाचा इशारा दिला होता. तसेच पुढील दोन दिवस अशीच काहीशी स्थिती असेल. त्यामुळे पुढील दोन दिवस पुण्यात पावसाचा चांगलाच मुक्काम राहणार आहे.
शुक्रवारी झालेल्या दमदार पावसामुळे शहरासह उपनगरांमधील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते. तर संततधार पाऊस कायम होता. तर काही ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्या. तर अद्याप शहरातील विविध भागांमध्ये रस्त्याचे खोदकाम सुरू आहे. त्यामुळे पावसाच्या जोरदार सरी पडत असताना नागरिकांना रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण झाल्या. तर नदी किनाऱ्यावर राहणाऱ्या रहिवाशांमध्ये पुराची धास्ती निर्माण झाली.
जिल्ह्यातील घाट विभागात मुसळधार पावसामुळे धुके, दरड कोसळण्याची घटना घडल्या. भोर, ताम्हिणी, जुन्नर, भिमाशंकर सारख्या परिसरात मुसळधार पावसामुळे दरड कोसळण्याच्या घटना घडल्या.
पुण्यातील धरण क्षेत्रातील परिसरातही पावसाने चांगलाच जोर धरला आहे. शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये पवना येथे २२७ मिलिमीटर (मिमी), वरसगाव १७० मिमी, वडिवळे २१४ मिमी, पानशेत १७० मिमी, मुळशी १७१ मिमी, टेमघर २७० मिमी, कासारसाई २४४ मिमी आदी धरण क्षेत्रात पावसाची नोंद झाली.
वारजे, माळवाडी, गोखले इन्स्टिट्यूट परिसर, संगमवाडी पूल, फुलेनगर, फर्ग्युसन रस्ता आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साठल्याने त्यातून मार्ग काढताना वाहन चालकांना कसरत करावी लागली
संततधार पावसामुळे रस्त्यावर सातत्याने साचत असलेल्या पावसामुळे होणाऱ्या नुकसानाची दुकानदारांना भीती
खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्यामुळे मुठा नदीच्या पातळीत वाढ
नदीच्या पाण्यासह वाहून आलेली जलपर्णी भिडे पूलावर अडकली त्यामुळे वाहतूक बंद
शहरातील विविध भागांमध्ये वाहतुककोंडी तसेच झाडपडीच्या घटना
विमानतळ रस्ता येथे जलवाहिनीसाठी रस्त्याचे खोदकाम सुरु असल्यामुळे रस्त्यावर वाहनचालकांना अडचणी
नदी परिसरातील नागरिकांना पुराची धास्ती
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.