Gun sakal
पुणे

पुणे : जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत शस्त्र बाळगण्याबाबत निर्बंध

पुणे जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता सुरू आहे. या निवडणुकीत १८ सप्टेंबरला मतदान आणि १९ सप्टेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता सुरू आहे. या निवडणुकीत १८ सप्टेंबरला मतदान आणि १९ सप्टेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

पुणे - जिल्ह्यातील ६१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या कालावधीत ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रात शस्त्र बाळगण्याबाबत जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी निर्बंध लागू केले आहेत. निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी तसेच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये, यासाठी २२ सप्टेंबरर्पंत हे निर्बंध राहणार आहेत.

जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता सुरू आहे. या निवडणुकीत १८ सप्टेंबरला मतदान आणि १९ सप्टेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. तर, अंतिम निकाल २२ सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात येणार आहे.

शस्त्रे जवळ बाळगण्यास मनाई

या कालावधीत नागरिकांना परवानाप्राप्त शस्त्रे, हत्यारे, दारुगोळा बाळगण्यास मनाई करण्यात आली आहे. या आदेशातून बंदोबस्तासाठी असणारे अधिकारी, कर्मचारी तसेच बँकांसह इतर सुरक्षा कर्मचाऱ्यांना वगळण्यात आले आहे. बँका अथवा सार्वजनिक संस्था यांच्यावर निवडणूक कालावधीत हत्यारांचा गैरवापर होणार नाही याची जबाबदारी राहील.

मतदान व मतमोजणी केंद्राच्या परिघापासून १०० मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. त्या दिवशी या परिसरातील टपऱ्या, स्टॉल, दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भारतीय दंड विधान कायदा कलम १८८ अन्वये शिक्षेस पात्र राहील, असे जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी आदेशात नमूद केले आहे.

जामिनावर सोडलेल्या, दंग्यामध्ये गोवलेल्या व्यक्तींकडून आणि राजकीय हितसंबंधातून शस्त्रांचा गैरवापर होऊ शकतो. अशा १३ शस्त्र परवानाधारकांकडून शस्त्रे जमा करुन घेण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी पुणे ग्रामीण पोलिसांना दिले आहेत. यामध्ये जुन्नर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ६, घोडेगाव- ४, खेड- १ आणि ओतूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दोन शस्त्र परवानाधारकांचा समावेश आहे. २२ सप्टेंबरनंतर ७ दिवसांच्या आत संबंधितांना शस्त्र परत करावेत, असे आदेशात म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra CM : महाराष्ट्रात बिहार पॅटर्न का लागू होऊ शकत नाही? ही आहेत ५ मोठी कारणे

Trending : 'असाच' मुलगा हवा! तरूणीने लग्नासाठी दिली जाहीरात; अजब अटीने उडाली सोशल मिडियावर खळबळ

Swanand Kirkire: कविता किंवा चाल सुचण्याची प्रक्रिया कशी असते? स्वानंद किरकिरेंची स्वास्थ्यमसाठी खास मुलाखत

Mumbai Indians Playing XI: मुंबई इंडियन्सने २३ जणांसाठी १०० कोटी खर्च केले, पण Rohit Sharma चा ओपनिंग पार्टनर कोण?

Share Market Closing: शेअर बाजार घसरणीसह बंद; अदानी समूहाच्या शेअर्स कोसळले

SCROLL FOR NEXT