पुणे

पुणे : सेविनिवृत्त सैनिकांचे मतिमंद मुलांसोबत दोन दिवस

'रिमाउंट वेटरनरी कॉर्प्स'च्या २४३व्या स्थापना दिवसाचे औचित्य

अशोक गव्हाणे ashokgavhane0404@gmail.com

कात्रज : भारतीय सैन्याच्या(indian army) सेवानिवृत्त सैनिकांकडून रिमाउंट वेटरनरी कॉर्प्सच्या (आरव्हीसी) २४३व्या स्थापना दिवसाचे औचित्य साधत १४ आणि १५ डिसेंबर रोजी अनिकेत सेवाभावी संस्था संचलित श्री साई मतिमंद मुला-मुलींचे निवासी पुनर्वसन प्रकल्प येथील ५४ मतिमंद मुला-मुलींसोबत साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात आपल्या देशाचे पहिले सीडीएस बिपिन रावत(cds bipin rawat) व त्यांच्यासोबत विमान अपघातात(helicopter crash) शहिद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करून करण्यात आली.

त्याचबरोबर या सेवानिवृत्त सैनिकांकडून आश्रमातील मतिमंद मुला-मुलींसाठी एक वॉशिंग मशिन भेट देण्यात आली. आरव्हीसीचा(rvc) स्थापना दिवस साजरा करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून(maharshtra) दरवर्षी मोठ्या प्रमाणावर आरव्हीसी कॉर्प्सचे माजी सैनिक सहभागी होत असतात. २०१८ पासून आरव्हीसीचा स्थापना दिवस नाशिक येथून साजरा करण्यास सुरवात झाली. त्यानुसार माजी सैनिकांना एकत्र करत अनाथ बालकांना आश्रमात भेट देऊन त्यांच्या अडचणी जाणून घेत वेगवेगळ्या प्रकारे मदत करण्यांवर भरत दिला जातो.

माजी सैनिक विशाल सोनवणे, संजय बोरसे, सुनील पवार, रत्नाकर तांबे, जितेंद्र पाटील यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह या उपक्रमाला सुरवात केली होती. २०१९ला हा कार्यक्रम औरंगाबाद येथे घेण्यात आला. त्यानंतर २०२०मध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम घेण्यात आला नाही. त्यानंतर आता यावर्षी हा कार्यक्रम घेण्यात आला. यावर्षीचा उपक्रम पुण्यात आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमाचे आयोजन अनिल हाके, मच्छिंद्र खोमणे, संतोष शिर्के, औसर सिध्दू, सतिश बोढरे आदी माजी सैनिकांनी केले होते.

सैन्यात असताना देशसेवा केलीच आहे. परंतु निवृत्तीनंतरही आरव्हीसीच्या स्थापना दिवसाचे औचित्य साधून अनाथ आश्रमांना भेट देऊन अनाथांच्या समस्या जाणून घेत योग्य ती मदत देऊन वेगळ्या पद्धतीने या माजी सैनिकाकंडून देशसेवा सुरु आहे. यातून एक सामाजिक बांधिलकीचा वेगळा आदर्श निर्माण केला आहे.

काय आहे रिमाउंट वेटर्नरी कॉर्प्स

बंगालमध्ये सुरुवातीला 'स्टड डिपार्टमेंट' म्हणून १७७९ मध्ये कॉर्प्सची स्थापना करण्यात आली. त्यानंतर १४ डिसेंबर १९२० रोजी त्याची अधिकृतपणे घोषणा करण्यात आली. १९४७मध्ये झालेल्या विभाजनामुळे भारतीय आणि पाकिस्तानी सैन्यासाठी २:१ च्या प्रमाणात पशुवैद्यकीय आणि मिलिटरी फार्म कॉर्पोरेशनच्या मालमत्तेची विभागणी झाल्यानंतर मे १९६०मध्ये एकत्रित रिमाउंट, पशुवैद्यकीय आणि फार्म कॉर्पोरेशन मिळून स्वतंत्र कॉर्प्स म्हणून रिमाऊंट वेटर्नरी कॉर्प्स वेगळे झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray : महाविकास आघाडी जिंकली नाही तर गुजरात जिंकेल; आदित्य ठाकरेंचा घणाघात

IND vs AUS, BGT: चेतेश्वर पुजारा भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेत दिसणार; पण फलंदाज म्हणून नाही, तर...

Kalyan: प्रचार अर्धवट सोडून उमेदवार सुलभा गायकवाड धावल्या मदतीला..!

आता तो पूर्वीसारखा नाही राहिला! अंगावर जखमा, हातात सुरा; ‘बागी ४’ चित्रपटाचं पहिलं पोस्टर समोर

Curry Leaves Health Benefits: औषधी गुणधर्म असलेला कढीपत्ता 'या' गंभीर आजारांना ठेवतो दूर

SCROLL FOR NEXT