आंदोलन sakal
पुणे

Pune : बाईक टॅक्सी विरोधात रिक्षा संघटनांचे आंदोलन

प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी पीएमपी सज्ज

सकाळ वृत्तसेवा

पुणे : शहरातील रिक्षा संघटनांनी बाईक टॅक्सीला विरोध करण्यासह विविध मागण्यांसाठी सोमवारपासून बेमुदत रिक्षा बंदची हाक दिली आहे. आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी शिक्षाचालकांनी मोठ्या प्रमाणात प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर (आरटीओ) ठिय्या मांडत घोषणाबाजी करण्यास सुरवात केली आहे.

आरटीओ ते सीओर्इपी कॉलेजपुलापर्यंतच्या रस्त्यावर रिक्षा पार्ककरून हे आंदोलन करण्यात येत आहे. बाईक टॅक्सी बंद झालीच पाहिजे, चालक-मालक एकजुटीचा विजय असो, हमसब एक है, आरटीओ पे हल्ला बोल’’, अशा घोषणा यावेळी आंदोलनकर्त्यांकडून देण्यात आल्या. विविध कंपन्यांमार्फत बाईक टॅक्सी सेवा सुरू करण्यात आली आहे, याचा निषेध म्हणून बाईक टॅक्सी विरोधात आज रिक्षा संघटनांनी जोरदार आंदोलन पुकारले आहे. अनेक रिक्षाचालक ग्रुपने आंदोलनाच्या ठिकाणी दाखल झाले आहेत.

कोरोनाचा फटका सर्वच क्षेत्रावर बसला. रिक्षा चालकांच्या व्यवसायांवरही त्याचा परिणाम दिसून आला. टॅक्सी-बाईक सुरू असल्याने रिक्षाचालक धंद्यावर परिणाम होत आहे. याचा निषेध व्यक्त करत हे आंदोलन पुकारले आहे. याआधीही काही दिवसांपूर्वी रिक्षा चालक आक्रमक झाले होते.

रिक्षा चालकांच्या मागण्या :

- फायनान्स कंपन्यांकडून सुरू असलेला छळ थांबवावा

- सीएनजीचे वाढलेले दर कमी करावे

- ई- व्हेइकलच्या मूळ धोरणात बदल करावा

प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी पीएमपी सज्ज :

रिक्षा बंदमध्ये मोठ्या प्रमाणात रिक्षा चालक सहभागी झाले आहेत. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी पीएमपी प्रशासनाने जास्तीच्या बस रस्त्यावर उतरविण्याचा निर्णय घेतला आहे. सुमारे १७०० बस प्रवाशांच्या सेवेत धावत आहेत. नेहमीच्या तुलनेत सुमारे १०० बस जास्तीच्या सोडण्यात आल्या आहेत.

प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून पीएमपी प्रशासन पूर्ण क्षमेतेने बस रस्त्यावर आणल्या आहेत. ग्रामीण भागातील फेऱ्यांची संख्या कमी करून त्या बस शहरात विविध मार्गावर सोडण्यात आल्या आहे.

काही ठिकाणी प्रवाशांची गैरसोय :

रिक्षा संघटनांनी पुकारलेल्या बंदमुळे वाकडेवाडी, पुणे स्टेशन, स्वारगेट यासह प्रमुख चौकांमधून शहराच्या इतर भागात रिक्षा जाणाऱ्या प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागला. पीएमपीच्या डेक्कन, महानगरपालिका, स्वारगेट, कात्रज, शिवाजीनगर, एबीसी यासह अनेक बड्या बसस्थानकांवर गर्दी नियंत्रण करून अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baba siddiqui case: बाबा सिद्दीकींच्या हत्येचा कट रचणाऱ्या शुभम लोणकरच्या निशाण्यावर पुण्यातील बडा नेता; पोलिस तपासात धक्कादायक माहिती

Supriya Sule: बुलेट ट्रेनसाठी करोडो रुपये खर्च करतात; पण मुलांच्या शिक्षणासाठी निधी नाही, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल

Latest Maharashtra News Updates : गृह मतदान मोहिमत ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांनी बजावला मतदानाचा हक्क

Mumbai Temperature: मुंबईच तापमान पुन्हा वाढलं, कमाल तापमान ३६.८ अंशांवर

Government Job: जिल्हा परिषद भरतीमध्ये घोळ? 19 नोव्हेंबरपर्यंत स्पष्टीकरण सादर करण्याचे कोर्टाचे आदेश

SCROLL FOR NEXT