Samadhan Patil sakal
पुणे

Motivation News : बारावीत पाच वेळा नापास; तरीही कापड व्यवसायात उभारला मराठी ब्रॅण्ड

यशाचे शिखर कष्टाच्या मार्गानेच साध्य केले जाऊ शकते, ही बाब खऱ्या अर्थाने सिद्ध केली आहे, २७ वर्षीय समाधान पाटील या तरुणाने.

सकाळ वृत्तसेवा

यशाचे शिखर कष्टाच्या मार्गानेच साध्य केले जाऊ शकते, ही बाब खऱ्या अर्थाने सिद्ध केली आहे, २७ वर्षीय समाधान पाटील या तरुणाने.

पुणे - यशाचे शिखर कष्टाच्या मार्गानेच साध्य केले जाऊ शकते, ही बाब खऱ्या अर्थाने सिद्ध केली आहे, २७ वर्षीय समाधान पाटील या तरुणाने. एकेकाळी रोजंदारीवर काम करणाऱ्या या तरुणाने हालाकीच्या परिस्थितीवर मात करत कपड्याच्या व्यवसायात स्वतःचे ब्रॅण्ड विकसित केले आहेत. बारावीत पाच वेळा नापास झालेल्या समाधानचा यशस्वी उद्योजकतेचा सफर अनेकांना प्रेरित करत आहे.

मूळचे जालना येथील समाधान सध्या पुण्याच्या मोशी येथे आपल्या कुटुंबासोबत राहतात. आपल्या खडतर प्रवासाबद्दल त्यांनी सांगितले की, ‘१९९५ साली वडील पुण्याला आले. मोलमजुरी करून त्यांनी कुटुंबाचा उदरनिर्वाह केला. मी सातवीपर्यंतचे शिक्षण महापालिकेच्या शाळेतून घेतले. दहावीला चांगले गुण मिळाल्याने अकरावीला विज्ञान शाखेत प्रवेश घेतला आणि बारावीत मात्र पाच वेळा नापास झालो.

सहाव्या प्रयत्नात ७० टक्के गुण मिळवत अखेर बारावी पास झालो. पुढे ग्राफिक डिझाइनचा कोर्स करून मुलांना शिकविण्यास सुरुवात केली. शिवाय सायकलवरून वृत्तपत्र वाटणे, फुलांचे हार विकणे, पाण्याच्या बाटल्या विकणे, मेडिकलमध्ये ही काम केले. यामुळे व्यवसाय क्षेत्राबाबत हळूहळू शिकत गेलो.’

समाधान पुढे म्हणाले, ‘कर्ज काढून कुल्फीचा व्यवसाय सुरू केला. पण, कोरोनाकाळात ते ही बंद करावे लागले आणि डोक्यावर कर्जाचा डोंगर निर्माण झाला. त्यावेळी घरी बसून ग्राफिक डिझाईनच्या कामाला पुन्हा सुरुवात केली आणि सोबतच मित्राच्या टेलरिंगच्या दुकानात रेडिमेड पँट शिवायचे काम करू लागलो. हे कपडे दुकानांमध्ये फिरून विकण्यास सुरुवात केली पण प्रतिसाद कमीच. तेव्हा जाणवले की मराठी माणूस या व्यावसायात नाही. मग, आपण पँट्सच्या व्यवसायात उतरत स्वतःच्या ब्रॅण्डची सुरुवात करावी हा विचार आला. त्या दिशेने काम करत या व्यवसायाला यशस्वी केले. आज सुमारे २०० दुकानांमध्ये हा माल पोहोचत आहे.’

वडिलांचा अपघात आणि परिस्थितीची जाणीव...

एकदा वडिलांचा अपघात झाला आणि त्यात त्यांच्या मित्राचा मृत्यू झाला. तेव्हा वडिलांच्या उपचारासाठी आमच्याकडे पैसेही नव्हते. पण, या कठीण काळात नातेवाइकांनी आर्थिक साहाय्य केले. त्यावेळी परिस्थितीची जाणीव झाली. निदान भविष्यात अशी परिस्थिती उद्भवल्यास पुन्हा पैशांची चणचण भासणार नाही, इतके कष्ट करून आर्थिक परिस्थिती बदलण्याची जिद्द मनात केली.

व्यवसायाबाबत...

  • रेडिमेड पँट्सचा ब्रॅण्ड

  • रेडिमेड कपड्यांच्या दुकानांमध्ये या पँट्सची विक्री

  • चाकणमधील कारखान्यात निर्मिती

  • पिंपरीतील गोडाउनमधून विविध दुकानांना माल पाठविला जातो

  • पुण्यासह राज्यात तसेच कर्नाटक व तामिळनाडूपर्यंत उत्पादन पाठविले जाते

  • गेल्या वर्षभरात एक कोटी रुपयांचे उत्पन्न

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan Fire News: कल्याणमध्ये गगनचुंबी इमारतीला भीषण आग; घटनास्थळी अग्निशमन दलाच्या ९ गाड्या दाखल

Latest Marathi News Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

Jalgaon Jamod Assembly Election 2024 Result : जलंब मतदार संघाचा विक्रम मोडत जळगावने रचला नवा इतिहास

Phulambri Assembly Election 2024 Result : फुलंब्री विधानसभेत 25 जणांचे डिपॉझिट जप्त! मनसेसह 19 उमेदवारांना नोटा पेक्षाही कमी मतदान

CSK ची साथ सुटताच Deepak Chahar च्या बहीण अन् पत्नीची स्पेशल सोशल मीडिया पोस्ट; पाहा काय लिहिलंय

SCROLL FOR NEXT