Pune Sakal
पुणे

Pune : सासवडच्या संत सोपानकाका बँकेची शेड्यूल बँकेकडे वाटचाल; आमदार संजय जगताप

बँकेचा १ हजार कोटींचा व्यवसायाचा टप्पा पार., यंदा नफा 5.49 कोटींवर पोचला.

श्रीकृष्ण नेवसे : सकाळ वृत्तसेवा

सासवड - येथील संत सोपानकाका सहकारी बँकेची शेड्यूल बँकेकडे वाटचाल सुरू असून यावर्षी बँकेने १ हजार कोटींचा व्यवसायाचा टप्पा पार केला आहे. बँकेच्या एकूण ठेवी ६९६ कोटी ५५ लाख रुपयांपर्यंत पोचल्या आहेत.

तर कर्ज वाटप ४०८ कोटी ९४ लाख रुपये, नेटवर्थ ६७ कोटी ६७ लाख रुपये, भागभांडवल २५ कोटी ४ लाख रुपये असून बँकेला ३१ मार्च २०२३ अखेर ५ कोटी ४९ लाख रुपयांचा निव्वळ नफा संस्थेला झाला आहे., अशी माहिती बँकेचे अध्यक्ष तथा पुरंदर - हवेलीचे आमदार संजय जगताप यांनी वार्षिक सभेत दिली.

सासवड (ता.पुरंदर) येथील आचार्य अत्रे सांस्कृतिक भवनात संत सोपानकाका सहकारी बँकेची २६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा अत्यंत खेळीमेळीत संपन्न झाली. त्यावेळी अध्यक्ष म्हणून श्री. जगताप बोलत होते. व्यासपीठावर सासवडच्या माजी नगराध्यक्षा आनंदीकाकी जगताप, संचालिका राजवर्धिनी जगताप, सविता ताकवले, पल्लवी बाजारे,

संचालक हेमंत भोंगळे, दिलीप बडदे, संजय आंबेकर, शरदचंद्र जगताप, राजेंद्र बडदे, मनोहर पवार, धनंजय काकडे, अॅड. युवराज वारघडे, धनसिंग भापकर, शेखर निकुडे, अनिल वीरकर, अनंत तांबे, सी.ए.प्रकाश जगदाळे, बँक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रकाश पवार, सदस्य अरविंद नाईक, पृथ्वीराज पाटील, रवींद्र जोशी, रोहित शहा, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप साबणे, मुख्य अधिकारी चंद्रशेखर जगताप, गणेश मोहोळ, विश्वजीत आनंदे आदी उपस्थित होते.

बँकेचे संस्थापक स्व. चंदूकाका जगताप यांची आर्थिक शिस्त आणि सभासद, ठेवीदार, कर्जदार, खातेदार या सर्वांच्या विश्वासामुळे बँक कोरोनाच्या संकटात व आर्थिक विषमतेच्या काळातही सक्षम उभी आहे. हाच विश्वास कायम ठेवावा. असे अध्यक्ष आमदार संजय जगताप म्हणाले., बँकेमध्ये मोबाईल बँकिंग सुविधा कार्यान्वित असून ग्राहकांनी आरटीजीएस, एनईएफटी अशा डिजिटल सुविधेचा अधिकाधिक वापर करून व्यवहार करण्याचे आवाहन आहे.

आयकराची तरतूद, सक्रीय जिंदगीची तरतूद, अनुत्पादक जिंदगीची तरतूद वजा जाता बँकेला मार्चअखेर ५ कोटी ४९ लाख रुपयांचा निव्वळ नफा संस्थेला झाला आहे. त्यातून संचालक मंडळाच्या वतीने सभासदांना ९ टक्के लाभांश मी जाहीर करीत आहे. श्री. जगताप म्हणाले., बँकेने मोबाईल बँकींग सुविधा पूर्णतः कार्यान्वित केली आहे. तसेच आरटीजीएस आणि एनईएफटी ची मेंबरशीप मिळविली आहे. त्याचा देशभरासाठी लाभ खातेदारांना मिळत आहे.

सन २०१७ पासून बँकेमार्फत जीवन सुरक्षा योजनेअंतर्गत सभासदांचा विमा उतरविण्यास सुरवात केली आहे. लाभासाठी उर्वरीत सभासदांनी आधारकार्ड आपल्या खात्यास लिंक करुन घ्यावे. बँकेचे भांडवल पर्याप्तता प्रमाण हे किमान ९ टक्के आवश्यक असताना आपण ते कायमच १२ टक्के पेक्षा अधिक राखलेले आहे. यंदा ते १५ .५७ टक्के आहे. सभेत बँकेचे उपाध्यक्ष रमणिकलाल कोठडिया यांनी प्रारंभी प्रास्ताविक केले.

मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप साबणे यांनी विषय व अहवाल वाचन केले. नामदेव बरकडे, विश्वास थेऊरकर, माणिक चोरमले, अशोक दळवी, शिवाजी कोलते, सुनिता कोलते, देविदास कामथे, प्रमोद जगताप, अनिल बिराजदार, अजयकुमार जगताप, सुनिल कणसे, किरण आखाडे, हरुन बागवान, विक्रम येळवंडे, संपत जाधव आदी सभासदांनी चर्चेत सहभाग घेतला. सभेत प्राचार्य नंदकुमार सागर सुत्रसंचलन केले. संचालक शिवाजी ढमढेरे यांनी आभार मानले.

महिला बचत गटांना 15 लाखांपर्यंत कर्ज लाभ - संजय जगताप

स्वयंसहायता महिला बचत गटांसाठी ५ लाखांपर्यंत बिगरतारण कर्ज ७ टक्के दराने., तर १५ लाखापर्यंत तारण कर्ज ७ टक्के दराने लाभ देण्याबाबत संचालक मंडळाकडे मंजुरीसाठी शिफारस करणार असल्याचे अध्यक्ष तथा आमदार संजय जगताप यांनी आश्वासित केले. हारुण बागवान यांनी याबाबत प्रश्न विचारल्याने जवळपास निर्णय झाला.

सभासदांना तात्काळ लाभांश जमा

अमेरीकेत शिक्षण घेत असलेल्या हिमगौरी खळदकर हिने सुरू सभेत भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला. लाभांश तातडीने बँक खात्यात जमा झाल्याचा मेसेज आल्याचे सांगत बँकेच्या कामकाजाचे अभिनंदन केले. सभा सुरु असतानाच अनेक सभासदांचा लाभांश जमा झाल्याचे प्रत्यक्ष सभेत सभासदांनी सांगितले.

संत सोपानकाका बँकेच्या एकूण 18 शाखा असून सभासद संख्या 20 हजार 500 आहे. आॅडीट वर्ग सातत्याने `अ` असून पाच लाखांपर्यंतच्या ठेवींना विमा संरक्षण आहे.``

- संजय जगताप, बँक अध्यक्ष तथा आमदार, पुरंदर-हवेली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अंधेरी पूर्व विधानसभेत मुर्जी पटेल आघाडीवर

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

Sanjay Raut : हा जनतेचा कौल नसून, लावून घेतलेला निकाल; संजय राऊतांचा रोख कोणाकडे?

Amit Thackeray Maharashtra Assembly Election : अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीत उतरले अन् तिरंगी लढतीच्या चक्रव्यूहात अडकले; ठाकरे ब्रँडचं काय होणार?

SCROLL FOR NEXT