Pune Saswad water supply capacity increased to 80 lakh litre 
पुणे

पुणे : नूतनीकरणाने `वीर`कडील सासवडची पाणी पुरवठा क्षमता 80 लाख लिटर्सपर्यंत वाढली

कांबळवाडी संपवेलवर सौरऊर्जा प्रकल्पामुळे वीजबिलातही 60 लाखांची बचत सुरु

- श्रीकृष्ण नेवसे

सासवड : सासवड शहरात दरवर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाईने दोन दिवसाआड पाणी पुरवठा करावा लागत असे. यंदा उन्हाळ्यात असा पेच दूर झाला. कारण सासवड शहरास पाणी पुरवठा करणाऱया 31 कि.मी.वरील वीर धरणावरील योजनेचे वीजपंप दोन कोटी रुपये खर्चून बदलले. त्यातून 50 लाख लिटर्स उपशाची क्षमता 80 लाख लिटर्सवर पोचली. तसेच नुकतेच जलवाहिन्यांच्या मार्गातील कांबळवाडी संपवेलवर सौरऊर्जेची दोन कोटी खर्चाची व्यवस्था केल्यामुळे वीजबिलातही 60 लाख रुपये बचत सुरु झाली आहे. एकुणच शहराची पाणीस्थिती सुधारत असल्याचे स्पष्ट होत आहे.

सासवड शहरास सध्या वीजपंप नवे बसल्याने वीरहून 80 लाख लिटर्स, गराडे तलावातून 20 लाख लिटर्स, घोरवडी तलावाची जलवाहिनी दुरुस्तीने तेथूनही 15 लाख लिटर्स, सिध्देश्वर बंधाऱ्याच्या उद्बवातून 7 लाख लिटर्स अशी सुमारे एक कोटी लिटर्सहून अधिक पाणी उपशा क्षमता योजनेतील विविध सुधारणांमुळे निर्माण झाली आहे. याबाबत सासवड नगरपालिकेचे मुख्याधिकारी निखील मोरे, पाणी पुरवठा अभियंता रामानंद कळसकर म्हणाले., वीर धरणावरील वीजपंप बदलाने अगोदर जिथे ताशी अडीच लाख लिटर्स पाणी यायचे, तिथे आता 3 लाख 67 हजार लिटर्स पाणी तासात मिळू लागले आहे.

असे गेले नुतनीकरण पूर्णत्वाकडे...

  • 18.72 कोटी खर्चून 2004 मध्ये झालेल्या 60 हजार लोकसंख्येच्या सासवड शहराच्या वीर धरणाहून 31 कि.मी. अंतराच्या पाणी योजनेचे आता नुतनीकरण अंतिम टप्प्यात आहे. नगरोत्थान योजनेतून वीर धरणावरील जॅकवेल व कांबळवाडीच्या संपवेलवर अनुक्रमे 180 व 120 अश्वशक्तीचे तीन - तीन वीजपंप होते. ते जुने व कालबाह्य झाल्याने तिथे 2.8 कोटी रुपये खर्चून नवे अनुक्रमे 250 व 150 अश्वशक्तीचे तीन - तीन पंप बसविले आहेत. बदलामुळे भविष्यात रोज पाणी देण्याबाबत शहरातील वितरण व्यवस्थेचा आराखडा तयार करण्याचे काम एका संस्थेला सोपविले आहे.

  • कांबळवाडी संपवेललगत नगरपालिकेची जागा असल्याने तिथे पंपिंगसाठी जिल्हा नियोजन समितीचे 2 कोटी खर्चून अपारंपरीक ऊर्जा योजनेतून 400 किलोवॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प नुकताच पूर्णत्वाकडे गेला. बदलामुळे वीजबिलात वार्षिक 60 लाखांची बचत होईल.

  • सासवडला इनामकेमळा येथे तीन लाख लिटर्स क्षमतेची रुपये 89 लाख खर्चातून पाणी वितरण टाकी, शिवाय पालिका वसाहतीलगत जुन्या टाकीशेजारी 70 लाख खर्चाची 10 लाख लिटर्सची वितरण टाकी आणि त्याशिवाय तिथेच पश्चिमेकडे 70 लाख खर्चाची आणखी 10 लाख लिटर्सची साठवण टाकी बांधून शहराची पाणी साठवण व वितरण क्षमता वाढविली जात आहे.

``स्व. चंदुकाका जगताप यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याकडे पाठपुरावा करुन खरे तर वीर योजना राबविली. त्या योजनेला नूतनीकरण करण्याची मला लोकप्रतिनीधी म्हणून संधी मिळाली. भविष्यात एक महिनाभर पुरेल एवढा सुमारे 17 कोटी लिटर्स क्षमतेचा व 30 कोटी खर्चाचा साठवण तलाव सासवडसाठी करण्याचे नियोजन आहे. पाणी पुरवठा केंद्रावर सौरउर्जा प्रकल्प करुन केंद्रासाठी, पालखीतळ, अत्रे भवन, पालिका इमारत यांना वीज पुरविली जाईल. वीर जॅकवेललगतही 1.6 मेगावॅट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्पासाठी शासन परवानगीत प्रस्ताव आहे.``

- संजय जगताप, आमदार, पुरंदर-हवेली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amol Mitkari: अजितदादांच्या खांद्यावर नरेश अरोरांचा हात... मिटकरींचा पक्षाला घरचा आहेर, राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत धुसफूस वाढली?

Latest Marathi News Updates : इव्हीएमविरोधात लढाईसाठी विरोधकांची रणनीती

Nashik News : नवीन डांबरीकरण झालेले रस्ते खोदाईस मनाई; जुन्या खोदलेल्या रस्त्यांचा मागविला अहवाल

Hasan Mushrif : कागलमधून हसन मुश्रीफ विजयी झाले, पण..; काय सांगते मतदारसंघातील आकडेवारी, घाटगे पोहोचले जवळपास

Rajkumar Rao Fees: स्त्री २'च्या यशानंतर राजकुमार रावने वाढवली फी? ५ कोटींच्या चर्चेवर दिलं उत्तर

SCROLL FOR NEXT