खेड शिवापूर टोलनाक्यावर आंदोलन करण्यसाठी शनिवारी सकाळी दहा वाजल्यापासूनच कार्यकर्त्यांची मोठी फौज जमा झाली होती.
नसरापूर : पुणे-सातारा महामार्गाची (Pune-Satara Highway) दूरवस्था, राजरोसपणे टोल वसूल करणाऱ्या महामार्ग प्राधिकरण व टोल प्रशासनाचा आज खेड शिवापूर टोल नाक्यावर टोल (Khed Shivapur Toll Plaza) बंद आंदोलन करून जोरदार निषेध करण्यात आला.
महामार्गाची दुरुस्ती झालीच पाहिजे, खेडशिवापूर टोल बंद झालाच पाहिजे, अशा घोषणा देत टोल नाक्यावरून जाणारी सर्व वाहने मोफत सोडून देत टोलनाका वसुली जोपर्यंत थांबवत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा पवित्रा घेत काँग्रेस (Congress) पक्षाच्या वतीने टोलनाक्यावर तीव्र आंदोलन सुरू करण्यात आले.
पुणे-सातारा महामार्गाची दयनीय अवस्था झाल्याच्या पार्श्वभूमीवर शिंदेवाडी ते कोल्हापूरपर्यंत विविध टोलनाक्यावर काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन आज करण्यात आले. त्याचप्रमाणे खेडशिवापूर (ता. हवेली) येथील टोलनाक्यावर भोरचे आमदार संग्राम थोपटे व पुरंदरचे आमदार संजय जगताप यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.
यावेळी देविदास भन्साळी, शैलेश सोनवणे, लहूनाना शेलार, माऊली पांगारे, रोहन बाठे, शिवराज शेंडकर, प्रदीप पोमन, विशाल कोंडे, सूरज गदादे तसेच भोर, वेल्हा, मुळशी, पुरंदरचे काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खेड शिवापूर टोलनाक्यावर आंदोलन करण्यसाठी शनिवारी सकाळी दहा वाजल्यापासूनच कार्यकर्त्यांची मोठी फौज जमा झाली होती. प्रथमथा सातारा बाजूकडील टोलवर आंदोलन करून वाहने सर्व सोडून देण्यात आली. त्यानंतर मुख्य टोलनाक्यावर काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडला होता. यावेळी आमदार संग्राम थोपटे यांनी रस्ता धड नाही, तर टोल घेताच कशाला असा संतप्त सवाल करत जोपर्यंत लेखी हमी मिळत नाही, तोपर्यंत कोणताही कार्यकर्ता हटणार नसल्याचे आक्रमक भूमिका घेतली.
पुरंदरचे आमदार संजय जगताप यांनी देखील यावेळी येथील स्थानिक जनतेच्या पाठीशी कायम राहणार असून टोल नाका बंदच केला पाहिजे, अशी मागणी केली. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त करून पुणे-सातारा महामार्गाच्या दयनीय अवस्थाबाबत संताप व्यक्त केला. रस्ता दुरुस्तीची लेखी हमी दिली तरी रस्ता दुरुस्त होईपर्यंत टोल वसुली बंदच ठेवावी लागेल, अशी अग्रही भूमिका या वेळी आमदार थोपटे यांनी मांडली. त्यामुळे टोल प्रशासन व महामार्ग प्राधिकरणापुढे पेच निर्माण झाला, त्यामुळे सकाळी दहा वाजता सुरू झालेले आंदोलन दुपारी दोन वाजले तरी चालूच होते. दरम्यान, कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी राजगड पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त येण्यात केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.