Savitribai phule Pune University  sakal
पुणे

Pune : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची क्रमवारी घसरली

विद्यापीठाच्या गटात १९ व्या स्थानावर; संशोधन आणि पेटंटमध्ये ‘नापास’

सम्राट कदम

पुणे : देशातील सर्वोत्कृष्ट शैक्षणिक संस्थांच्या क्रमवारीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे स्थान कमालीचे घसरले आहे. सर्वच शैक्षणिक संस्थाच्या क्रमवारीत ३५ व्या स्थानावर तर विद्यापीठांच्या गटात १९ व्या क्रमांकावर फेकले गेले आहे. मागील वर्षी पुणे विद्यापीठ सर्वच संस्थांच्या गटात २५ व्या स्थानावर होते. २०२० मध्ये विद्यापीठ गटात पहिल्या दहामध्ये नवव्या क्रमांकावर असलेल्या विद्यापीठाची ही घसरण चिंता वाढवणारी आहे, असे असले तरी महाराष्ट्रातील सार्वजनिक विद्यापीठांमध्ये पुणे विद्यापीठ अजूनही प्रथम क्रमांकावर आहे.

नॅशनल इस्टिट्युशनल रॅंकिंग फ्रेमवर्कमध्ये (एनआयआरएफ) विद्यापीठांच्या क्रमवारीत पुणे विद्यापीठाला एकूण सरासरी ५८.३१ गुण मिळाले आहेत. तर ओव्हरऑल गटात ५५.७८ गुण आहेत. केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री डॉ. राजकुमार रंजन सिंग यांनी सोमवारी सकाळी ही क्रमवारी जाहीर केली. देशातील सर्व शैक्षणिक संस्था, विद्यापीठांच्या वर्षभरातील कामगिरीच्या आधारे मंत्रालयाकडून हे रॅंकिंग दिले जाते.

२०१६ मध्ये एनआयआरएफला सुरवात झाली. त्यावर्षी केवळ सुमारे साडे तीन हजार शैक्षणिक संस्थांनी सहभाग घेतला होता. यावर्षी हा आकडा ८ हजार ६८६ एवढा आहे. देशात भारतीय तंत्रज्ञान संस्था मद्रासने पहिला क्रमांक पटकावला आहे. मागील तीन वर्षांपासून पुणे विद्यापीठाची क्रमवारी दरवर्षी घसरत चालली आहे. विद्यापीठ गटात २०२० मध्ये नऊ क्रमांकावर असलेले विद्यापीठ मागीलवर्षी १२ व्या क्रमांकावर होते. तर २०२१ मध्ये ११वे स्थान मिळाले होते. त्यावेळी एकूण ५८.३४ एवढे गुण होते.

पेटंट मिळविण्यात विद्यापीठ ‘नापास’ ः

विद्यापीठांच्या मुल्यांकनामध्ये शोधनिबंध, पेटंट, शोधनिबंधांचा दर्जा आदींसाठी इंटलेक्चुअल प्रॉपर्टी राईट्स अर्थात आयपीआर हे विशेष रकाना आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला यात १५ पैकी चक्क शून्य गुण मिळाले आहे. आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या गरजू विद्यार्थ्यांच्या संख्येच्या बाबतीतही विद्यापीठाला २० पैकी फक्त एक गुण मिळाला आहे. विद्यापीठाच्या घसरलेल्या रॅंकिंगमुळे एकंदरीत कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

विद्यापीठाचे गुणपत्रक (विद्यापीठ गटात) ( प्रत्येकी १०० पैकी) -

१) अध्ययन, अध्यापन आणि संसाधन ः ६६.९९

२) संशोधन आणि प्रोफेशनल कार्य ः ३९.३०

३) पदवीची व्यवहार्यता ः ९४.६३

४) सर्वसमावेशकता आणि लोकाभिमुखता ः ५१.७८

५) समाजातील प्रतिमा ः ४१.०७

-----------------

मागील पाच वर्षांचे प्रगतिपुस्तक (क्रमांक) ः

वर्ष ः सर्वसाधारण गट ः विद्यापीठ

२०१९ ः १७ ः १०

२०२० ः १९ ः ९

२०२१ ः २० ः ११

२०२२ ः २५ ः १२

२०२३ ः ३५ ः १९

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT