पुणे - आपली पृथ्वी आणि संपूर्ण सूर्यमालाच मंदाकिनी या दीर्घिकेचा (आकाशगंगा) भाग आहे. अशा लाखो दीर्घिका अंतराळात आढळतात. तर आपल्या पासून लाखो प्रकाशवर्षे दूर अशा दीर्घिकांचे समूहच आढळतात. शेकडो दीर्घिका गुरूत्वाकर्षणामुळे एकमेकांजवळ ओढले जातात. अतिशय जटिल संरचना असलेल्या अशा दीर्घिका समूहाची प्रतिमा मिळविणे अशक्यप्राय गोष्ट असून, भारतीय शास्रज्ञांच्या नेतृत्वात ‘एबेल’ या दीर्घिका समूहाची जटिल संरचना जगासमोर आली आहे.
नारायणगाव जवळील जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोपच्या (जीएमआरटी) माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावरील खगोलभौतिक शास्त्रज्ञांच्या संघाने या संदर्भात निरीक्षणे घेतली होती. ज्याचे नेतृत्व इटलीमधील बोलोग्ना विद्यापीठातील कार्यरत रेडिओ खगोलशास्त्रज्ञ कमलेश राजपुरोहित यांनी केले आहे. या शास्त्रज्ञांनी एबेल समूहातील रेडिओ प्रारणांची निरीक्षणे घेण्यासाठी जीएमआरटीसहीत नेदरलँड्समधील ‘लो फ्रिक्वेन्सी ऍरे’, अमेरिकेतील ‘कार्ल जान्स्की व्हेरी लार्ज ऍरे’ या रेडिओ दुर्बिणींबरोबरच ‘एक्सरे मल्टीमिरर न्यूटन आणि ‘चंद्रा’ या क्ष-किरणांद्वारे निरीक्षण करणाऱ्या दुर्बिणींचीही मदत घेतली होती. मात्र जीएमआरटीच्या अधिक संवेदनशीलतेमुळे अद्याप ज्ञात नसलेल्या दीर्घिकांच्या प्रतिमा टिपता आल्या.
संशोधनाचे वैशिष्ट्ये-
पृथ्वीपासून १० हजार प्रकाशवर्षांपेक्षाही दूर असलेला ‘एबेल’ दीर्घिका समूह त्याच्या जटिल संरचनेमुळे ओळखला जातो. याचे तापमान दहा लाख सेंटीग्रेडपोक्षाही जास्त असून, ‘प्लाझ्मा’ म्हणजे पदार्थाच्या चौथ्या अवस्थेतील युक्त अशा वायूंनी भरलेले दिसले आहे. या समूहात दीर्घिकांच्या टकरी किंवा विलीनीकरणामुळे प्रचंड ऊर्जा मुक्त होते. या ऊर्जेचे उत्सर्जन विद्युत चुंबकीय वर्णपटातील ‘क्ष’ किरणांपासून रेडिओ लहरीं मधील प्रारणाद्वारे होते. हे रेडिओ लहरींचे प्रारणे दुर्बिणीतून अभ्यासल्यास दीर्घिका समूहाचे आकारविज्ञान कळण्यास मदत होते. काही वर्षांपूर्वी अद्ययावत केलेल्या जीएमआरटीच्या अधिक संवेदनशील इलेक्ट्रॉनिक्स प्रणालीमुळे हे यश मिळाल्याचे मानले जाते.
सहभागी शास्रज्ञ-
आंतरराष्ट्रीय स्तरावरील खगोलभौतिक शास्त्रज्ञांच्या संघात ई. ओसिंगा, आर. जे. व्हॅन वीरेन (लायडन वेधशाळा-नेदरलँड्स), एफ. वाझा, एम. ब्रिएन्झा, जी. ब्रुनेटी, ब्रॉटियान, बॉनफेड, रिस्ले, डी. डल्लाकासा, मिले, रॉसेटी, कॅझ्यानो (बोलोग्ना विद्यापीठ-इटली), फॉरमन (स्मिथॉनसीएन खगोलभौतिकी केंद्र-हावर्ड ) ए. द्राबेंट, बॉनासीएक्स (युरिंगर वेधशाळा-जर्मनी), एस. राजपुरोहित (लॉरेन्स बर्कले प्रयोगशाळा- बर्कले) तसेच ए. एस. राजपुरोहित (भौतिकीय संशोधन प्रयोगशाळा-अहमदाबाद) यांचा संशोधनात सहभाग आहे.
खालील मान्यवरांनी मत व्यक्त केले
जीएमआरटीद्वारे निरीक्षण केल्यानंतर ‘एबेल:२२५६’ या दीर्घिका समूहातील दीर्घिकांच्या टकरी किंवा विलीनीकरणाबद्दल अधिक सखोल माहिती मिळू लागली आहे. अन्य दुर्बिणींपेक्षा नवीन निष्कर्ष ‘एबेल:२२५६’च्या आकारविज्ञानबद्दल अधिक आगळीवेगळी माहिती देणारे आहेत. या दीर्घिका समुबातच्या भूतकाळात झालेल्या भौतिकीय घडामोडी समजतील.
- कमलेश राजपुरोहित, रेडिओ खगोलशास्रज्ञ
अद्ययावत केलेल्या जीएमआरटीच्या अधिक संवेदनशील इलेक्ट्रॉनिक्स प्रणालीमुळे ‘एबेल:२२५६’ प्रमाणेच आणखी नवनवीन दीर्घिकासमूहांचे वेध घेता येतील. जीएमआरटीमुळे निम्न वर्णपटातील रेडिओ लहरींद्वारे खगोलीय निरीक्षणांसाठी ही खास सुविधा निर्माण झाली आहे.
- डॉ. यशवंत गुप्ता, ज्येष्ठ रेडिओखगोलशास्रज्ञ, जीएमआरटीचे संचालक प्रमुख
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.