IISER Pune sakal
पुणे

IISER Pune : डिटेक्टरपेक्षा संवेदनशील मायक्रोक्रिस्टलचा शोध ; ‘आयसर पुणे’ची मोठी झेप, स्थिर ‘पेरोस्काईट’ बनविण्यात भारताला यश

इलेक्ट्रॉनिक उपकरणांतील डिटेक्टर, एलईडी लाईट्स आणि सोलर सेलमध्ये सिलिकॉन फोटोडिटेक्टर्सचा वापर होतो. मात्र त्याला काही मर्यादा आहेत.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : इलेक्ट्रॉनिक उपकरणांतील डिटेक्टर, एलईडी लाईट्स आणि सोलर सेलमध्ये सिलिकॉन फोटोडिटेक्टर्सचा वापर होतो. मात्र त्याला काही मर्यादा आहेत. इलेक्ट्रॉनिक्स उपकरणाची कार्यक्षमता, वेग आणि उत्पादकता वाढविण्यासाठी जगभरात पेरोस्काईट (सीझियम लीड ब्रोमाइड) या नव्या पदार्थावर संशोधन चालू आहे. मात्र उच्च तापमानाला त्याची स्थिरता टिकत नसल्याने शास्त्रज्ञांना यश मिळत नव्हते. अखेरीस पुण्यातील शास्त्रज्ञांनी सीझियम लीड ब्रोमाइडचा मायक्रोक्रिस्टर बनविण्यात यश आले असून, तो सिलिकॉन डिटेक्टरपेक्षा १०० पटींनी संवेदनशील आहे.

भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेचे (आयसर) शास्त्रज्ञ डॉ. अतिकुर रेहमान यांच्या नेतृत्वात गोकूळ अनिलकुमार यांनी हे संशोधन केले. आयसर पुणेचे प्रा. पवन कुमार, आयसर मोहालीचे डॉ. गौतम शीट आणि अमेरिकेतील ब्रुकहेवन नॅशनल लॅबोरेटरीचे डॉ. सूयोन ह्वांग यांचाही शोधात मोठा वाटा आहे. सीझियम लीड ब्रोमाइडचा सूक्ष्म स्फटिक बनविण्यासाठी शास्त्रज्ञांच्या या गटाने नवीन पद्धत विकसित केली आहे. त्यांचे हे संशोधन नुकतेच ॲडव्हान्स मटेरिअल्स या शोधपत्रिकेत प्रकाशित झाले आहे.

उच्च-गुणवत्तेच्या सीझियम लीड ब्रोमाईड मायक्रोक्रिस्टल्स वाढवण्याची क्षमता ही या संशोधनाची प्रमुख उपलब्धी आहे. पदार्थ विज्ञानामध्ये हा एक मैलाचा दगड असून, नवीन पिढीतील ऑप्टोइलेक्ट्रॉनिक उपकरणे विकसित होण्याचा मार्ग खुला झाला आहे. यामुळे अधिक कार्यक्षम एलईडी आणि प्रकाशासाठी अतिसंवेदनशील सेन्सर विकसित होतील.

- डॉ. अतिकुर रहमान, शास्त्रज्ञ, आयसर पुणे

काय आहे सीझियम लीड ब्रोमाईड

  • एक प्रकारचे पेरोस्काईट मटेरिअल आहे.

  • प्रकाशाच्या बाबतीत अतिसंवेदनशील असलेल्या या पदार्थात उत्कृष्ट ऑप्टो इलेक्ट्रॉनिक्स गुण असतात.

  • आजवर उच्च तापमानाला स्थिर राहत फेरोइलेक्ट्रिक गुण आणि अल्ट्रा डार्क करंट मिळत नव्हते. नव्या संशोधनातून त्यावर मात केली आहे.

संशोधनाची वैशिष्ट्ये

  • सॉल्वोथर्मल संश्‍लेषण पद्धतीचा वापर करत सीझियम लीड ब्रोमाईडची निर्मिती

  • वातावरणीय तापमानालाही याची निर्मिती करणे शक्य

फायदा काय?

  • प्रथमच उच्च तापमानाला आवश्यक गुण दर्शविणाऱ्या पेरोस्काईट निर्मितीच्या प्रक्रियेचा शोध

  • फेरोइलेक्ट्रीक प्रॉपर्टीज दर्शविणारे हे मायक्रोक्रिस्टल्स इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांची क्षमता वाढविणार

  • नव्या पिढीतील डिटेक्टर, एलईडी लाईट्स आणि सोलर सेल बनविण्यासाठी उपयुक्त

  • कमी खर्चात जास्त कार्यक्षम डिटेक्टर्सची निर्मिती शक्य

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Indians Squad IPL 2025: मुंबई इंडियन्सचा संघ दिसतोय तगडा, RCB च्या स्टार खेळाडूला सोबत घेऊन मारली बाजी

IND vs AUS : लपक-झपक... Dhruv Jurel चा अविश्वसनीय झेल, ऑस्ट्रेलियन फलंदाजही स्तब्ध, Video viral

IPL 2025 Auction Live: एकाच डावात १० विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजासाठी चेन्नई-मुंबईमध्ये चढाओढ! कोण आहे Anshul Kamboj?

Beed News: पत्नीला अर्धांगवायू झाल्याचे समजताच पतीचा हृदयविकाराने मृत्यू; अंबडमध्ये धक्कादायक घटना

फडणवीस मुख्यमंत्री झाल्यास शिंदेंसाठी भाजपचा 'प्लॅन बी' तयार, दिल्लीत हालचाली वाढल्या!

SCROLL FOR NEXT