Crime News  esakal
पुणे

Pune Crime : पिस्तुलाचा धाक दाखवून पत्नीवर लैंगिक अत्याचार; पतीसह चारजणांविरुध्द गुन्हा

सकाळ वृत्तसेवा

पुणे - पिस्तुलाचा धाक दाखवून पतीने लैंगिक अत्याचार केले. तसेच, जबरदस्तीने कुलमुखत्यारपत्र करून वडिलांचे हॉटेल स्वत:च्या नावावर करून घेतले. इतकेच नव्हे तर चार मोटारींची परस्पर विक्री करून आणि दागिने घेवून पतीने सहा कोटी ९५ लाख रुपयांची फसवणूक केली, अशी तक्रार पत्नीने दिली आहे. त्यावरून शिवाजीनगर पोलिसांनी गोपाळकृष्ण गोखले (एफसी रोड) रस्त्यावरील एका प्रसिद्ध हॉटेलचालक पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणी ३४ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार शिवाजीनगर पोलिस ठाण्यात पती (वय ३८) याच्याविरुध्द लैंगिक अत्याचार आणि फसवणूक केल्याचा तर दीर, सासू-सासरे यांच्याविरुध्द कौटुंबिक छळ आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २०१८ पासून १८ जून २०२३ या कालावधीत घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पतीने फिर्यादी महिलेला लग्नापूर्वी फेब्रुवारी २०१८ मध्ये घरी दारू आणि ड्रग्ज पाजून जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. फिर्यादी महिला ही गर्भवती झाल्यानंतर तिच्याशी लग्न केले. त्यानंतर या पीडित महिलेचा सासरी पती, दीर आणि सासू-सासऱ्यांकडून कौटुंबिक छळ करण्यात येत होता.

दरम्यान, पतीने पिस्तुलाचा धाक दाखवून लैंगिक अत्याचार केला. तिच्याकडून जबरदस्तीने कुलमुखत्यारपत्र करून वडिलांचे हॉटेल नावावर करून घेतले. तसेच, कंपनीच्या नावावरील चार मोटारींची परस्पर विक्री करून सुमारे ५ कोटी २५ लाख रुपयांची फसवणूक केली. याशिवाय, लग्नातील एक कोटी ७० लाख रुपयांचे दागिने आणि इतर वस्तू पतीकडेच असून, एकूण सहा कोटी ९५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangola Politics : आडम मास्तरांच्या 'त्या' घोषणेमुळे मविआत वादाची ठिणगी; काँग्रेस नेत्यांच्या भेटीगाठी व्यर्थ?

IND vs NZ 2nd Test : Rishabh Pant पुणे कसोटीला मुकणार? गौतम गंभीर, रोहित शर्मा यांना अजित आगरकरच्या 'त्या'सूचना अन्...

Latest Maharashtra News Updates : सलग दोन दिवस पुण्यातील नेत्यांशी राज ठाकरे यांची चर्चा

Silver Price Today: चांदी 100000 रुपयांच्या जवळ; दोन दिवसांत दिला 6000 रुपयांचा नफा, भाव का वाढत आहेत?

Shindkheda Assembly Election 2024 : इच्छुकांच्या गर्दीने झालाय तिढा

SCROLL FOR NEXT