सामुग्री  sakal
पुणे

Pune : सिंहगडावरील चोरीच्या घटनेचा तपास तातडीने करा

कचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या साडे सात लाख रुपयांची सामुग्रीचा तपास करा

राजेंद्रकृष्ण कापसे : सकाळ वृत्तसेवा

खडकवासला : सिंहगडावरील कचरा प्रक्रिया प्रकल्पाची सुमारे साडे सात लाख रुपयांची नवीन सामुग्री साहित्य चोरीला गेले आहे. तपासाची माहिती घेण्यासाठी शनिवारी संध्याकाळी आमदार भीमराव तापकीर यांनी थेट हवेली पोलिस ठाणे गाठले आहे. घटनेच्या तपासात प्रगती न दिसल्याने हवेली पोलिसांनी घटनेचा तपास लवकर न केल्यास आंदोलनाचा इशारा देखील त्यांनी पोलिस व वनविभागाला दिला आहे.

वनविभागाच्या अनेक गंभीर चुका झाल्या आहेत. म्हणून शिवप्रेमी संघटना व स्थानिकांनी आमदार भीमराव तापकीर यांचे या घटनेकडे लक्ष वेधले आहे. कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारणी सुरु होती. त्यावेळी साडे सात लाख रुपयांची सामुग्री २२ डिसेंबर रोजी चोरीला गेल्याची उघडकीस आली आहे. त्याच दिवशी त्याची हवे;हवेली पोलिस ठ्ण्यात तक्रार दिली आहे.

गडाच्या सुरक्षेचा मुद्दा पुढे आला आहे. म्हणून आमदार तापकीर यांनी पोलिस निरीक्षक सदशिव शेलार, सहायक पोलिस निरीक्षक निरंजन रणवरे यांच्याकडे चोरीच्या घटनेच्या तपासाबाबत चौकशी केली. वन विभागाने ग्रामीण पोलिस दलात तक्रार दिली आहे. चोरीच्या घटनेबाबत स्थानिक ग्रामस्थ, शिवप्रेमी व जनतेच्या मनात विविध प्रश्न निर्माण होत आहे. तपास तातडीने पुर्ण करा. अशी मागणी जोर धरत आहे.

कचरा प्रक्रिया प्रकल्प व चोरीच्या या घटनेबाबत आमदार तापकीर यांनी पोलिस ठाण्याला पत्र दिले आहे. त्यात त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. तपासाबाबत माहिती घेतली. याघटनेचा पंचनामा वाचला असता. त्यात ही त्रुटी आढळल्या आहेत.

सिंहगडाच्या वाहनतळावर वन विभागाच्या माध्यामतून कचरा प्रक्रिया प्रकल्पाचे उभारला जात होता. जिल्हा नियोजन समिती तसेच वनसंरक्षण समिती घेरा सिंहगड यांचे माध्यमातून केला जात होता. असे समजते, चोरीला गेलेल्या सामुग्रीची किंमत अंदाजे सात ते आठ लाख रुपये आहे. प्रत्यक्षात प्रकल्प कोणाच्या सूचना, मागणीनुसार होता, कोणती योजना उपक्रमातून सुरु होता. याची स्थानिक गावकऱ्यांना माहिती नव्हती.

प्रकल्पाचे उभारणीचे काम पुर्ण होऊन प्रकल्प सुरू झाला की नाही, हे ही अद्याप स्पष्ट न झालेले नाही. ठेकेदार प्रकल्प उभारत आहे की, हा प्रकल्प उभारून संबंधित ठेकेदाराने तो वनविभाग किंवा वनसंरक्षण समिती घेरा सिंहगडकडे सुपुर्द केला होता. त्यानंतर ही सामुग्री चोरीला गेली. याचा सखोल तपास होणे आवश्यक आहे. गडावर येणाऱ्या पर्यटकांकडून वनसंरक्षण समिती उपद्रव शुल्क जमा करते. त्यामुळे जमा उपद्रव शुल्काचा विनियोग योग्य प्रकारे होणे गरजेचे आहे. सिंहगडावर आकाशवाणी, दुरदर्शन व महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची इतर शासकीय अस्थापने देखील असल्याने सिंहगड किल्ल्याची एकुणच सुरक्षा व्यवस्था खुपच महत्त्वाची आहे.

घेरा सिंहगड वनसंरक्षण समितीचे कर्मचारी उपद्रव शुल्क बँकेत भरण्यासाठी जात होते. त्यांच्यावर हल्ला करून साधारण पाऊणेदोन लाख रूपयांची रक्कम लुटली होती. हि घटना सहा ते सात वर्षापुर्वी झाली होती. या घटनेचा खोलवर तपास न झालेला नाही. यातील आरोपी अद्यापही सापडले नाहीत. म्हणून पर्यटकांकडुन जमा होत असलेल्या उपद्रव शुल्काचा योग्य विनियोग आणि एकुणच पारदर्शकता यासंदर्भात शिवप्रेमी व जनतेच्या मनात काही प्रश्न निर्माण होत आहेत. सिंहगडच्या सुरक्षेचा मुद्दा या निमित्ताने पुन्हा ऐरणीवर आला आहे. याघटनेचा तपास हवेली पोलीसांनी तातडीने पुर्ण करावा. अन्यथा स्थानिक गावकरी, शिवप्रेमी व पर्यटकांचे समवेत लोकप्रतिनिधी म्हणून मी आंदोलनाद्वारे याविषयी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी पुढाकार घ्यावा लागेल. आमदार तापकीर यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT