ही घटना मंगळवारी दुपारी साडेचारच्या सुमारास घडली
कुरकुंभ : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मळद ( ता.दौंड ) हद्दीतील रेल्वे उड्डाण पुलावर भरधाव वेगात जाणाऱ्या डंपरचा अचानक स्टेअरिंग रोड तुटल्याने डंपरने दुभाजकावरून दुसर्या लेनमधील सुरक्षाकठड्यावर अडकल्याने व विरोधी लेनमधून वाहन नसल्याने सुदैवाने मोठी दुर्घना टळली. ही घटना मंगळवारी दुपारी साडेचारच्या सुमारास घडली.
मळद हद्दीतील रेल्वे उड्डाणपुलावर महामार्गावर सोलापूरकडून पुण्याकडे भरधाव वेगात जाणाऱ्या डंपरचा ( एमएच. 12, एफझेड. 8922 ) अचानक स्टेअरिंग रोड तुडला. त्यामुळे चालकाचा ताबा सुटल्याने डंपर रस्त्याचा दुभाजक तोडून दुसर्या लेनमध्ये घुसला. उड्डाण पुलाच्या सुरक्षा कठडयावर मध्यभागी अडकला. अन्यथा डंपर पुलावरून तीसपस्तीस फुट खाली कोसळला असता.
दुदैवाने समोरील लेनमधून येणारे कोणतेही वाहन नसल्याने मोठी दुर्घटना टळली. तसेच डंपर सुरक्षा कठडयावर अडकल्याने चालकाचे प्राण वाचले. या अपघातात वाहनाचे नुकसान झाले असलेतरी चालकाचे प्राण वाचल्याने मोठा अनर्थ टळला.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.