pune sakal
पुणे

Pune : कृषी कायद्यांना एकजुटीने विरोध

विविध राजकीय पक्षांसह कामगार संघटनांचाही बंदला पाठिंबा

सकाळ वृत्तसेवा

पुणे : केंद्रीय कृषी कायदे मागे घ्या, विविध सरकारी आस्थापनांचे खासगीकरण थांबवा, बेरोजगारीला आळा घाला, रेल्वे-विमानतळ-बँका-एलआयसी अशा सार्वजनिक संपत्तीची विक्री करू नका अशा विविध मागण्यांसाठी सोमवारी विविध पक्षांनी मंडईत आंदोलन केले.

किसान संयुक्त मोर्चाने सोमवारी भारत बंदची हाक दिली. या आवाहनाला प्रतिसाद म्हणून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस, साम्यवादी पक्ष, आम आदमी पक्ष, जनता दल धर्मनिरपेक्ष, शिवसेना यासह विविध पक्षांचे शहर प्रमुख आणि पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभाग घेतला. पक्ष, अंगमेहनती कष्टकरी संघटना आदींनी एकत्र येऊन शेतकरी बचाव संयुक्त कृती समिती स्थापन केली आहे. नितीन पवार यांनी प्रस्तावना केली. अभय छाजेड यांनी भूमिका मांडली. स्वप्नील फुसे यांनी सूत्रसंचालन केले. सचिन गाडे यांनी आभार मानले.

असंतोष प्रकट सभा

आंदोलनानंतर असंतोष प्रकट सभा घेण्यात आली. सभेत राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, शिवसेनेचे गजानन थरकुडे व बाळासाहेब भांड, जनता दल धर्मनिरपेक्षचे शहराध्यक्ष विठ्ठल सातव, आपचे शहराध्यक्ष मुकुंद किर्दंत, माकपचे जिल्हा सचिव ॲड. नाथा शिंगाडे, भारतीय साम्यवादी पक्षाचे अरविंद जक्का, कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे निमंत्रक प्रा. अजित अभ्यंकर, मेधा थत्ते, नीरज जैन व अलका जोशी, शिरीष राणे यांनी सभेत मार्गदर्शन केले. हमाल पंचायत, कागद काच पत्रा कष्टकरी पंचायत, मोलकरीण संघटना, रिक्षा पंचायत आदी संघटनांचे कार्यकर्ते सभेत सहभागी होते.

संमिश्र प्रतिसाद

किसान मोर्चाने केलेल्या बंदच्या आवाहनाला पुण्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. पुण्यातील मुख्य घाऊक धान्य बाजार, भाजीपाला आणि फळे बाजार येथे कडकडीत बंद ठेवण्यात आले होते. व्यापारी पेठाही अंशतः बंद होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: पुन्हा निवडणुका घ्या, हा जनमताचा कौल नाही - संजय राऊत

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Election Result 2024: एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांचं काय झालं? महाराष्ट्राचा कल काय सांगतोय? जाणून घ्या

Maharashtra Assembly Results: लाडकी बहीण पावली! महायुतीला 'एक हे तो सेफ हे'ची जोड अन् झटक्यातच मविआचा हिरमोड

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

SCROLL FOR NEXT