Pune Student initiative to helping People to Avoid Suicide and facing Depression, loneliness  
पुणे

 Tell Me Your Story : डिप्रेशन दूर करायचे 'राज'; पुण्यातील तरुणाचे कौतुकास्पद 'मिशन'

शरयू काकडे

पुणे : तुम्हाला नैराश्य आले आहे का? तुम्हाला सतत एकटेपणा जाणवतो का? तुमच्या मनात आत्महत्या करण्याचे विचार येतात का? तुम्हाला जाणावणाऱ्या एकटेपणाचे मुख्य कारण म्हणजे तुमच्याजवळ कोणी बोलायला नाही? तुमचे म्हणणे ऐकून घेणारे कोणीही जवळ नाही, पण तेच तुमच्यासोबत आपुलकीने बोलणार कोणी असेल, तुम्हाला आजिबात जज् न करता तुमचे म्हणणे ऐकूण घेणारा कोणी अनोळखी व्यक्ती भेटला तर...? तुम्हाला अशा व्यक्तीशी बोलून नक्कीच चांगले वाटेल, हो ना!

तुमच्या मनातील सगळ ऐकूण घेणारा असा एक व्यक्ती तुम्हाला पुण्यात एफसी रोड येथे भेटेल. तुम्हाला फक्त त्याला भेटायचे आहे आणि तुमच्या मनातील सार काही त्याला सांगायचे आहे. तुमचे सारे म्हणणे तो शांतपणे ऐकतो आणि तुम्हाला 10 रुपये सुध्दा देतो. तुम्हाला चेष्टा वाटतेय ना? चेष्टा नाही पण हे खरंचं आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुण्यात सध्या सोशल मिडियावर ''Tell Me Your Story and I Will give You 10 Rupees'' असा बोर्ड हातात घेऊन थांबलेल्या मुलाचे फोटो व्हायरल होत आहे. त्याचे नाव आहे राज विनायक डगवार. पीआयसीटी (Pune Institute of Computer Technology) कात्रज, येथे कॉम्प्युटर इंजिनिअरींगच्या अंतिम वर्षाचा अभ्यास करणारा हा विद्यार्थी.  वीक एंडला किंवा जमेल तेव्हा तो एफसी रोडला हा बोर्ड हातात घेऊन थांबतो. त्याकडे  येणाऱ्या लोकांशी तो आपुलकीने बोलतो, त्यांच्या मनातील दुखं व्यक्त करण्यासाठी त्यांना मदत करतो आणि त्यांचे म्हणणे फक्त शांतपणे ऐकूण घेऊन घेतो. त्यानंतर त्याच्याकडे बोलायला येणाऱ्या व्यक्तीला साहाजिकच मन मोकळं करुन खूप हलकं वाटते. 

सध्या लॉकडाऊनच्या काळात लोकांमध्ये डिप्रेशन, एकटेपणाची भावना जास्त जाणवत आहे. नैराश्य आणि एकटेपणामुळे काहींनी आत्महत्या देखील केल्या आहेत. असेच एकटेपणा आणि नैराश्य राजला देखील जाणवत होते. आपल्याला कोणाशी तरी बोलायचे आहे, कोणाला तरी मनातील सांगायचे असे तेव्हा त्याला जाणवत होते. सोशल मिडियावर 'Tell Me Your Story and I Will give You 1 Dollar' असा परदेशातील एका व्यक्तीचा फोटो त्यांने पाहिला आणि त्याने ठरवले की, आपणही लोकांचे म्हणणे ऐकून घ्यायचे. लोकांना जाणवणारा एकटेपणा दुर करण्यासाठी, नैराश्यातून त्यांना बाहेर काढण्यासाठी त्याने मदत करण्याचे ठरवले. नुसते ठरवलेच नाही तर ते त्याने करुनही दाखवले. त्याच्या या प्रयत्नाला लोकांनीही चांगला रिस्पॉन्स दिला. काही लोकांनी त्याच्या सोबत फोटो काढून, सेल्फी काढून त्याचे फोटो सोशल मिडियावर पोस्ट करुन त्याचे कौतुकही केले.

''सध्या लोकांमध्ये डिप्रेशन आणि एकटे असल्याची फिलिंग खूप वाढत आहेत. त्यामुळे त्याच्या मनात चुकीचे विचार येतात. त्यांच्याशी थोडावेळ बोलले, त्यांचे म्हणणे ऐकून घेतलेतर त्यांचे मन मोकळे होते. मला त्यासाठी लोकांना फक्त थोडासा वेळ द्यावा लागतो. माझ्याशी बोलणाऱ्या व्यक्ती खूप नैराश्यात असतात. काहींना काहीच सूचत नसते, घरी जावेसे वाटत नाही. पण थोडा वेळ अनोळखी व्यक्तीशी मनातील सार काही शेअर केल्यामुळे त्यांच्या मनावरील ताण कमी होतो.  त्यांनतर त्यांना खूप बरे वाटते त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारे हे समाधान पाहून मला देखील आनंद मिळतो. 
- राज डागवार, विद्यार्थी

''मी राजला एका मुलीची गोष्ट ऐकताना आणि हातात बोर्ड धरून उभा पाहिलं आणि माझ्यात एक कुतूहल वाढलं. मी राजशी बोलायला गेलो आणि माझा अंदाज होता की हा एकतर सायकॉलॉजीचा विद्यार्थी असणार जो काहीतरी प्रोजेक्ट करतोय किंवा कुठल्यातरी एन जी ओ मध्ये काम करणारा. पण त्याच्याशी बोलून कळालं की असे काहीच नाहीये आणि तो हे सर्व स्वतःहून करतोय. तिथेच त्याने मन जिंकलं आणि मी त्याच्याबद्दल सोशल मीडियावर लिहायचं ठरवलं. त्याने सुद्धा छान फोटो दिला मला आणि तो असंच काम पुढे करत राहील असेही मला आश्वासन दिले.''
- आदित्य महाजन, नागरिक
 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivajinagar Assembly Election 2024 Result: सिद्धार्थ शिरोळे 36 हजार मतांनी विजयी; सलग दुसऱ्यांदा आले निवडून

Assembly Election Result Viral Memes : महायुतीचा एकतर्फी विजय अन् महाविकास आघाडीचा सपशेल पराभव; सोशल मीडियावर आली Memes ची लाट

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: बेलापूरमध्ये भाजपच्या मंदा म्हात्रे विजयी

Rajesh Kshirsagar Won Kolhapur North Assembly Election : 'कोल्हापूर उत्तर'मधून राजेश क्षीरसागर तब्बल 30 हजार मतांनी विजयी; लाटकरांचा केला पराभव

karmala Assembly Election 2024 Result Live: करमाळ्यात नारायण आबा पाटील यांचा विजय, संजयमामा शिंदे यांना धोबीपछाड, बागल गटाचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT