Pune - शहर पोलिस दलातील एका कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याची घटना लोहगाव परिसरात शुक्रवारी पहाटे घडली. या आत्महत्येमागचे निश्चित कारण समजू शकले नाही. आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.
वैभव दिलीप शिंदे (वय २९, रा. खेसे कॉलनी, लोहगाव) असे आत्महत्या केलेल्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. वैभव शिंदे, त्यांची पत्नी कांचन, भाऊ आणि चार वर्षांचा मुलगा असे सर्वजण खेसे कॉलनी परिसरात राहतात.
वैभव शिंदे हे पुणे शहर पोलिस दलात मोटार परिवहन विभागात कार्यरत होते. शिंदे यांनी घराच्या छताजवळ असलेल्या चिंचेच्या झाडाला टॉवेल बांधून गळफास घेतल्याचा प्रकार सकाळी उघडकीस आला.
त्यांनी आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहिल्याचे आढळून आले आहे. ‘पत्नी कांचन मला माफ कर. भाऊ आणि आई मला माफ करा. माझी शेवटची इच्छा पूर्ण करा’, असे त्या चिठ्ठीत नमूद केले आहे. दोन महिन्यांपूर्वी त्यांची मूळव्याधीवरील शस्त्रक्रिया झाली होती. ते पोलिस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेची तयारी करीत होते. त्यांच्या आत्महत्येमागचे कारण समजू शकले नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.