पुणे- शहरातील वानवडी परिसरात एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलाने टँकर चालवून अनेकांना धडक दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, टँकरने सकाळी व्यायामासाठी निघालेल्या काही मुलांना धडक दिली आहे. शिवाय, टँकरने एका टू-व्हिलरला उडवलं आहे. पुण्यात अल्पवयीन मुलाने दोघांना चिरडल्याची घटना गाजत असतानाच हा प्रकार घडला आहे. 'साम टीव्ही'ने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलगा टँकर चालवत होता. त्यावेळी टँकर अनियंत्रित झाला. टँकरने टू-व्हीलरवरील पती-पत्नीला उडवलं. तसेच काही मुलं व्यायाम करण्यासाठी तालमीत निघाले होते. त्यांना देखील टँकरने उडवलं आहे. जखमींना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. सकाळी सहा-साडेसहाच्या सुमारास हा अपघात घडलाय.
तालमीत शिकणारी काही मुले रस्त्यावरून जात होती. त्यावेळी मागून भरधाव घेणाऱ्या टँकरने मुलांना धक्का दिला. त्यानंतर टँकर पुढे जात टू-व्हीलरला धडकला. माहितीनुसार, टू-व्हीलरवर पुणे महापालिकेचे अधिकारी संतोष ढुमे आणि त्यांच्या पत्नी होत्या. धडकेमध्ये ढुमे यांच्या पत्नी टू-व्हीलरवरून खाली पडल्या. त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
स्थानिकांनी हा टँकर अडवून अल्पवयीन मुलाला बाहेर काढले आणि त्याला पकडून ठेवले. त्यानंतर पोलिसांना यासंदर्भातील माहिती देण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलासह त्याच्या वडिलांना पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले आहे. सदर प्रकरणामुळे स्थानिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. अशा घटनांवर कधी लगाम लागणार असा प्रश्न विचारला जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.