Temghar dam sakal
पुणे

पुणे : टेमघर धरण काल शंभर टक्के भरले

गेल्यावर्षीपेक्षा सुमारे महिनाभर अगोदरच ओव्हफ्लो

धोंडिबा कुंभार

पिरंगुट : पुणे शहराला वरदान ठरलेले आणि मुठा खोऱ्यातील शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी लाभदायक झालेले टेमघर धरण काल रविवार दिनांक १९ रोजी पहाटे तीन वाजता पूर्ण क्षमतेने भरले आहे. धरणात शंभर टक्के पाणीसाठा झाल्याने हे धरण 'ओव्हर फ्लो ' झाले असून आज सकाळी सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे. त्यामुळे पुणेकरांसह मुठा खोऱ्यातील पाण्याची टंचाई दूर होणार आहे. गेल्यावर्षी हे धरण सप्टेंबर महिन्यात (दिनांक १३ सप्टेंबर २०२१) रोजी भरले होते. सध्या या धरणामध्ये ३.७१ टीएमसी म्हणजेच १०० टक्के इतका पाणीसाठा झाला आहे.

न २०१९ मध्ये या धरण क्षेत्रात ३३०० मीमी पाऊस झाल्यावर हे धरण ५ ऑगस्ट रोजी भरले होते. मात्र त्यावेळी गळतीमुळे ग्राऊटिंगच्या कामासाठी या धरणाचे पाणी ऐन दिवाळीच्या आसपास सोडून द्यावे लागले होते. पाटबंधारे विभागाच्या दाव्यानुसार, गेल्या दोन वर्षांपासून या धरणाची गळती ९५ टक्के थांबली आहे. या हंगामात धरण परिसरात आज सकाळी झालेल्या नोंदीनुसार आजपर्यंत एकूण २८४७ मीमी मिमी इतका पाऊस झाला आहे.

२०१३ या वर्षात २५७५ मिमि इतका पाऊस होताच ३ ऑगस्ट रोजी हे धरण शंभर टक्के भरले होते. सन २०१४ मध्ये या धरण परिसरात २८०७ मिमि पाऊस होताच हे धरण ५ सप्टेंबर रोजी पूर्ण भरले होते. त्यानंतर गळतीचे प्रमाण मोठे असल्याने २०१४ ते २०१८ या कालावधीत या धरणाच्या ग्राउटिंगच्या कामासाठी सलग चार वर्षे पूर्ण क्षमतेने भरू शकले नाही. त्यामुळे गेल्या तीन वर्षांपासून सुमारे ९५ टक्के गळती थांबल्यामुळे या धरणात पाणीसाठा पूर्ण क्षमतेने साठवू लागला आहे. यावर्षी पानशेत व वरसगाव ही धरणे टेमघर धरणाच्या तुलनेने लवकर भरली. मात्र टेमघर धरण भरायला यावर्षी सुमारे आठवडाभर उशीर झाला आहे. तरीही गेल्यावर्षीच्या तुलनेने यावर्षी हे धरण तब्बल महिनाभर अगोदरच पूर्ण क्षमतेने भरले आहे.

पाटबंधारे विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या धरणाची एकूण पाणी साठवण क्षमता १०७.९६ दशलक्ष घनमीटर(३.८१२ टीएमसी) आहे. उपयुक्त साठ्याची क्षमता १०५.०१ दलघमी (३.७१ टीएमसी) आहे. सन २०१० मध्ये दहा मीटरने या धरणाची उंची वाढविण्यात आल्याने पाण्याची साठवण क्षमताही दीड टीएमसीने वाढली आहे. टेमघर प्रकल्प उपविभाग क्रमांक २ चे उपअभियंता एच.जी. जाधव म्हणाले, "अद्यापही या धरणाची उर्वरित ५ टक्के गळती थांबण्यासाठी यावर्षीही ग्राउटिंगचे काम हाती घ्यावे लागणार आहे. या धरणाच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव जानेवारी २०२१ मध्ये मंजुरीसाठी पाठविला आहे. शासनाची प्रशासकीय मान्यता मिळताच त्याचे काम पूर्ण करता येईल मात्र मान्यता मिळणे आणि काम पूर्ण होणे गरजेचेच आहे."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

Ghatkopar East Assembly Election 2024 Result live : घाटकोपर पूर्व मतदार संघात भाजप आणि शरद पवार गटात दुहेरी लढत

Mira Bhaindar: Assembly Election 2024 Result Live: मिरा-भाईंदर मतदारसंघात सय्यद मुजफ्फर हुसेन विरुद्ध नरेंद्र मेहता

SCROLL FOR NEXT