पुणे

पुणे : ‘सिलिकॉन व्हॅली’चे बीज

आपल्या वंशाची जन्मभूमी ही भारत आहे, तर युरोपियन भाषांचा उगम संस्कृतमधून होतो.

सकाळ वृत्तसेवा

आपल्या वंशाची जन्मभूमी ही भारत आहे, तर युरोपियन भाषांचा उगम संस्कृतमधून होतो.

विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात तब्बल ५४ प्रयोगशाळा आहेत. ‘सिलिकॉन व्हॅली’ बनण्याची क्षमता या शहरात आहे. गरज आहे ती प्रखर इच्छाशक्तीची, तसेच कालबद्ध आणि महत्त्वाकांक्षी अशा कार्यक्रमाची.

यशवंत घारपुरे

आपल्या वंशाची जन्मभूमी ही भारत आहे, तर युरोपियन भाषांचा उगम संस्कृतमधून होतो. आपल्या तत्त्वज्ञानाची पाळेमुळे भरतभूच्या मातीतच रुजली आहेत. इथलं गणित असो की ख्रिश्चन धर्मातील आदर्श, आपलं सरकार आणि लोकशाहीसुद्धा... अशा अनेक मार्गांनी भारत ही आपली माता आहे.

- विल डुरांट, अमेरिकन लेखक

पूर्वेचे ऑक्सफर्ड आणि डेट्रॉईट म्हणून विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे शहराची ओळख आहे. राज्यात मुंबईनंतरचे सर्वांत मोठे हे शहर आता ‘आयटी हब’ म्हणून विकसित होत आहे. असे जरी असले तरी ‘ज्ञानवंतांची राजधानी’ म्हणून पुण्याची खरी ओळख आहे. पारतंत्र्यातील पाचशे वर्षांच्या कालखंडामध्ये मागील दोन सहस्रकांमध्ये गणिताबरोबरच संख्याशास्त्र, स्थापत्यशास्त्र, वैद्यकशास्त्र, खगोलशास्त्र, वस्त्रोद्योग, खाणकाम आणि धातुकामात भारताचे योगदान निश्चितच आश्वासक आहे. जगात आज भारतीय बुद्धिमत्तेचा डंका आहे. विशेषतः माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रात भारतीयांनी दिलेले योगदान सर्वश्रुत आहे. अमेरिकेतील प्रसिद्ध सिलिकॉन व्हॅली उभी करण्यामध्ये भारतीयांचे योगदान निर्णायक आहे.

आज याच सिलिकॉन व्हॅलीतील ‘टॉप ६’ कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे भारतीय वंशाचे आहेत. भारतीयांनी जिथे स्थलांतर केले, तिथे स्थानिक समाजजीवनात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. उदाहरणार्थ, ब्रिटनमधील आरोग्य यंत्रणेत भारतीय डॉक्टर आणि परिचारिकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. भारतीयांनी तेथून काढता पाय घेतला, तर ब्रिटनची आरोग्य व्यवस्था अक्षरशः कोलमडेल. ‘नासा’मध्येही उत्कृष्ट अवकाश संशोधन करणारे शास्रज्ञांमध्ये भारतीय अथवा भारतीय वंशाच्या शास्रज्ञांचा टक्का निश्चितच दखल घेण्यायोग्य आहे. जगातील प्रज्ञावान क्षेत्रात भारतीय आघाडीवर दिसतात, तर दुसरीकडे असं म्हटले जाते की, परदेशात राहणारे भारतीय किंवा भारतीय वंशाच्या लोकांचे सकल उत्पन्न भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाएवढे आहे. म्हणजे परदेशस्थ भारतीय लोक आपल्या दरडोईच्या ४० पट जास्त कमावत आहे.

दुर्दैवाने भारतीय लोक परदेशात जे काम करू शकतात, ते भारतात करू शकत नाही. त्याची काही प्रमुख कारणे पुढीलप्रमाणे ब्रिटिशांनी जरी भारत सोडला असला, तरी त्यांनी दिलेली नोकरशाही अजूनही इथेच नांदत आहे. त्यामुळे संघभावनेने काम करण्याची मानसिकता अजूनही समाजात दिसत नाही. निश्चितच काही क्षेत्रात आपण प्रगती केली आहे. मात्र त्या प्रक्रियेला गती द्यायला हवी. अधिक महत्त्वाकांक्षी होत नवी उद्दिष्टे निश्चित करायला हवीत. उद्दिष्टांच्या प्राप्तीसाठी कालमर्यादा ठरवायला हवी.

कालमर्यादा ठरवून उद्दिष्टे कशी साध्य केली जातात, याची ऐतिहासिक उदाहरणे लक्षात घेण्याजोगी आहेत. त्यापैकी एक उदाहरण पाहू. ते आहे जॉन एफ. केनेडी यांचे. १९६१मध्ये त्यांनी अमेरिकेचा अंतराळवीर याच दशकात चंद्रावर पाऊल ठेवेल ही घोषणा केली. त्यावेळी रशियाने ‘लायका’ नावाचा कुत्रा अवकाशात सोडला होता. तर अमेरिकेने फक्त एक छोटासा उपग्रह! परंतु, अमेरिकेने प्रयत्नांची पराकाष्ठा केली आणि २० जुलै १९६९ ला पहिला मानव आणि अमेरिकेचा नागरिक नील आर्मस्ट्राँगने चंद्रावर पाऊल ठेवले. मोठ्या ध्येयासाठी सांघिक भावनेने प्रयत्न केले तर यश नक्की मिळते.

पोषक वातावरण

पुणे हे राष्ट्रीय चळवळींचे उगमस्थान आहे. विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात तब्बल ५४ प्रयोगशाळा आहेत. ज्यामध्ये राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेबरोबच ‘संरक्षण संशोधन आणि विकास संस्थे’च्या पाच प्रयोगशाळांचाही समावेश आहे. भांडारकर आणि गोखले इन्स्टिट्यूटसारख्या शतकांची परंपरा असलेली संशोधन केंद्रे आहेत. वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेने (सीएसआयआर) प्रमाणित केलेल्या छोट्या-मोठ्या १३७ प्रयोगशाळांचे जाळे पुण्यात आहे. ‘आयटी’बरोबरच देशातील शिक्षणाचे प्रमुख केंद्र म्हणून पुण्याकडे पाहिले जाते. १२० अभियांत्रिकी महाविद्यालये आणि नव्याने उदयात येत असलेले ई-वाहनांचे क्षेत्र हे पुण्याची विशेषता ठरते आहे.

१२ हजार ५०० उत्पादन कारखाने पुण्यात आहे. हिंजेवाडी येथे ७०० हेक्टर परिसरात वसलेले ‘आयटी हब’ आणि शहराच्या इतर भागांतही वाढत जाणारे माहिती तंत्रज्ञान क्षेत्र पुण्याच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान देत आहे. भारताची ‘सिलिकॉन व्हॅली’ म्हणून उदयास येण्यासाठी पुण्यामध्ये योग्य वातावरण उपलब्ध आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबई अवघ्या काही तासांच्या अंतरावर आहे. राहण्यायोग्य शहर म्हणून पुणे देशात नावाजलेले आहे. एवढं सगळं असतानाही सिलिकॉन व्हॅली म्हणून पुणे नावारूपाला का येत नाही? यासाठी आपल्याला काही गोष्टींवर विशेष लक्ष द्यावे लागणार आहे.

सर्वांत प्रथम एक ध्येयनिश्चिती करावी लागेल. समजा २०२८ पर्यंत आपण पुण्यात ‘सिलिकॉन व्हॅली’ निर्माण करण्याचे निश्चित केले, तर त्या अनुषंगाने सर्वतोपरी झोकून देऊन रचनात्मक काम करावे लागेल. सहकार्य आणि स्पर्धेच्या माध्यमातून विज्ञानात उत्कृष्ट कामगिरी बजावता येईल. दुर्दैवाने या दोन्हींचाही या क्षेत्रात अभाव दिसतो. आंतरविद्याशाखीय गटांची निर्मिती करत एका विशिष्ट ध्येयाने प्रयत्न करणे आवश्यक आहे. यासाठी स्पर्धा आणि परस्पर सहकार्य असणेही गरजेचे आहे. यात दोन गोष्टी प्रामुख्याने करता येतील.

विचारांची देवाणघेवाण, नवीन संकल्पना आणि परस्पर सहकार्यासाठी विज्ञान कट्टे आयोजित करणे. त्यासाठी एक वेळ आणि वारंवारिता निश्चित करणे आवश्यक आहे. प्रयोगशाळांचे वरिष्ठ शास्रज्ञ आणि संचालकांची एक फोरम स्थापन करता येईल. ज्याद्वारे शैक्षणिक आणि संशोधनासंबंधीची ध्येयनिश्चिती करता येईल. देशातील प्रतिभावान लोकांना ओळखून त्यांना योग्य संधी उपलब्ध करायला हवी. भारतीयांची बुद्धी तल्लख आहे. किमान डझनभर तरी लोक भारताच्या या ‘सिलिकॉन व्हॅली’त नावारूपाला येऊ शकतात.

(लेखक ‘टेक्नॉलॉजी ट्रान्स्फर असोसिएशन’चे अध्यक्ष आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aheri Assembly Election Results 2024 : बापाने केला लेकीचा पराभव! अहेरी मतदारसंघात धर्मरावबाबा आत्राम यांनी मारली बाजी

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मालेगावमतदार संघात शिवसेनेचे उमेदवार दादा भुसे १ लाख ६ हजार ००६ मतांनी विजयी

khadakwasla Assembly Election 2024 Result Live: खडकवासलात भाजपचा विजयाचा चौकार, भीमराव तापकीर यांनी पुन्हा मारली बाजी

Rajan Naik Nalasopara Assembly Election 2024 Result : नालासोपाऱ्याचा गड भाजपचाच; राजन नाईक यांचा दणदणीत विजय

Dapoli Assembly Election 2024 Results : दापोलीत आमदार योगेश कदमांनी राखला गड; ठाकरे गटाच्या संजय कदमांचा केला पराभव

SCROLL FOR NEXT