Pune Metro Trial Sakal
पुणे

पुणे होणार देशातील टॉपचं शहर? PMRDA चा विकास आराखडा तयार

पुढील वीस वर्षांचा विकास आरखडा अंतिम मंजुरीच्या प्रतिक्षेत

Amit Ujagare (अमित उजागरे)

पुणे मेट्रोपोलिटन रिजन (PMR) अर्थात पुणे महानगर प्रदेश महत्वाच्या बदलाच्या तयारीत आहे. ७३,००० कोटी रुपयांचा पुणे शहर आणि परिसराचा पुढील वीस वर्षांचा विकास आराखडा तयार असून मंजुरीच्या प्रतिक्षेत आहे. जर या विकास आराखड्याला मंजुरी मिळाली आणि त्याची अंमलबजावणी सुरु झाली तर त्याचा नागरिकांच्या राहणीमान आणि रोजगारावर मोठा परिणाम होईल. हा विकास आराखडा मेट्रोपोलिटन रिजन डेव्हलपमेंट ऑथरिटीनं (PMRDA) जाहीर केला आहे. या विकास आराखड्यानुसार पुणे शहर हे राहण्याासाठी सर्वाधिक योग्य शहर आणि आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांसाठी देशातील सर्वात टॉपचे शहर बनू शकतं, असा दावा पीएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. फायनान्शिएल एक्स्प्रेसनं याबाबत वृत्त दिलं आहे.

महानगर आयुक्त आणि पीएमआरडीएचे सीईओ सुहास दिवसे यांनी म्हटलं की, "या विकास आराखड्याचा मुख्य हेतू राहण्याची क्षमता वाढवणे आणि पर्यावरणाचा समतोल राखत शाश्वत विकास करणे आहे. हे सांगताना शहराच्या गेल्या काही वर्षातील अस्ताव्यस्त विकासाचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. या नव्या विकास आराखड्यामध्ये पाच लक्ष्य ठेवण्यात आले आहेत. यामध्ये सहज दळणवळण, विचारपूर्वक केलेली आर्थिक आणि रोजगार वाढ, लवचिक पर्यावरण, कार्यक्षम पायाभूत सुविधा आणि स्वयंपूर्ण गृहनिर्माण आणि सुविधा यांचा समावेश असेल"

दिवसे यांच्या म्हणण्यानुसार, "PMRDA प्रदेश हा आता देशातील तिसरा सर्वात मोठा महागनर प्रदेश असेल. ज्याचा एरिया ६,९१४.२६ चौ.किमी असेल. PMRDA क्षेत्रातील लोकसंख्या २०४१ पर्यंत ५३.७० लाख इतकी असेल. या विकास आराखड्यात स्वयंपूर्ण शहरं ज्याची स्वतःची खास आर्थिक भूमिका असेल. जो पुणे महानगरपालिका (PMC) आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका (PCMC) या महापालिका क्षेत्रांना पूरक असतील. तसेच यामध्ये दोन्ही महापालिकांच्या ५ ते १० किमीच्या परिघात आणि प्रादेशिक परिवहन कॉरिडॉरसह ५ किमीच्या आत शहराचा विकास एकत्रितपणे करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे"

18 नागरी केंद्रीय भाग एकमेकांना जोडणार

यामध्ये १८ केंद्रीकरण झालेले नागरी भाग विस्तृत दळवळणांनी एकमेकांशी जोडलेले असतील. यामध्ये चाकण, आळंदी, वाघोली, लोणी-काळभोर, खडकवासला, पिरंगुट, हिंजवडी, तळेगाव, मळवली, खोड-राजगुरुनगर, शिक्रापूर, उरुळी-कांचन, सासवड, खेड, नरसापूर, रांजणगाव, यवत केडगाव आणि यातील सर्व २३३ गावांचा समावेश आहे. तर ग्रामीण विकासाच्या केंद्रांमध्ये पाबळ, न्हावा, राहू, किकवी, सांगरुन, पौड, काले आणि कडूस यांचा समावेश असेल.

विस्तृत रस्ते आणि मेट्रोसाठी २६ योजना

या विकास आराखड्यात २६ नगरविकास योजनांचा समावेश आहे. यामध्ये १० मेट्रो रेल्वे मार्ग, दोन रिंग रोड (१२३ किमी आणि १७३ किमी), ५९ सार्वजनिक गृहप्रकल्प, १५२.१९ किमी पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे, ८९.६५ किमी क्रिसेंट रेल्वे, १२ लॉजिस्टिक्स हब आणि ९ ट्रक टर्मिनल्स यांचा समावेश आहे. हा विकास आराखडा तयार करण्यासाठी PMRDA जीआयएसवर आधारित तंत्रज्ञानाचा वापर केला आहे.

विकास आराखड्यासमोर 'ही' आहेत आव्हानं

१६ सप्टेंबरपर्यंत या विकास आराखड्यावर हरकती नोंदवण्याची शेवटची तारीख होती. त्यानंतर आता हा आराखडा अंतिम मुजरीसाठी पाठवण्यात आला आहे. पण आता या आराखड्यात जमीन अधिग्रहण, जमीनींवरील आरक्षण, जमीनींचे क्षेत्रीकरण करणे ही आव्हान असणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT