Pune tops in startups in state sakal
पुणे

राज्यात स्टार्टअपमध्ये पुणे अव्वल

औरंगाबाद, नागपूर वगळता मराठवाडा, विदर्भातील अन्य जिल्हे मागे

शेखलाल शेख

औरंगाबाद : राज्यात गेल्या चार वर्षांत स्टार्टअपची संख्या वाढती आहे. यामध्ये पुणे जिल्हा अव्वलस्थानी असून दोन वर्षांत तेथे सर्वाधिक १ हजार ७९७ स्टार्टअप झाले आहेत. त्याखालोखाल मुंबई १ हजार ७५०, ठाणे ८७०, मुंबई उपनगरात ५३२ स्टार्टअप नोंदणीकृत आहेत. तुलेनेत नागपूर आणि औरंगाबाद वगळता मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांत स्टार्टअपची संख्या कमी आहे.

राज्यात २०१६ पासून स्टार्टअपची संख्या वाढत आहे. नवीन्यपूर्ण संकल्पना घेऊन तरुण स्टार्टअप सुरू करत आहे. आर्थिक अडचणी असल्या तरी तरुणांनी स्टार्टअप यशस्वी केले आहेत. सध्या राज्यात १३ हजार ५१९ मान्यताप्राप्त स्टार्टअप आहेत. २०१६ मध्ये राज्यात फक्त ८६ स्टार्टअप होते. २०१७ मध्ये १ हजार ५८, २०१८ मध्ये १ हजार ६२०, २०१९ मध्ये २ हजार १२९, २०२० मध्ये २ हजार ६८५, २०२१ मध्ये ३ हजार ७२१, २०२२ मध्ये २ हजार २२० स्टार्टअपला मान्यता मिळाली.

राज्यात २०२१ आणि २०२२ मध्ये सर्वाधिक १ हजार ७९७ स्टार्टअप पुणे जिल्ह्यात झाले. त्याखालोखाल मुंबई १ हजार ७५०, ठाणे ८७०, मुंबई उपनगर ५३२, नागपूर २८६, नाशिक २०४, रायगड १६६, औरंगाबादेत १५५ स्टार्टअप आहेत. यानंतर पालघर आणि कोल्हापूरचा क्रमांक लागतो. मराठवाड्यात औरंगाबाद आणि विदर्भात नागपूर वगळता इतर जिल्ह्यांत स्टार्टअपची संख्या तुलनेत खूप कमी आहे.

छोट्या शहरांत वाढ

देशभरात नवीन आगळीवेगळी संकल्पना असलेल्या तरुणांचा स्टार्टअप सुरू करण्याकडे कल वाढतोय. डीपीआईआईटीद्वारे देशात ७२ हजार ९९३ स्टार्ट नोंदणीकृत आहेत. त्यापैकी दिल्ली ४८ टक्के ३४ हजार ४७३ मान्यताप्राप्त स्टार्टअप हे दिल्ली, मुंबई, कोलकता, चेन्नई, हैदराबाद, बेंगळूरू, पुणे आणि अहमदाबाद या महानगरात आहे. यानंतर पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक स्टार्टअप हे टियर-२ आणि टियर-३ शहरात आहेत. देशात २०१६ मध्ये फक्त ४७१ स्टार्टअप होते. ३० जून २०२२ पर्यंत ही संख्या ७२ हजार ९९३ वर गेली. देशातील ६४९ जिल्ह्यांत हे स्टार्टअप आहेत. ५६ प्रकारांतील या स्टार्टअपपैकी ३ हजार ३०० हे जलवायूसंबंधी आहेत. इंटरनेट ऑफ थिंग्स (आईओटी), रोबोटिक्स, आर्टिफिशयल इंटेलिजेंस, ॲनालिटिक्स अशा क्षेत्रासंबंधी ४ हजार ५०० स्टार्टअप आहेत.

राज्यात दोन वर्षांतील मान्यताप्राप्त स्टार्टअप

  • जिल्हे वर्ष २०२१ वर्ष २०२२

  • पुणे ७७५ १०२२

  • मुंबई ७४९ १००१

  • ठाणे ३५० ५२०

  • मुंबई उपनगर २४५ २८७

  • नागपूर १२४ १६२

  • नाशिक ८२ १२२

  • रायगड ६९ ९७

  • औरंगाबाद ४० ८५

  • पालघर ३९ ३२

  • कोल्हापूर २८ ४७

  • अहमदनगर २१ ३५

  • जळगाव १७ २९

  • सांगली १५ ३२

  • सोलापूर १८ २६

  • सातारा १३ २५

  • नांदेड १० १८

  • बुलडाणा १० १७

  • अकोला ४ १८

  • बीड २ १०

  • भंडारा ६ ५

  • चंद्रपूर ४ १४

  • धुळे ६ ८

  • गडचिरोली ४ १

  • गोंदिया ९ १३

  • हिंगोली ० ४

  • जालना २ ९

  • लातूर ८ १०

  • नंदुरबार २ ६

  • उस्मानाबाद १ ९

  • परभणी ५ ७

  • रत्नागिरी ७ ८

  • सिंधुदुर्ग ३ ५

  • वाशिम ३ १

  • वर्धा ३ ८

  • यवतमाळ ३ ८

  • एकूण २,६८५ ३,७२१

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT