गणेशोत्सवानिमित्त पुण्यातील मध्यवर्ती भागात गणपतीच्या दर्शनासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. नागरिकांच्या गर्दीमुळे वाहतूक व्यवस्था अनेक ठिकाणी कोलमडून पडत असल्यानं पोलिसांकडून नागरिकांना पदपथावरून जाण्याचं आवाहन केलं जात आहे. तसंच अनावश्यक गर्दी टाळण्याचे आणि गणेशोत्सव मंडळांनी ऑनलाइन दर्शनाची सुविधा उपलब्ध करून द्यावी असं आवाहन पोलिसांनी गणेश मंडळांना केले आहे.
पुणे Live Reportig च्या माध्यमातून गणेशोत्सवासह वाहतुकीचे आणि इतर घडामोडींचे अपडेट वाचा एका क्लिकवर
वेळ सायंकाळी सहा वाजता
करीश्मा चौक येथे कोथरूड गाव, कर्वेनगर हून शहराकडे जाणा-या रस्त्यावर वाहनांची रांग लागली होती.
घोरपडी - दुपारी ४ वाजता
घोरपडी गावात दुपारपासून पावसाची रिमझिम सुरू आहे, 4 नंतर रस्त्यावर वाहनांची वर्दळ सुरू झाली आहे. पावसामुळे मात्र नागरिक बाहेर पडत नसल्याचे दिसून आले.
औंध - वेळ दुपारी ४.३०
पावसाला सुरुवात झाल्याने बाणेर रस्त्यावर वाहतूक शांत होती. सकाळनगर, सिंध सोसायटी, बाणेर फाटा, आयटीआय रस्ता, विद्यापीठ व पाषाण रस्त्यावर वाहतूक विना अडथळा सुरू होती.
- बाबा तारे
सायंकाळी ४.०० वा
विठ्ठल तांबे
सिंहगड रस्त्यावर वडगाव ,धायरी नऱ्हे परिसरात येणाऱ्या वाहनांची संख्या कमी असून येणारे रस्त्यावर कमी प्रमाणात वर्दळ सुरु असून वाहतूक सुरळीत आहे. घरोघरी गौरी विराजमान होत असल्याने रस्त्यावर तुरळक गर्दी दिसून येत आहे. सिंहगड रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या दुकानांमध्ये अजिबात ग्राहकांची वर्दळ दिसत नाही...
गणेशोत्सवामुळे शहरातील मध्यवर्ती भागामध्ये रविवारी सकाळपासून गर्दीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज रस्ता व बाजीराव रस्ता आवश्यकतेनुसार वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला. त्यामुळे वाहनचालकांनी मध्यवर्ती भागातुन प्रवास करण्याचे टाळून बाह्य रस्त्यांचा वापर करावा, असे आवाहन वाहतुक पोलिसांनी केले आहे.
गणेशोत्सवाच्या रविवारच्या तिसऱ्या दिवशी सकाळपासूनच शहराच्या मध्यवर्ती नागरीकांची गर्दी होण्यास सुरूवात झाली आहे. मध्यवर्ती भागात मानाचे व प्रमुख गणपती असल्याने येथे नागरीकांची संख्या वाढत आहे. परिणामी गर्दीचा वाहतुकीलाही अडथळा ठरत असल्याने वाहतुक शाखेकडून तात्पुरत्या स्वरुपात वाहतुकीमध्ये बदल करण्यात आले आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरील वाहतुक व्यवस्था : शिवाजीनगरहून स्वारगेटला जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज रस्ता स.गो.बर्वे चौकातुन वाहतुकीसाठी तात्पुरत्या स्वरुपात बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे वाहनचालकांनी जंगली महाराज रस्ता, खंडुजीबाबा चौक, टिळक चौक, टिळक रस्ता मार्गे पुढे जावे.
बाजीराव रस्त्यावरील वाहतुक व्यवस्था : स्वारगेटहून शिवाजीनगरला जाणाऱ्या बाजीराव रस्त्यावरील वाहतुक पुरम चौकातुन तात्पुरत्या स्वरुपात वळविण्यात आली आहे. हि वाहतुक स्वारगेट, सारसबाग, पुरम चौक, टिळक रस्ता, टिळक चौक, खंडुजीबाबा चौक, फर्ग्युसन महाविद्यालय रसत्याने पुढे जातील.
मध्यवर्ती भाग टाळून इच्छितस्थळी जाण्यासाठी असा करा प्रवास
पुणे विद्यापीठाकडून स्वारगेट, हडपसरला जाण्यासाठी : जंगली महाराज रस्ता, खंडुजीबाबा चौक, टिळक रस्ता किंवा लाल बहादूर शास्त्री रस्ता, सारसबाग मार्गे स्वारगेट. तसेच सेनापती बापट रस्ता, नळस्टॉप, म्हात्रे पुल, लाल बहादूर शास्त्री रस्ता, सारसबाग मार्गे स्वारगेटला पोचता येईल. शिवाजीनगर येथून पुणे स्टेशन, कॅम्प मार्गे हडपसरला जाता येईल.
कात्रज, स्वारगेटहून शिवाजीनगरला जाण्यासाठीचा मार्ग : स्वारगेट, पुरम चौक, टिळक रस्ता, खंडुजीबाबा चौक, फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता, कृषी महाविद्यालय येथून पुणे विद्यापीठ, शिवाजीनगर, न.ता.वाडी, जुना मुंबई-पुणे महामार्गावर जाता येईल.
नगर रस्त्यावरुन स्वारगेट, कात्रजला जाण्यासाठी मार्ग : पुणे स्टेशन येथून नेहरू रस्त्याने सरळ, भवानी पेठ, सेव्हन लव्हज चौकातुन स्वारगेटकडे किंवा मार्केट यार्ड मार्गे सातारा रस्ता
दुपारी 2 वाजता - उत्तमनगर
राजेंद्रकृष्ण कापसे - खडकवासला परिसरातील उत्तमनगर ही मोठी बाजारपेठ आहे. या परिसरात सकाळी १० ते ११ वाजता गर्दी होती. दुपार नंतर उत्तमनगर मंडई मध्ये थोडी गर्दी होती. गौरीचे साहित्य व भाजीपाला खरेदीसाठी गर्दी झाली होती. या परिसरातील पुण्याकडे जाणाऱ्या थांब्यावर गर्दी नव्हती. परंतु सांगरून बहुलीकडे नागरिक बस ची वाट पाहत होते.
दुपारी. 2 वाजता - औंध
औंध-विद्यापीठ रस्त्यावर वाहनांची वर्दळ वाढली आहे.तसेच पिंपरी चिंचवड कडे जाणा-या वाहतुकीत वाढ. त्यामुळे औंध येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून पुढे व पिंपरी चिंचवडकडे जाणारी वाहतूक संथ होत आहे.
दुपारी १.५० वाजता - पीएमपी वाहतूक विस्कळीत
शहराच्या मध्यभागात भाविकांची गर्दी वाढल्यामुळे पोलिसांनी शिवाजी रस्त्यावरील वाहतूक बंद केली आहे. परिणामी या रस्त्यावरील पीएमपीची वाहतूक बंद झाली आहे. पर्यायी मार्गाने म्हणजे टिळक रस्त्याने तसेच नेहरू रस्त्याने पीएमपीच्या बसची वाहतूक सुरू झाली आहे.
शहराच्या मध्य भागात पीएमपीचा स्वारगेट- शिवाजीनगर हा मार्ग सर्वाधिक वर्दळीचा आहे. या मार्गावर दर दोन मिनिटांनी बस सेवा उपलब्ध आहे. परंतु, शिवाजी रस्त्यावरील वाहतूक पोलिसांनी रविवारी दुपारी 12 च्या सुमारास बंद केली. त्यामुळे शिवाजीनगरकडून स्वारगेट जाणाऱ्या बस जंगली महाराज रस्ता, टिळक रस्त्याने स्वारगेटकडे जात आहेत.
स्वारगेटकडून शिवाजीनगरकडे जाणारी बस वाहतूक सुरू आहे. मात्र, बुधवार पेठ, महात्मा फुले मंडई, लालमहालापासून बस वाहतूक बंद असल्यामुळे प्रवाशांना पायी स्वारगेटकडे जावे लागत आहे, अशी माहिती पीएमपीचे वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रेय झेंडे यांनी दुपारी रविवारी 2 च्या सुमारास दिली.
पुणे स्टेशनकडे जाणऱ्या बसचा मार्ग बदलला
शहराच्या मध्यमातून पुणे स्टेशनकडे जाणाऱ्या बसही शंकरशेठ रस्ता, नेहरू रस्त्याने वळविण्यात आल्या आहेत. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी गर्दी होत असल्यामुळे शिवाजी रस्त्यावरील वाहतूक पोलिसांनी बंद केली आहे. स्वारगेट, डेक्कन, पुणे स्टेशन, पूलगेट, शिवजीनगरपासून उपनगरांतील बस वाहतूक सुरळीत सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
शिवाजी रस्त्याला हा आहे पर्यायी मार्ग
शिवाजी रस्ता बंद झाल्यामुळे वाहनचालकांना जंगली महाराज रस्ता, टिळक रस्त्यामार्गे स्वारगेटकडे जावे लागत आहे. तसेच शिवाजी रस्त्यावरून सेव्हन लव्हज चौकातून (ढोले पाटील) स्वारगेटकडे वाहनचालकांना जावे लागत आहे.
उपनगरांतून येणारे भाविक नदीपात्रातील रस्त्यांवर वाहने उभी करून भाविक पायी गणेश मंडळांकडे जात आहेत. त्यामुळे अप्पा बळवंत चौकातून बुधवार पेठ मजुर अड्डयाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील वाहतूक पोलिसांनी बंद केली आहे. त्यामुळे दुपारी 1.30 मिनिटांनी अप्पा बळवंत चौकात पादचारी आणि वाहनांची गर्दी झाली होती.
दुपारी 1.30 - दुपारपर्यंत वाहतूक सुरळीत
प्रयागा होगे - घोरपडी गाव, बी टी कवडे रस्त्यावर वाहतूक कमी प्रमाणात सुरु असून वाहतूक सुरळीत आहे.घरोघरी गौरी विराजमान होत असल्याने रस्त्यावर गर्दी कमी दिसत आहे.
दुपारी १.३० वाजता - स्थळ : गांधीचौक, हडपसर
हडपसरमध्ये उन सावल्यांचा खेळ अनुभवायला मिळाला. पावसाने विश्रांती घेतल्याने बाजारात गर्दी पाहवयास मिळाली. गौरी स्थापनेसाठी आवश्यक साहित्याच्या खरेदीसाठी गाडीतळ ते गांधीचौकादरम्यान असलेल्या पथारी बाजारात सर्वाधिक गर्दी झाली आहे. विशेषतः महिलांचे प्रमाण मोठे आहे. नोकरदार व व्यवस्थापन क्षेत्रातील कामगारांना सुट्टी असल्याने रस्त्यावर खासगी वाहतुकीत घट दिसून येते. ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्तही आहे. त्यामुळे मार्गावरील वाहतुकही सुरळीत आहे.
दुपारी १२.४५ - पोलिसांनी घातली गस्त
येरवडा पोलिसांनी गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्थेसाठी पायी गस्त घातली. येरवडा गाडीतळ, चित्रा चौक, लक्ष्मीनगर, कामराजनगर, गणेशनगर, जेल रस्ता आदी परिसरात पोलिसांनी गस्त घातली.
दुपारी एक वाजता - बिबवेवाडी (नितीन बिबवे)
शहरातून उपनगरात येणाऱ्या वाहनांची संख्या वाढलेली असून येणारे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरु आहे. घरोघरी गौरी विराजमान होत असल्याने प्रत्येकाची घरी लवकर जाण्याची घाई दिसून येत आहे.
दुपारी : १२.३० वाजता, हडपसर, गाडीतळ बसस्थानक
प्रवासी संख्या दररोजचीच. मात्र, वारंवारता कमी केल्याने स्थानकावर गर्दी जाणवत आहे. सुट्टी असल्याने गौरी उत्सवासाठी नातेवाईकांच्या घरी जाणारे प्रवासी जास्त. दगडूशेठ गणपती दर्शनासाठी मंडई मार्गे जाणाऱ्या बसला सर्वाधिक गर्दी. गौरी विसर्जनानंतर बसला गर्दी वाढण्याची शक्यता. रात्री जमावबंदी असल्याने दिवसा मानाच्या गणपती दर्शनाला भाविकांची पसंती असल्याचे चित्र.
वेळ 12:15 - स्थळ : आनंद नगर, भा. द. खेर चौक
सध्या सुरळीत वाहतूक सुरू आहे दुचाकींची गर्दी मात्र मोठ्या प्रमाणात आहे. नागरिक गौरी आगमनाच्या दृष्टिकोनाने खरेदीसाठी रस्त्यावर आहेत. हार फुल पूजासाहित्य फळे तसेच इतर सामानाच्या खरेदीसाठी नागरिक रस्त्यावर दिसून येत आहेत. याशिवाय मिठाईच्या दुकानांमध्ये आपल्याला गर्दी दिसते आहे.
वेळ ११.५५ - गावठाण परिसरात रस्त्यावर तुरळक गर्दी
औंध येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पुणे शहर व पिंपरी चिंचवडकडे जाणारी वाहतूक आज रोजच्या तुलनेत कमी होती.तर परिहार चौक,भालेकर चौक, संघवीनगर रस्त्यावरील वर्दळ कमी प्रमाणात होती.परंतु औंध गावठाणात गौरी सणाच्या पार्श्वभूमीवर थोडी गर्दी दिसून येत होती.सध्या पावसाची शक्यता आहे परंतु अजून तरी पाऊस पडलेला नाही त्यामुळे गावठाण परिसरातील रस्त्यांवर तुरळक गर्दी पहायला मिळत आहे.
सकाळी 11.45 वाजता - स्थळ : दत्तमंदिर चौक सीसीडी चौक - विमाननगर
रस्त्यावरील वाहतुक सुरळीत सुरु, वाहतुक कोंडी नाही. पूजा साहित्य खरेदीसाठी तुरळक गर्दी. मिठाईच्या दुकानात मात्र गर्दी
सकाळी 11.45 - वहनांपेक्षा नागरिकांची गर्दी जास्त
छत्रपती शिवाजी महाराज रस्ता - शनिवारवाडा ते महात्मा फुले मंडई : रस्त्यावरील वाहतुक सुरळीत सुरु, वाहतुक कोंडी नाही, वाहनापेक्षा नागरीकांची गर्दी अधिक दिसून येत आहे.
सकाळी 11.30 - बालेवाडी दसरा चौक
चौकात फळ, भाजी घेण्यासाठी नेहमीच गर्दी असते, परंतु त्या तुलनेत आज वर्दळ कमी जाणवली. आज गौरीचे आगमन होणार असल्यामुळे बहुतेक महिलांनी कालच भाजी, फळ खरेदी केली आहेत.
लक्ष्मी माता चौक, बालेवाडी या चौकात आज जास्त वर्दळ आहे तर बाणेर रस्ता या ठिकाणी ही तुरळक वाहतूक पहायला मिळाली.
सकाळी 11-20 - सुट्टीचा दिवस असल्यानं दुपारनंतर गर्दी वाढण्याचा अंदाज
नळस्टाॅप - वाहतुक सुरळीत सुरू असून इतर दिवशी दिसणारी वाहतुक कोंडी आज दिसली नाही. दोन वाहतूक पोलिस वाहतुक नियंत्रण करत होते. सुट्टीचा दिवस व गौरी सजावट यामध्ये नागरिक व्यग्र असल्याने वाहतूक कमी असावी परंतु दुपारी चार नंतर गर्दी वाढेल असा अंदाज त्यांनी वर्तवला.
सकाळी 11.15 AM - गौरी आगमनामुळे हार,फुले आणि पूजा साहित्याच्या दुकानात गर्दी
नितीन बिबवे,बिबवेवाडी - स्वामी विवेकानंद मार्ग, कोंढवा रस्ता, सातारा रस्त्यावर सकाळी सव्वा अकरा वाजता रविवार च्या तुलनेत रहदारी थोडी जास्त आहे. परंतू वाहतूक सुरळीत सुरु आहे, गौरी आगमन असल्याने सकाळ पासून हार, फुले, पूजा साहित्य दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दी दिसत आहे.
सकाळी 11 वाजता - खडकवासला ९७ टक्के भरले
राजेंद्रकृष्ण कापसे, - खडकवासला धरण साखळीतील खडकवासला, पानशेत, वरसगाव व टेमघर धरणात या चारही धरण क्षेत्रात सकाळी सहा वाजल्यापासून पाऊस पडलेला नाही. खडकवासला धरण सकाळी दहा वाजता ९७ टक्के झाल्याने या धरणातून ८५६ क्यूसेकचा विसर्ग मुठा नदीत सोडला आहे. पावसाचा जोर वाढल्यास खडकवासला धरणातील विसर्ग वाढू शकतो. नदी काठच्या नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विजय पाटील यांनी केले आहे.खडकवासला धरण साखळीतील खडकवासला, पानशेत, वरसगाव व टेमघर धरणात या चारही धरण क्षेत्रात सकाळी सहा वाजल्यापासून पाऊस पडलेला नाही. खडकवासला धरण सकाळी दहा वाजता ९७ टक्के झाल्याने या धरणातून ८५६ क्यूसेकचा विसर्ग मुठा नदीत सोडला आहे. पावसाचा जोर वाढल्यास खडकवासला धरणातील विसर्ग वाढू शकतो. नदी काठच्या नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विजय पाटील यांनी केले आहे.
वाहतूक पोलिसांनी काही मार्गांवर मोठ्या वाहनांना प्रवेश बंदी केली होती. शनिवारी छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरील मजूर अड्डा चौक ते बेलबाग चौकात मोठा फौजफाटा तैनात केला होता. रविवारीसुद्धा दिवसभर नागरिक गणपती दर्शनासाठी बाहेर पडण्याची शक्यता असल्यानं वाहतूक पोलिसांसह प्रशासन सज्ज आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.