pune sakal
पुणे

Pune Traffic : बाणेर परिसरातील वाहतूककोंडीमुळे रहिवासी हैराण

मुंबई-बंगळुरू महामार्गाला लागूनच बाणेर येथील बिटवाईज या कंपनीकडून एक रस्ता पुढे मोहननगर परिसराकडे जातो.

सकाळ वृत्तसेवा

बालेवाडी : बाणेर येथील मोहननगर परिसरात आठवड्यातून तीन दिवस आठवडी बाजार भरतो. रस्त्याच्या दोन्ही बाजूला विक्रेत्यांच्या गाड्या, तंबू उभे केले जातात. खरेदीसाठी येणारे ग्राहक रस्त्यावरच बेशिस्तपणे वाहने उभी करून खरेदी करत असल्यामुळे इतर वाहनांना ये-जा करायला अडचण होऊन वाहतूक कोंडी होते. स्थानिक रहिवाशांबरोबरच वाहनचालक अतिशय हैराण झाले असून, प्रशासनाने योग्य त्या उपाययोजनांची अंमलबजावणी करावी अशी मागणी जोर धरत आहे.

मुंबई-बंगळुरू महामार्गाला लागूनच बाणेर येथील बिटवाईज या कंपनीकडून एक रस्ता पुढे मोहननगर परिसराकडे जातो. हा रस्ता सूस, नांदे, लवळे, मुळशी या भागाला जोडणारा महत्त्वपूर्ण मार्ग असल्यामुळे येथे नेहमीच रहदारी असते. मोहननगरच्या मुख्य रस्त्याला लागून आठवड्यातून तीन वेळा आठवडी बाजार भरतो,

तर इतर दिवशी रस्त्याच्या कडेला असणाऱ्या इमारतींसमोर पाणीपुरी, भेळ, चहा यांसारखे पथारीवाले आपला व्यवसाय थाटतात. त्यामुळे इथे येणारे खवय्ये रस्त्याच्या बाजूला तीन रांगांमध्ये दुचाकी व त्यानंतर चार चाकी अस्ताव्यस्त उभी करून या ठिकाणी ये-जा करत असतात. येथे कसेबसे रस्त्यावरून एकच वाहन ये-जा करू शकते. येथील सोसायट्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना सोसायटीमध्ये ये-जा करण्यासाठी मोठी कसरत करावी लागते.

महापालिकेकडून नुकताच येथे पदपथ विकसित करण्यात आला आहे. यासाठी लागणारे खडी, वाळू यांसारखे साहित्य अजूनही तेथेच पडून असल्यामुळे नागरिकांच्या अडचणीत भर पडत आहे. तरी प्रशासनाने त्वरित प्रश्न सोडवावेत, अशी मागणी या भागातील नागरिक करत आहेत.

येथील समस्येबाबत पदपथ विभागाचे उपअभियंता, मकरंद वाडेकर,

यांनी सांगितले, की या भागात नुकतेच पदपथाचे काम करण्यात आले असून, रस्त्याच्या बाजूची त्वरित साफसफाई करून घेतली जाईल.

मोहननगर परिसरातील दुकानांच्या साइड मार्जिनमध्ये व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांवर बांधकाम विभाग, अतिक्रमण विभाग व औंध क्षेत्रीय कार्यालयाकडून संयुक्तपणे कारवाईचे नियोजन लवकरच करण्यात येईल, त्यामुळे काही अंशी या भागातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लागेल.

- संदीप खलाटे, सहायक आयुक्त, औंध बाणेर क्षेत्रीय कार्यालय

मोहननगरच्या कमानी जवळच रस्त्याच्या बाजूला रात्रीच्या वेळी ओळीने मोठे डंपर, जेसीबी एका मागोमाग एक उभे केले जातात. रात्रीच्या वेळी येथे लूटमार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या परिसरातून महिलांना ये जा करताना सुरक्षित वाटत नाही. एखादा अनर्थ घडण्याअगोदर उपाययोजना करावी.

- मिलिंद पतंगे,स्थानिक, मोहननगर

मोहननगरच्या कमानी जवळच रस्त्याच्या बाजूला रात्रीच्या वेळी ओळीने मोठे डंपर, जेसीबी एका मागोमाग एक उभे केले जातात. रात्रीच्या वेळी येथे लूटमार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या परिसरातून महिलांना ये जा करताना सुरक्षित वाटत नाही. एखादा अनर्थ घडण्याअगोदर उपाययोजना करावी.

- मिलिंद पतंगे,स्थानिक, मोहननगर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election Result : भाजप 100 जागांवर आघाडीवर, सलग तीन निवडणुकांमध्ये केले शतक पार

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting:मनसेला बसणार धक्का? एकमेव आमदार राजू पाटील पिछाडीवर

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: राहुरी विधानसभा मतदारसंघात प्राजक्त तनपुरे ३४९ मतांनी आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result : महायुती 200 पार; महाविकास आघाडीची मोठी निराशा

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

SCROLL FOR NEXT