Pune No Vehicle Zone e sakal
पुणे

पुण्यात नववर्षानिमित्त वाहतुकीत बदल, 'या' भागात नो व्हेईकल झोन

सकाळ डिजिटल टीम

पुणे : नववर्षाचं आणि सरत्या वर्षाला निरोप (New Year Celebration Pune) देण्यासाठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुण्यात वाहतुकीमध्ये (Pune Transport Rule) काही बदल करण्यात आले असून छत्रपती शिवाजी महाराज रस्ता तात्पुरत्या स्वरुपात वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता, नामदार गोपाळ कृष्ण गोखले चौक (गुडलक चौक) ते फर्ग्युसन महाविद्यालय मुख्य प्रवेशद्वार, जंगली महाराज रस्ता, झाशीची राणी चौक ते खंडोजीबाबा चौक, महात्मा गांधी रस्ता - हॉटेल अरोरा टॉवर चौक ते ट्रायलक हॉटेल चौक या रस्त्यावर आज सायंकाळी ७ वाजतापासून ते उद्या सकाळी पहाटे ५ वाजेपर्यंत नो व्हेईलल झोन (No Vehicle Zone) करण्यात आला आहे.

सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नववर्षाच्या स्वागतासाठी लष्कर परीसरातील महात्मा गांधी रस्ता, तसेच फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता, सेनापती बापट रस्ता या ठिकाणी तरुणांची मोठ्या प्रमाणात गर्दी उसळते. त्यामुळे या भागात वाहतुकीमध्ये बदल करण्यात आला आहे. त्याऐवजी पर्यायी मार्गांचा अवलंब करावा, असे आवाहन पुणे वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे.

बंद रस्ते व पर्यायी मार्ग

  1. वाय जंक्‍शनवरुन महात्मा गांधी रस्त्याकडे येणारी वाहतूक 15 ऑगस्ट चौक येथे बंद करून ही वाहतूक कुरेशी मशीद, सुजाता मस्तानी चौकाकडे वळविण्यात आली आहे.

  2. ईस्कॉन मंदिर चौकाकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, अरोरा टॉवरकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे.

  3. व्होल्गा चौकाकडून महमद रफी चौकाकडे जाणारी वाहतूक बंद. सदरची वाहतूक ईस्ट स्ट्रीट रस्त्याने सरळ इंदिरा गांधी चौकाकडे सोडण्यात येईल

  4. इंदिरा गांधी चौकाकडून महावीर चौकाकडे जाणारी वाहतूक बंद. सदरची वाहतूक इंदिरा गांधी चौकाकडून लष्कर पोलिस ठाण्याकडे वळविण्यात आली आहे.

  5. सरबतवाला चौकाकडून महावीर चौकाकडे जाणारी वाहतूक बंद. ही वाहतूक ताबूत स्ट्रीट मार्गे पुढे नेली जाईल.

या रस्त्यानं वळवली वाहतूक -

पुरम चौकातून बाजीराव रस्त्याने शिवाजीनगरकडे जाणारी वाहतूक टिळक रस्त्याने टिळक चौक, फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्याने वळवण्यात आली आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरुन स्वारगेटला जाणाऱ्या वाहनचालकांनी स. गो. बर्वे चौकातून जंगली महाराज रस्त्याने खंडोजीबाबा चौक, टिळक रस्त्याने पुढे जाण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुणे जिल्ह्यात महायुती, महाविकास आघाडी यांच्यापैकी कोणाला मिळणार मतदारांचा कौल?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुंबईत नक्की कोण मारणार बाजी? वाचा एका क्लिकवर

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT