सिंहगड रस्त्यावर उड्डाणपुलाच्या कामापूर्वी पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी
पुणे : सिंहगड रस्त्यावरील (sinhad road ) उड्डाणपुलाचे काम करण्यापूर्वी नागरिकांच्या सोईसाठी परिसरातील अतिक्रमणे काढून रस्ता मोकळा करणे अपेक्षित आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून महापालिका प्रशासनाने(pune muncipal carporation) थेट रस्त्याच्या मध्यभागी दुभाजकावर असलेली झाडे काढण्याचे काम सुरू केले असून ठेकेदाराला १८० झाडे तोडण्याची परवानगी दिली आहे.
सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी राजाराम पूल ते फनटाइन थिएटरपर्यंत उड्डाणपूल बांधण्यास महापालिकेने परवानगी दिली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते दोन महिन्यांपूर्वी या कामाचे भूमिपूजन झाले आहे. मात्र, उड्डाणपुलाचे काम सुरू झाल्याने पुढील किमान तीन वर्ष परिसरातील नागरिकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे पर्यायी मार्गांचे काम आधी करा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. त्यासाठी पुढील किमान तीन महिने लागणार असल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात आहे.
सिंहगड रस्त्याची रुंदी वाढविण्यासाठी सायकल ट्रॅक काढण्याचेही काम सुरू झाले आहे. परंतु, उड्डाणपुलाच्या कामाच्या ठिकाणी पदपथ व रस्त्यावर अतिक्रमणे झाली आहेत. व्यावसायिकांनी दुकानांपुढील जागा अडवून ठेवल्याने वाहतुकीस अडथळा होत असून याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.या उड्डाणपुलाचा लांबी २१२० मीटर आहे. त्यासाठी रस्त्याच्या मध्यभागी पिलर टाकावे लागणार असल्याने दुभाजक व त्यावर लावलेली झाडे काढावी लागणार असून महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीने त्यास मान्यता दिली आहे. उड्डाणपुलाचे काम अद्याप प्रत्यक्षात सुरू झाले नसले तरी, माणिकबाग ते संतोष हॉलच्या दरम्यानची झाडे काढली जात आहेत. या झाडांचे कॅनल रस्ता परिसरात पुनर्रोपण केली जात असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
आराखड्यात बदल झाडे वाचतील
उड्डाणपुलाच्या कामासाठी १८० झाडे काढली जाणार आहेत. मात्र, उड्डाणपुलाच्या प्लॅनमध्ये काही बदल केल्यास अनेक झाडे वाचतील, असा अभिप्राय वृक्ष प्राधिकरणाच्या तज्ज्ञ समितीने दिला होता. परंतु त्यानुसार बदल करण्यात आला नाही. प्रस्ताविक पुनर्रोपण कुठे करणार या जागेचा नकाशा देणे आवश्यक आहे, असेही या समितीने सांगितले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.