Pune:  sakal
पुणे

Pune: ऐन एकादशीला एसटीच्या 63 फेऱ्या रद्द, प्रवाशांचे अतोनात हाल

डी. के. वळसे पाटील

Latest Bus Update: श्रीक्षेत्र पंढरपूर यात्रेसाठी आषाढी एकादशी निमित्त बुधवारी (ता.१७) १३ एसटी गाड्या गेल्या आहेत. त्यामुळेआंबेगाव तालुक्यात ६३ मार्गावरील एसटी फेरया रद्द झाल्या.त प्रवाशांचे अतोनात हाल झाले.मंचर बस स्थानकावर शुकशुकाट होता.परिणामता १८ हजार प्रवाश्यांचे राज्य परिवहन महामंडळाला मिळणारेआर्थिक उत्पन्न बुडाले आहे.

या संधीचा फायदा खाजगी वाहन चालकांनी घेतला. दीड ते दुपटीने प्रवाशांकडून भाडे घेतले. त्यामुळे प्रवाश्यांनी संताप व्यक्त केला.

आंबेगाव तालुक्यात मंचर व घोडेगाव बस स्थानकावरून जवळपास १०३ हून अधिक गावातील प्रवाश्यांची एसटी वाहतूक मंचर,नारायणगाव राजगुरुनगर आगरा मार्फत केली जाते.पण बुधवारी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे या भागातील तीन आगारातून एसटी गाड्या पाठवण्यात आल्या आहेत.

त्यामुळे मंचर बस स्थानकावर एसटी गाड्या न आल्याने कुरवंडी, पारगाव , घोडेगाव, महाळुंगे पडवळ, सातगाव पठार, रांजणी , पिंपरखेड,जारकरवाडी,भागडी, पोखरी,घोडेगाव ,लोणी लाखनगाव या मार्गावरील एस.टी.गाडीच्या फेरया रद्द झाल्या .

त्यामुळे श्री क्षेत्र आळंदी येथे संत ज्ञानेश्वर देवाचे दर्शन घेण्यासाठी जाणाऱ्या भाविकांना दीड ते दुप्पट भाडे द्यावे लागले.दरम्यान मंचर बस स्थानकावर प्रवाश्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले.असे मंचर बस स्थानकाचे वाहतूक नियंत्रक पुरुषोत्तम वायकर यांनी सांगितले.

शिवाजीनगर एसटी आगाराच्या पुणे ते भीमाशंकर, व मुंबई एसटी आगाराच्या नियमित काही फेऱ्या आल्या असे मंचर बस स्थानक प्रमुख साधना कालेकर यांनी सांगितले.

“आंबेगाव तालुक्यात मुक्कमी एस टी गाड्या उपलब्ध न झाल्यास गुरुवारी एसटी सेवा विस्कळीत राहण्याची शक्यता आहे शुक्रवारपासून प्रवाशांना व्यवस्थित एसटी सेवा देण्याचा प्रयत्न केला जाईल,”

बालाजी सूर्यवंशी, आगार प्रमुख, मंचर एसटी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI Transaction Limit: उद्यापासून UPI व्यवहार मर्यादा बदलणार! पेमेंटसाठी NPCI कडून नवीन नियम जाहीर, तुम्हाला होणार थेट फायदा

Lalbaugcha Raja Darshan: लालबाग राजाच्या चरणी सामान्यांचे हाल, मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार, काय केला आरोप?

आई झाल्यानंतर आयुष्यात काय बदल झाले? दीपिका पादुकोणने चार शब्दात सांगितला अनुभव, बदलला इंस्टाचा बायो

Chess Olympiad 2024: भारतीय संघाचे पहिल्या चारही फेरीत वर्चस्व; महाराष्ट्राची दिव्या देशमुखचीही चमकदार कामगिरी

Hit And Run : 'हिट अँड रन' घटनेत दुचाकीवर मागे बसलेल्याचा तरुणाचा जागेवरच मृत्यू; दहिसर येथील एक्सप्रेसवेवरील प्रकार

SCROLL FOR NEXT