Pune sakal
पुणे

Pune : कर्णबधिर तुषार जाधव व हर्षवर्धन कांबळे यांचे दहावीत घवघवीत यश,विशेष दिव्यांगात प्रथम,व द्वितीय

पिंपळे गुरव येथील महानगर पालिकेच्या शाळेत शिक्षण घेतलेल्या हर्षवर्धन याच्या घरची परिस्थिती हलाखीची आहे.

रमेश मोरे

Pune - वयाच्या दहाव्या वर्षी आलेली कर्णबधीरता व त्यामुळे आलेल्या शारिरीक अडचणी व अडथळ्यांवर मात करत तुषार जाधव याने आत्मविश्वास व चिकाटीने दहावी परिक्षेत ८६ टक्के गुण मिळवून दिव्यांग यादीतून शाळेतून प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. तर दापोडीतील हर्षवर्धन कांबळे याने ७९ टक्के गुण मिळवून दिव्यांग यादीत द्वितीय येण्याचा मान मिळवला आहे.

दोघेही महापालिकेच्या बक्षिस योजना यादीत पात्र ठरले आहेत.हर्षवर्धन कांबळे याला चित्रकला व हस्तकलेची आवड आहे.तो खेळात व कलेत अवलिया असून हस्तकला व चित्रकलेत ही प्रविण आहे..तो उत्तम चित्रकार आहे. यासोबतच हस्तकला जोपासली आहे.तो विविध वस्तू,बाहुले,खेळणी, कार्टून्स हुबेहुब तयार करुन मित्र परिवार नातेवाईक मंडळी यांना वाढदिवस समारंभ अशा प्रसंगी त्या वस्तू भेट देतो.

पिंपळे गुरव येथील महानगर पालिकेच्या शाळेत शिक्षण घेतलेल्या हर्षवर्धन याच्या घरची परिस्थिती हलाखीची आहे.हर्षवर्धनचे वडील आनंद कांबळे हाऊसकिंपिंगचे काम करतात.तर आई लक्ष्मी कांबळे घरकाम करून संसाराचा गाडा चालवतात. हर्षवर्धनला स्थापत्य कला क्षेत्रात करिअर करायचे आहे.

पिंपळे गुरव महापालिकेच्या शाळेत येथील दिव्यांग यादीत प्रथम आलेल्या तुषार जाधव यांचे वडील ईलेक्ट्रीशियशन आहेत. वयाच्या दहाव्या वर्षी तुषारला कर्णबधीरपणा आला यामुळे अनेक समस्यांना त्याला सामोरे जावे लागले ठार बहिरा झाल्यामुळे त्याचे ऐकणे बंद झाले. आई वडीलांना हा धक्का होता.

शाळेतील संवाद अभ्यासासाठी कानातील ऐकण्याचे मशीनची किंमत अडीच लाख रूपये जमवा जमव करुन आई वडीलांनी मशिन घेतली.ही मशीन घेण्यासाठी पैशांची जुळवाजुळव करण्यासाठी दोन वर्षे लागल्याचे तुषारच्या वडीलांनी सांगितले.या परिस्थितीत ही तुषारने अभ्यासाकडे सातत्याने लक्ष दिले.दहावीत असताना कानाच्या मशीनची बॅटरी खराब झाली बॅटरी घेण्यास उशीर झाला.मात्र त्याने शाळा व अभ्यास नियमित सुरू ठेवले.

तुषार चे इंजिनिअर होण्याचे स्वप्न असून त्याला आई वडील म्हणून आम्ही त्याला घडविण्यासाठी कष्ट घेत आहोत.आपल्या मुलाने मोठे व्हावे असे प्रत्येक आई वडिलांचे स्वप्न असते.

प्रविण जाधव,माया जाधव आई वडील.

अशी अनेक कुटुंबे विविध प्रांत भागातून स्थलांतरित होवून उद्योगनगरीत आलेली आहेत.अनेकांकडे येथील रेशनकार्ड नाहीत.आधार कार्ड मुळगावचे आहे.यामुळे विद्यार्थी व पालकांना महापालिका व अन्य शैक्षणिक सुविधा मिळविण्यासाठी झगडावे लागते.अशा विद्यार्थी व कुटुंबासाठी कागदपत्रे काढण्यासाठी सांगवी परिसरातील अशा कुटूंबांना मदत करणार आहे.आदिती निकम सामाजिक कार्यकर्त्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात मतमोजणीला प्रत्यक्ष साडे आठ वाजता सुरुवात होणार

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अमित ठाकरेच आमदार होणार; मनसेला विश्वास

Maharashtra Assemble Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT