Olympiad sakal
पुणे

गणित ऑलिंपियाडमध्ये पुण्याच्या दोघांचे यश

अनिश कुलकर्णीने रौप्य तर अनन्या रानडेने पटकावले कांस्य पदक

सम्राट कदम -सकाळ वृत्तसेवा

पुणे : आंतरराष्ट्रीय गणित ऑलिंपियाड (Olympiad) २०२१ मध्ये पुण्यातील (pune) अनिश कुलकर्णीने रौप्य, तर अनन्या रानडेने कांस्य पदक पटकावले आहे. यंदा गणित ऑलिंपियाडचे (Olympiad) आयोजन रशियाने (russia) केले होते. हा कार्यक्रम व्हरच्युअली सेंट पीटर्सबर्ग येथे झाला. भारतीय संघात सहा विद्यार्थ्यांचा समावेश होता. यावर्षी भारतीय संघाने ५ पदके ज्यामध्ये एक सुवर्ण, एक रौप्य आणि तीन कांस्यपदकांचा समावेश आहे. (Pune two student success Maths Olympiad)

अनिश आणि अनन्या दोघेही बारावीचे विद्यार्थी असून, त्यांना भास्कराचार्य प्रतिष्ठानचे मार्गदर्शन लाभले आहे. अनिश म्हणतो,‘‘गणित शिकण्याची मला विशेष आवड असून, गणित सोडविताना एक वेगळेच समाधान मिळते. मी आठवीपासून आंतरराष्ट्रीय गणित ऑलिंपियाडची तयारी करत होतो.’’ २०२० मध्ये भारताचा सहभाग रद्द झाल्याने आणि २०१९ मध्ये थोडक्यात टीममध्ये संधी हुकली तरी निराश न होता अनिशने २०२१ मध्ये संघात सहभाग मिळविला.

शालेय पाठ्यपुस्तकाबाहेरीलही गणित सोडविण्याची आवड असलेली अनन्या म्हणते,‘‘पाचवीला असताना माझ्या शिक्षकांनी माझ्या आईला माझ्या गणितातील आवडीबद्दल कळविले. तेंव्हापासून मी गणिताविषयी सजग आहे. अवघड गणित समजून घेण्यावर माझा जास्त भर राहीला आहे.’’ या दोघांनाही एम. प्रकाश संस्थेचे तसेच किरण बर्वे, सुबोध पेठे, प्रशांत सोहनी आणि शिक्षकांचे सहकार्य लाभले.

गणिताविषयी दोघांच्या टीप्स :

  • गणित केवळ आकडेमोड नसून विचार आहे

  • प्रश्न सोडवण्याआधी ते समजून घ्यायला हवा

  • गणिताचे प्रत्यक्ष व्यवहारातील उपयोग जाणून घ्या

  • पाठ्यपुस्तकाबाहेरील गणितेही सोडवा

  • गणिताची अनावश्यक भिती बाळगू नका

‘‘गणिताकडे केवळ प्रश्न म्हणून पहायला नको. तर त्यामागील विज्ञानही समजून घ्यायला हवे. आता तर ऑलंपियाड झाली. यापुढेही गणितात करिअर करण्याची माझी इच्छा आहे," असे रौप्य पदक विजेते अनिश कुलकर्णी याने सांगितले.

कांस्य पदक विजेती अनन्या रानडे बोलताना म्हणाली, "गणितमुळे तुम्हाला नवी विचारदृष्टी प्राप्त होते. गणित ही माझी आवड असून भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी), भारतीय विज्ञान संस्था (आयआयएससी) आणि चेन्नईच्या मॅथेमॅटीकल इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. त्यातच मी करीअर करणार आहे."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT