पुणे

Pune: जिल्ह्यातून अनधिकृत ड्रोनचा होणार सफाया, पोलिसांनी हाती घेतली मोठी मोहीम!

Pune Police Update: नागरिकांनी कोणतीही भीती बाळगू नये असे आवाहन सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले आहे

सुदाम बिडकर ः सकाळ वृत्तसेवा

Pune News : पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात रात्रीच्या वेळी आकाशात घिरट्या घालणाऱ्या अनाधिकृत ड्रोन वर कडक कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना दिल्या असुन पोलीस विभागाने ड्रोन पाडण्यासाठी आधुनिक मशिन (अँटी ड्रोन गन) मागवली आहे.

पोलीस लवकरच या मशिनच्या साह्याने घिरट्या घालणारे अज्ञात ड्रोन पाडण्याची कारवाई करणार असल्याने नागरिकांनी कोणतीही भीती बाळगू नये असे आवाहन सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले आहे.

पारगाव ता. आंबेगाव येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखाना येथे आज मंगळवारी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील पत्रकारांशी बोलत होते. यावेळी भीमाशंकर साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे , जिल्हा बँकेच्या माजी उपाध्यक्षा व आंबेगाव – शिरूर विधानसभा मतदारसंघाच्या भाजपच्या प्रभारी जयश्री पलांडे, प्रांताधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार संजय नागटिळक , गटविकास अधिकारी प्रमिला वाळुंज, महावितरण चे कार्यकारी अभियंता शांताराम बांगर , सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे आदी उपस्थित होते.

मागील एक महिन्यापासून आंबेगाव तालुक्याच्या पुर्वभागात रात्रीच्या वेळी अज्ञात ड्रोन घिरट्या घालत असल्याने त्या अनुशंगाने अनेक अफवा पसरत असल्याने नागरिक भीतीच्या छायेखाली आहे.

या अज्ञात ड्रोनबाबत प्रशासनाने सुरु केलेल्या कारवाई बाबत बोलताना सहकार मंत्री दिलीप वळसे म्हणाले दिवसा अथवा रात्री विनापरवानगी आकाशात ड्रोन आढळून आल्यास त्यावर कडक कारवाई बाबत जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्याबरोबर चर्चा झाली असून पोलीस विभागाने ड्रोन पाडण्यासाठी आधुनिक मशिन मागवली आहे.

त्यासाठी तातडीने १५ लाख रुपयांची तरतूद केली आहे. लवकरच मशीन उपलब्ध होणार असुन त्या मशिनच्या साह्याने घिरट्या घालणारे अज्ञात ड्रोन पाडण्याची कारवाई केली जाईल त्यामुळे नागरिकांनी कोणतीही भीती बाळगू नये असे सांगितले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT