Undeveloped Road sakal
पुणे

Pune: अविकसीत रस्त्यांच्या विकासासाठी अभ्यास

शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्‍न गंभीर

सकाळ डिजिटल टीम

पुणे : शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. मध्यवर्ती भागासह उपनगरांमध्ये रस्ते मोठे करणे आणि पर्यायी मार्ग उपलब्ध करणे आवश्‍यक आहे. त्यासाठी महापालिकेने अभ्यास करून विकास आराखड्यात दाखवले आहेत, पण ते अस्तित्वात नाहीत असे रस्ते शोधून काढले आहेत. यामध्ये शहराची जुनी हद्द, वेळोवेळी दाखले झालेली गावे, प्रादेशिक विकास आराखडा यातील रस्त्यांचा समावेश करण्यात आला असून, एकूण २७३ किलोमीटरचे रस्ते आढळून आले आहेत. हे रस्ते विकसित करण्यासाठी आता महापालिकेकडून अभ्यास सुरू करण्यात आला आहे.

शहरा लगतच्या गावांमध्ये बांधकामांवर नियंत्रण राहावे, पायाभूत सुविधा पुरवता याव्यात यासाठी ही गावे राज्य सरकारकडून पुणे महापालिकेत समाविष्ट केली जातात. आत्तापर्यंत १९९७, २०१७, २०२१ अशा तीन टप्प्यात पुणे शहरात ५८ गावे समाविष्ट झाली आहेत. त्यामुळे शहराची हद्द ५४३ चौरस किलोमीटर इतकी मोठी झाली आहे. ही गावे महापालिकेत आली असली तरी त्या भागात पूर्वीपासूनच मोठ्याप्रमाणात बांधकाम झाल्याने तेथे रस्त्यांचे प्रश्‍न गंभीर होत आहेत. पर्यायी मार्ग नसल्याने लहान रस्ते अपुरे पडत आहेत. त्यामुळे शहराच्या संपूर्ण हद्दीचा विचार करून वेळोवेळी झालेले विकास आराखडे, नगररचना विभागातर्फे तयार केलेले प्रादेशिक आराखडे (आरपी) यानुसार रस्त्यांची माहिती संकलित करण्यात आली आहे.

महापालिकेने केलेल्या अभ्यासानुसार एकूण ४०१.२२ किलोमीटरचे अविकसित रस्ते (मिसिंग लिंक) असल्याचे समोर आले आहे. त्यामध्ये १२८ किलोमीटरचा रस्ते हे पीएमआरडीएच्या रिंगरोडमध्ये समाविष्ट असल्याने हा भाग महापालिकेने वगळला आहे. उर्वरित २७३.२२ किलोमीटर लांबचे ३९० रस्ते महापालिकेने शोधले आहेत. हे रस्ते एकाच वेळी विकसित करणे अशक्य आहे, त्यासाठी मोठ्याप्रमाणात निधी ही लागणार आहे. त्यामुळे त्यांचा विकास कसा करावा यासाठी अभ्यास सुरू केला आहे.

असे आहेत मिसिंग लिंक

पुणे शहराची जुनी हद्द - ४८.१८ किलोमीटर

१९९७ ला समाविष्ट झालेली २३ गावे - ९२.२६ किलोमीटर

२०११ ला समाविष्ट झालेली ११गावे (आरपी) - १८० किलोमीटर

२०२१ ला समाविष्ट झालेली २३ गावे - ८०.०५ किलोमीटर

चौकट

महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणात बहुतांश मिसिंग लिंक या दक्षीण व पश्चिम पुण्यात आहेत. यामध्ये येवलेवाडीपासून, कात्रज, आंबेगाव, धायरी, नऱ्हे, खडकवासला, वारजे, बावधन, सूस, बाणेर, बालेवाडी या भागात आहेत. विशेषतः हा भाग राष्ट्रीय महामार्गाच्या परिसरातील असल्याने या गावांमध्ये वाहतुकीचा प्रश्‍न गंभीर होत आहे.

कोट

शहरातील वाहतूक कोंडी सोवडिण्यासाठी व सध्याच्या अस्तित्वातील रस्त्यांवरील गर्दी कमी करण्यासाठी नवे रस्ते तयार करणे आवश्‍यक आहे. त्यासाठी विकास आराखड्यातील व आरपीमधील रस्त्यांचा अभ्यास करून असे रस्ते शोधण्यात आले आहेत. एकूण ४०१ किलोमीटरचे रस्ते आढळेल आहेत. त्यापैकी १२८ किलोमीटरचे रस्ते हे पीएमआरडीएच्या रिंगरोडमध्ये आहेत. उर्वरित २७३ किलोमीटरचे रस्ते महापालिकेला करावे लागणार आहेत. हे रस्ते कसे विकसित करावेत यासाठी विविध संस्थांशी चर्चा सुरू आहे, त्यांच्याकडून अभ्यास करून आराखडा तयार केला जाणार आहे.

- निखिल मिजार, वाहतूक नियोजनकार, महापालिका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Border Gavaskar Trophy: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर, Shami नाहीच; KL Rahulला अभय

Porsche Car Accident : डॉ. तावरेसह हाळनोरविरुद्ध फौजदारी खटला चालणार; राज्य सरकारकडून मंजुरी

South West Nagpur Assembly Election : विरोधकांसाठी आमच्या ‘लाडक्या बहिणी’च पुरेशा; देवेंद्र फडणवीस यांची टीका

Imtiaz Jaleel: "ज्यानं मला पाडलं, त्याला पाडण्यासाठी मी काय करतो बघाच"; इम्तियाज जलील यांचा थेट इशारा

IND A vs AFG A : भारतीय संघाचे लोटांगण; अफगाणिस्तानने उपांत्य फेरीत वाईट पद्धतीने हरवले

SCROLL FOR NEXT