Savitribai Phule Pune University Sakal
पुणे

सत्र परीक्षा ऑनलाइन आणि ऑफलाईन पद्धतीने घेण्याची मागणी

‘युक्रांद’च्या वतीने उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांना निवेदन

सकाळ वृत्तसेवा

पुणे : राज्यातील सर्व विद्यापीठातंर्गत महाविद्यालयांमध्ये घेण्यात येणाऱ्या सत्र परीक्षा ऑनलाइन आणि ऑफलाईन या दोन्ही पध्दतीने घेण्यात याव्यात, अशी मागणी ‘युक्रांद पुणे शहराचे उपाध्यक्ष कमलाकर शेटे यांनी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

कोरोना काळात सर्व परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आलेल्या आहेत. सध्या कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी झाल्याने ऑफलाईन पध्दतीने वर्ग सुरू होत आहेत. त्यामुळे परीक्षा सुद्धा ऑफलाईन पध्दतीने होणार असल्याचे चित्र आहे. परंतु या सत्राचा अभ्यासक्रम ऑनलाइन पध्दतीने शिकविला गेला आहे. त्यावर केवळ ऑफलाईन पद्धतीनेच परीक्षा घेण्यात येऊ नये, अशी अनेक विद्यार्थ्यांची मागणी आहे. पुढील सत्राचा अभ्यासक्रम ऑफलाईन पध्दतीने शिकविला जाईल, त्यावर ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यास विद्यार्थ्यांची हरकत नाही. परंतु सध्या हिवाळी सत्राची परीक्षा ऑनलाइन पद्धतीनेच घेतली जावी अशी मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे.

युक्रांदच्या वतीने गुगल फॉर्मद्वारे विद्यार्थ्यांची मते जाणून घेतली, असता केवळ दहा तासांत ११ हजार विद्यार्थ्यांनी आपली मते नोंदविली. यात ९३.०४ टक्के विद्यार्थ्यांनी ऑनलाइन परीक्षा घ्यावी, असे म्हटले आहे. विद्यार्थ्यांच्या मागणीचा विचार करता राज्यातील सर्व विद्यापीठांमधील सत्र परीक्षा ऑनलाइन पद्धतीने व्हाव्यात, अशी मागणी असल्याचे शेटे यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांना हिवाळी सत्र परीक्षेाठी ऑनलाइन आणि ऑफलाईन दोन्हीही पर्याय उपलब्ध करून द्यावेत. ऑनलाइन पध्दतीने अभ्यासक्रम शिकविला आहे तरीही ऑफलाईन पध्दतीने परीक्षा या सत्र परीक्षेनंतर पुढे घेण्यात याव्यात. विद्यार्थ्यांच्या मागणीचा योग्य विचार करून उच्च शिक्षण व तंत्र शिक्षण विभागाने सर्व विद्यापीठे आणि संलग्न महाविद्यालयाने आदेश द्यावेत, अशी मागणी शेटे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT