एवढ्या जागतिक दर्जाच्या सुविधा आहे, पण त्यांना चालविण्यासाठी साधा माणूस नाही. एवढंच काय, विद्यापीठात कॅंम्पस भरतीसाठी एक कंपनीही येते नाही.
पुणे - एवढ्या जागतिक दर्जाच्या सुविधा आहे, पण त्यांना चालविण्यासाठी साधा माणूस नाही. एवढंच काय, विद्यापीठात कॅंम्पस भरतीसाठी एक कंपनीही येते नाही. शिकणे आणि शिकविणे सोडून फक्त प्रशासकीय अडथळे दूर करण्यात वेळ जातोय. त्यामुळे दरवर्षी विद्यापीठ कॅम्पस आणि महाविद्यालयांतून तयार होणाऱ्या बेरोजगारांच्या फौजा थांबविणारा कुलगुरू हवा, अशी प्रतिक्रिया सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या एका जाणकार विद्यार्थ्याने व्यक्त दिली.
वर्षभरापासून रिक्त असलेल्या कुलगुरूपदासाठीची अर्ज मुदत नुकतीच संपली असून, विद्यापीठ कॅम्पसमधूनच १६ उमेदवार इच्छूक आहे. प्रक्रिया वेळेत पार पडली तर एप्रिल अखेर किंवा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात विद्यापीठाला नवे कुलगुरू मिळतील. सहाजीकच नव्या कुलगुरूंकडून विद्यार्थ्यांसह प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्याही काही अपेक्षा आहेत. त्याचा आढावा ‘सकाळ’ने घेतला. ऐकेकाळी ऑक्सफर्ड ऑफ इस्ट म्हणून नावलौकीक असलेल्या विद्यापीठाचा दरारा हळूहळू कमी होत आहे. प्रशासकीय कामकाजातून विद्यार्थी आणि प्राध्यापक हद्दपार होतो की काय, अशी सध्या स्थिती आहे. नवीन शैक्षणिक धोरणाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाला शैक्षणिक नेतृत्व देणाऱ्या कुलगुरूंची गरज आहे. नव्या कुलगुरूकडून सर्वसमावेश नेतृत्त्वाची आणि विद्यार्थी केंद्रीत धोरणाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
विद्यापीठासमोरील आव्हाने....
- कोरानानंतरचे शैक्षणिक वेळापत्रक पूर्ववत करणे
- प्राध्यापकांच्या रिक्त पदांच्या भरतीसाठी प्रयत्न करणे
- दिवसेंदिवस किचकट होणाऱ्या प्रशासकीय कामकाजात सहजता आणने
- विद्यापीठ कॅम्पसवर जास्तितजास्त उद्योगांना आकर्षित करणे
- संशोधनासाठी उद्योगांचा सहभाग वाढविणे
प्राध्यापकांच्या अपेक्षा..
- प्रशासकीय अडथळ्यांतून मुक्त करत ‘अध्यापन’ आणि संशोधनासाठी मोकळीक द्यावी
- रिक्त पदांच्या भरतीसाठी प्रयत्न करावेत
- विद्यार्थीकेंद्रीत धोरणांची अंमलबजावणी करणारे हवेत
- प्राध्यापकांना विचारात घेत आणि चर्चा केल्यानंतर नवे धोरण आणावे
संशोधक विद्यार्थ्यांच्या अपेक्षा...
- बंद पडलेली पोस्ट डॉक फेलोशिप, विद्यापीठाची फेलोशीप सुरू करावी
- संशोधनासाठी अधिकाधिक सामंजस्य करार करावेत
- नियमितपणे पीएच.डी.च्या जाहिराती याव्यात
- वसतिगृहांची संख्या वाढवावी
- आंतरराष्ट्रीय परिषदांसाठीचा प्रवास खर्चाची योजना पुन्हा सुरू करावी
व्यावसायिक अभ्यासक्रम खिशाला परवडावेत
आजच्या काळाशी सुसंगत आणि रोजगाराभिमूख अभ्यासक्रम विद्यापीठाकडून मागील काही वर्षांत सुरू करण्यात आले आहे. पण, स्वयंअनुदानित असलेले हे अभ्यासक्रम सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या खिशाला परवडणारे नाहीत. त्यामुळे सार्वजनिक विद्यापीठ असूनही विद्यार्थी अशा अभ्यासक्रमांना मुकत आहे. त्यांचे शुल्क कमी करण्याचे मोठे आव्हान नव्या कुलगुरूंसमोर आहे.
विद्यार्थी केंद्रबींदू मानत प्रशासकीय निर्णय घेणारे नवे कुलगुरू हवेत. सध्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त असलेली पदे भरण्यासाठी आणि आवश्यक प्रशाकीय बदलांना त्यांनी प्राधान्य द्यायला हवे.
- डॉ. सुनिल धिवार, अध्यक्ष, विद्यापीठ कर्मचारी संघ
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नावलौकीकाला साजेसे आणि काम पुढे नेणारे नवे कुलगुरू हवेत. बिघडलेली शैक्षणिक घडी पूर्ववत करत, सर्वांना सोबत घेत विद्यार्थी केंद्रीत धोरणे आखणाऱ्या कुलगुरूची विद्यापीठाला सध्या अत्यंत आवश्यकता आहे.
- डॉ. के.एल. गिरमकर, अध्यक्ष, एसफुक्टो
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.