water  sakal
पुणे

Pune Water Supply : हांडेवाडी रस्त्याच्या गुलामअलीनगरमध्ये अपुरा व दूषित पाणी पुरवठा

कृष्णकांत कोबल

हांडेवाडी रस्त्याच्या गुलामअलीनगर परिसरात दिवसाआड, अपूरा व दूषित पाणी पुरवठा

हडपसर : हांडेवाडी रस्त्याच्या गुलामअलीनगर परिसरात दिवसाआड, अपूरा व दूषित पाणी पुरवठा होत आहे. गेली पाच-सहा दिवसांपासून येथील रहिवाशांना असा पाणीपुरवठा होत आहे. याबाबत तक्रार करूनही पालिकेचा पाणीपुरवठा विभाग दुर्लक्ष करीत असल्याने रहिवाशांनी संताप व्यक्त केला आहे.

गुलामअलीनगरमधील गल्ली क्रमांक पाचमध्ये पिण्याच्या पाण्यामध्ये ड्रेनेजचे पाणी मिसळून गडद पिवळ्या रंगाचा पाणीपुरवठा होत आहे. या परिसरात दिवसा आड तोही दूषित पाणीपुरवठा होत आहे. आगोदरच दिवसा आड तोही कमी वेळ आणि दूषित पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे येथील नागरिकांना काही दिवसांपासून पाण्याच्या मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे.

याबाबत माजी नगरसेवक शिवसेनेचे शहराध्यक्ष प्रमोद भानगिरे यांनी पाणीपुरवठा विभागाकडे तक्रार केली होती. मात्र, त्यांच्याकडून केवळ तात्पुरती डागडुजी करण्यात आली. त्यानंतर पुन्हा दोन दिवसांनी दूषित पाणीपुरवठा होऊ लागला आहे, अशी तक्रार येथील मनीषा शेलार, माधुरी भुजबळ, पूजा पवार, निलम मोरे, नईम शेख, श्रीकांत मोरे आदींनी केली आहे.

"आमच्या सोसायटीत पालिकेकडून पाणीपुरवठ्याची ठराविक वेळ नाही. तेही कधी पंधरा मिनिटे तर कधी पाऊनतास येते. गेली काही दिवसांपासून दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. अपुरे आणि दूषित पाणीपुरवठ्यामुळे पुढील दोन महिने कसे जातील, याची चिंता आहे.'

- मोनिका जैनक, गृहिणी

दरम्यान, याबाबत उप अभियंता संजय बोरसे यांना दोन वेळा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajan Teli: राजन तेली आमचेच! दिशाभूल झालेले अनेक जण परतणार; उद्धव ठाकरेंचं सूचक विधान

Direct Tax: मोदी सरकारच्या दहा वर्षांत प्रत्यक्ष कर संकलन 182 टक्क्यांनी वाढले; महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर, गुजरात कुठे?

Ola Electric : ओला इलेक्ट्रिककडून नवीन बॉस ऑफर्सची घोषणा, एस१ पोर्टफोलिओवर जवळपास २०,००० रूपयांची सूट आणि २५,००० रूपयांचे अतिरिक्‍त फायदे

IND vs NZ 1st Test : Virat Kohli चा भीमपराक्रम! गाजवलं आंतरराष्ट्रीय क्रिकेट अन् कसोटीत विक्रमी झेप

Shiv Sena: शहाजीबापुंच्या विरोधात ठाकरेंची मोठी खेळी, अजित पवारांच्या बड्या नेत्यानं हाती घेतली मशाल! उद्धव ठाकरे, म्हणाले...

SCROLL FOR NEXT