pune weather update cold rain forecast heat atmosphere marathi news sakal
पुणे

Pune Weather Update : थंडी पुन्हा परतणार, ढगाळ वातावरण निवळले; हवामान कोरडे

सकाळ वृत्तसेवा

Pune News : शहरासह संपूर्ण जिल्ह्यातच ढगाळ हवामान निवळले असून, पुढील दोन दिवसांत थंडी पुन्हा परतणार आहे. पुढील आठवडाभर तरी आकाश मुख्यतः निरभ्र राहून, सकाळी धुके पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे दिवाळसनावर असलेले पावसाचे सावट दूर झाले आहे.

शनिवारी सकाळपासूनच आकाश निरभ्र होते. दुपारच्या कमाल तापमानातही बऱ्यापैकी घट झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे दिवाळीच्या उत्तरार्धात कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता आहे.

पुणे जिल्ह्यात जरी वातावरण कोरडे असले तरी कोकणात काही ठिकाणी ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. नोव्हेंबरच्या उत्तरार्धात मात्र पावसाची शक्यता नसल्याचे हवामान तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे या काळात थंडीमध्ये वाढ होईल.

राज्यात गुलाबी थंडीची प्रतीक्षा

रविवारी (ता. १२) राज्यात ढगाळ हवामानासह तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता आहे. राज्यात मुख्यतः कोरड्या हवामानाचा अंदाज आहे. राज्यात गारठा कमी झाला असून, गुलाबी थंडीची प्रतीक्षा आहे.

पश्चिम - मध्य अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे. बंगालच्या उपसागरात मंगळवारपर्यंत (ता. १४) कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत. पश्चिमेकडे सरकताना या प्रणालीची तीव्रता वाढेल. ढगाळ आकाशामुळे राज्याच्या तापमानात चढ-उतार सुरू आहे. उकाडा कायम आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shiv Sena: शहाजीबापुंच्या विरोधात ठाकरेंची मोठी खेळी, अजित पवारांच्या बड्या नेत्यानं हाती घेतली मशाल! उद्धव ठाकरे, म्हणाले...

पोट धरून हसाल! आईसक्रीम खात IND vs NZ मॅच पाहणाऱ्या फॅनची शास्त्रींनी उडवली खिल्ली ; Funny Video

Latest Maharashtra News Updates : आमदार राजेद्र शिंगणे यांची अजित पवारांकडून समजूत काढण्याचा प्रयत्न

बैठकीला नाना पटोले उपस्थित असतील तर...; ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये बिनसलं? जागांचा वाद विकोपाला

बिग बॉस फेम अरमान मलिकचा मोठा अपघात; थोडक्यात बचावला जीव, व्हिडिओ शेअर करत सांगितलं नेमकं काय घडलं

SCROLL FOR NEXT