Weather Update  Sakal
पुणे

Weather Update : पुण्यात उन्हाचा चटका कायम राहणार; राज्यात वादळी पावसाला पोषक वातावरण

सकाळ वृत्तसेवा

Pune Weather Update: आठवडाभरापासून शहर आणि जिल्ह्यातील सरासरी कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असून, पुढील आठवड्यातही उन्हाचा चटका कायम राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

जिल्ह्याच्या पूर्व भागात तुलनेने अधिक तापमान असून, पश्चिम भागात काहीसा दिलासा आहे. शनिवारी जिल्ह्यात सर्वाधिक कमाल तापमान तळेगाव ढमढेरे येथे ४३ अंश सेल्सिअस, किमान तापमान लोणावळा येथे ३६.१ अंश सेल्सिअस नोंदविले गेले.

पुढील दोन दिवस आकाश मुख्यतः निरभ्र आणि दिवसभर उन्हाचा चटका तापदायक ठरेल, अशी शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे. सध्या मराठवाडा आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती असून,

त्यापासून विदर्भ, छत्तीसगड, ओडिशा, झारखंड ते पश्‍चिम बंगालमधील चक्राकार वाऱ्यांपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा विस्तारला आहे. राज्यात उन्हाचा चटका वाढला असून, वादळी पावसाला पोषक हवामान होत आहे. रविवारी (ता. ५) कोकणात उष्ण व दमट हवामानाचा इशारा देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात उन्हाचा चटका, उकाडा कायम राहण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यातील कमाल तापमान (अंश सेल्सिअस)

- तळेगाव ढमढेरे ः ४३

- शिरूर, पुरंदर ः ४२.१

- इंदापूर, लवळे ः ४१.३

- मगरपट्टा, वडगावशेरी, कोरेगाव पार्क, चिंचवड ः ४१.१

- राजगुरुनगर, आंबेगाव ः ४०.७

- बारामती, खेड, दौंड ः ४०

- हडपसर, शिवाजीनगर, एनडीए, पाषाण ३९.६

- तळेगाव ः ३९.२

- नारायणगाव, दापोडी ः ३८.५

- भोर ः ३६.७

- निमगिरी, लवासा ः ३६.५

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तो जगला, तरच देश जगेल

कृषिक्षेत्र आधुनिकतेच्या दिशेनं

जातिनिहाय जनगणनेची अपरिहार्यता

निवडणूक काश्मीरची; परीक्षा केंद्राची

संघ भाजपच्या मदतीला येणार...

SCROLL FOR NEXT