Crime_Bribe 
पुणे

पुणे : महिला न्यायाधीशानं सात ते आठ जणांकडे मागितली लाच? व्हॉइस रेकॉर्ड पोलिसांच्या हाती

सकाळ वृत्तसेवा

पुणे : लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केल्यानंतर विभागाने याबाबत चौकशी सुरू केली आहे. त्यातून जागेच्या वादासंदर्भात आणखी सात ते आठ लोकांना बाजूने निकाल लावून देण्यासाठी गायकवाड हिने संपर्क केल्याचे निष्पन्न झाले आहे. ही सर्व प्रकरणे न्यायदंडाधिकारी जतकर यांच्या न्यायालयात प्रलंबित आहेत.

या गुन्ह्यातील अटक आरोपी आणि अर्जदार यांच्यात मोबाईलवरून १४७ वेळा संभाषण झाले आहे. न्यायदंडाधिकारी जतकर यांच्या मोबाईल क्रमांकाचे डीसीआर पोलिसांना मिळाले आहे. न्यायदंडाधिकारी जतकर यांनी गायकवाड यांना ‘तक्रारदार यांच्या विरुद्धच्या केसमध्ये त्यांच्या बाजून काम करून देते’, असे म्हणाल्याचे व्हॉइस रेकॉर्ड पोलिसांच्या हाती आले आहे.

धक्कादायक बाब म्हणजे गायकवाड हिने तपासादरम्यान न्यायाधीश देशमुख आणि अजय गोपीनाथन यांची नावे घेतली आहेत. त्याबाबत देखील पोलिस तपास करीत आहेत. न्यायदंडाधिकारी जतकर यांनी इतर आरोपींच्या मदतीने तक्रारदारांकडून काही रक्कम स्वीकारली आहे काय? याचा देखील पोलिस तपास करीत आहेत. जतकर यांनी वापरलेले सीम हे मुंबईत राहणाऱ्या समता कुबडे यांच्या नावाने आहे. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांना जतकर यांना दोन सिमकार्ड दिल्याचे पुढे आले आहे.

दरम्यान, न्यायदंडाधिकारी जतकर यांनी जाधव याला १८ तर केंजळे याला चार वेळा कॉल केला आहे. न्यायदंडाधिकारी जतकर आणि इतर आरोपींनी यापूर्वी कट करून आणखी काही गुन्हे केले आहेत? यासंदर्भात तपास करायचा असल्याने त्यांना पोलिस कोठडी देण्यात यावी, असा युक्तिवाद सरकारी वकील विलास घोगरे-पाटील यांनी केला. विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी आरोपीस पाच एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

- पुणे शहर आणि जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amruta Fadnavis: ''एकाला कुटुंब सांभाळायचंय तर दुसऱ्याला मुलीला मुख्यमंत्री करायचंय'' अमृता फडणवीसांचा नागपुरातून घणाघात

IPL Retention, मेगा ऑक्शन अन् अन् राईट टू मॅच कार्ड... बैठकीनंतर BCCI करणार मोठी घोषणा?

Nirmala Sitharaman आणि JP Nadda यांना न्यायालयाचा दणका; एफआयआर दाखल, जाणून घ्या नेमकं प्रकरण...

Mohan Bhagwat: ''महात्मा फुलेंनीच शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली, हे मी मनाचं बोलत नाही..'', फडणवीसांसमोर अजित पवारांचं विधान

Voting Registration: विधानसभा निवडणुकीसाठी मतदार नोंदणी अद्यापही सुरु; मुख्य निवडणूक आयुक्तांनी केलं 'हे' महत्वाचं आवाहन

SCROLL FOR NEXT