kondhwa police station pune esakal
पुणे

Pune Crime: पुन्हा एकदा महिला अत्याचाराच्या घटनेनं महाराष्ट्र हादरला! पुण्यात बोपदेव घाटातून तरुणीचे अपहरण अन् ....

Sandip Kapde

पुणे: पुण्यातील बोपदेव घाटात तरुणीवर घडलेली अत्याचाराची घटना पुन्हा एकदा समोर आली आहे. मित्रासोबत फिरायला गेलेल्या २० वर्षीय तरुणीला मानवाधिकार संघटनेचा कार्यकर्ता असल्याचे भासवून तिघा आरोपींनी अपहरण केले आणि त्यानंतर सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याचे उघड झाले आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

बोपदेव घाटात अपहरणाचा प्रकार

मित्रासोबत फिरण्यासाठी पुण्याजवळील बोपदेव घाटात गेलेल्या तरुणीवर तिघांनी पाठलाग केला. स्वतःला मानवाधिकार संघटनेचे कार्यकर्ते असल्याचे सांगत त्यांनी तरुणीचे आणि तिच्या मित्राचे फोटो काढले. त्या आरोपींनी तिला बळजबरीने कारमध्ये बसवले आणि कोंढवा भागातील खडी मशिन चौकात नेले. तिथे तरुणीला त्रास देत अत्याचार करण्यात आला. या धक्कादायक प्रकारानंतर आरोपींनी तिला तिथेच सोडून फरार झाले.

पोलीस कारवाई-

पीडित तरुणीने लगेचच कोंढवा पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. तिच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शबाना शेख या प्रकरणाचा तपास करत आहेत.

पोलिस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा म्हणाले, "कोंढवा पीएस अधिकारक्षेत्रात सामूहिक बलात्काराची घटना घडली आहे. काल रात्री एक 21 वर्षीय तरुणी आणि तिचा मित्र बोपदेव घाट परिसरात गेले होते, तिथे रात्री 11 च्या सुमारास तीन अज्ञात आरोपींनी तिच्यावर बलात्कार केला. पहाटे पाचच्या सुमारास या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. आरोपींचा शोध सुरू आहे. आरोपींच्या शोधासाठी आणि अटक करण्यासाठी गुन्हे शाखा आणि तपास शाखेची दहा पथके नेमण्यात आली आहेत. तपशीलवार माहिती योग्य वेळी सामायिक केली जाईल"

आरोपींवर कठोर कारवाईची मागणी

या घटनेने पुणे शहरात प्रचंड संतापाचे वातावरण आहे. महिलांच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, आरोपींवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी पोलिस प्रशासनाला आणखी कडक पावले उचलावी लागणार आहेत, असे मत सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केले आहे.

महिला सुरक्षेवर लक्ष देण्याची गरज

सतत वाढत असलेल्या महिलांवरील अत्याचाराच्या घटनांनी समाजाच्या सुरक्षेविषयी चिंतेचे वातावरण निर्माण केले आहे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे.

पीडित तरुणी सुरत येथील असून, तिचा मित्र जळगाव येथील असल्याची माहिती समोर आली आहे. बोपदेव घाटात रात्री लुटमारीच्या घटना वाढल्या आहेत. या भागात फिरण्यासाठी आलेल्या तरुण-तरुणींना लुबाडण्याचे प्रकार सुरू आहेत. दोन दिवसांपूर्वीच मित्रासमवेत गेलेल्या तरुणीचे मोटारीमधून अपहरण करून तिचा विनयभंग केल्याची घटना घडली होती. त्यानंतर आता बलात्काराची घटना समोर आली आहे.

बोपदेव घाटात पोलिसांकडून गस्त सुरू असल्याचे सांगितले जाते. तरीही अशा गंभीर घटना घडत असल्यामुळे कोंढवा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NIAचे महासंचालक ते दहशतवाद्यांचा कर्दनकाळ अशी ओळख; आता हे निवृत्त IPS अधिकारी BCCI मध्ये सांभाळणार मोठी जबाबदारी

Womens T-20 world cup स्पर्धेपूर्वी रोहित शर्माने घेतली भारतीय खेळाडूंची भेट, हरमनप्रीत, स्मृती, जेमिमासोबतचा Video Viral

Prasad Oak : "स्ट्रगलच्या काळात आली रस्त्यावर झोपण्याची वेळ" प्रसादने सांगितला तो कठीण काळ , बायकोचे ट्रोलर्सला खडेबोल

Latest Marathi News Live Updates: नदीद्वारे महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशचा हा ‘संगम’ दोन्ही राज्यातील लोकांच्या जवळच्या नातेसंबंधाचे प्रतीक - श्रीकांत शिंदे

मेट्रोची Aarey To BKC Aqua Line भुयारी सेवा 5 ऑक्टोबरपासून सुरू होणार, कसं असेल भाडं आणि वेळापत्रक, जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT