Taljai Hill Sakal
पुणे

Pune Taljai Hill : होय, शक्य आहे! तळजाईचे लोकसहभागातून संवर्धनाचे उत्तम उदाहरण

‘ही टेकडी आमची आहे. तिचं संरक्षण ही आमच्या प्रत्येकाची जबाबदारी आहे.’ असा दृढनिश्चय करून तळजाई टेकडीच्या संरक्षणासाठी या परिसरातील शेकडो नागरिक रस्त्यावर उतरले.

योगिराज प्रभुणे

‘ही टेकडी आमची आहे. तिचं संरक्षण ही आमच्या प्रत्येकाची जबाबदारी आहे.’ असा दृढनिश्चय करून तळजाई टेकडीच्या संरक्षणासाठी या परिसरातील शेकडो नागरिक रस्त्यावर उतरले.

पुणे - ‘ही टेकडी आमची आहे. तिचं संरक्षण ही आमच्या प्रत्येकाची जबाबदारी आहे.’ असा दृढनिश्चय करून तळजाई टेकडीच्या संरक्षणासाठी या परिसरातील शेकडो नागरिक रस्त्यावर उतरले. धरणे, आंदोलने, निवेदन या लोकशाहीतील आयुधांचा प्रभावी वापर करत टेकडी आणि त्यावरचे एकेक झाड वाचवलं. त्यामुळे लोकसहभागातून शहरातील टेकड्या वाचविता येतात, याचं उत्तम उदाहरण म्हणजे तळजाई टेकडी!

शहरातील हरित क्षेत्र वाढले

वेगाने विस्तारणाऱ्या शहरात प्रदूषण ही सर्वांत मोठी डोकेदुखी आहे. त्याचा प्रभावी कमी करण्यासाठी शहरातील हरित क्षेत्र (ग्रीन कव्हर) वाढविणे आवश्यक आहे. शहरातील हरित क्षेत्र गेल्या दोन दशकांमध्ये वाढल्याचे निरीक्षण ‘पुणे हिल्स लँड युज, लँड कव्हर अँनॅलिसीस’ने केलेल्या अभ्यासात नमूद केले आहे. शहरात २०००च्या तुलनेत २०२०मध्ये हरितक्षेत्र ६.०१ टक्क्यांनी वाढल्याचे यात अहवालात म्हटले आहे. याचे कारण देताना असे स्पष्ट केले आहे की, शहर परिसरात असलेल्या पुणे आणि खडकी या दोन्ही कँन्टोन्मेंटने चांगल्या प्रकारे वृक्षजोपासना केली आहे. त्याचा परिणाम म्हणून शहरातील हरित क्षेत्र वाढल्याचे दिसते.

व्हॉट्सॲप ग्रुप

तळजाई टेकडीबाबत अद्ययावत माहिती एकमेकांना देण्यासाठी वेगवेगळे व्हॉटस्ॲप ग्रुप तयार केले आहेत. सगळ्या ग्रुपमध्ये मिळून ७५० सदस्य आहेत. त्यामुळे टेकडीवर झालेले बारीक-सारिक बदलही लगेच ग्रुपवर टाकले जातात. त्यातून टेकडीच्या संवर्धनास मदत होते.

लोकसहभागाचे महत्त्व

पुण्यातील प्रमुख १५ टेकड्यांपैकी तळजाई ही एक टेकडी. सहकारनगरमध्ये ही टेकडी आहे. बरोबर २३ वर्षांपूर्वी ही टेकडी ओसाड होती. लोकसहभागातून येथे वृक्षारोपण करण्यात आले. ती झाडे जगविण्यात आली. त्यासाठी तळजाईवर येणाऱ्या शेकडो हातांची मदत झाली. त्यानंतर जेव्हा-जेव्हा तळजाईवर अतिक्रमणांचा प्रयत्न केला त्या प्रत्येक वेळी टेकडीच्या संरक्षणासाठी हे लोकं धावून आले. त्यामुळे हरित क्षेत्र वाढून येथील जैवविविधता टिकण्यास मदत झाली.

भेडसावणाऱ्या समस्या

कचऱ्याचा प्रश्‍न : सहकारनगरमार्गे रस्त्याने टेकडीवर जाताना रस्त्याच्या कडेला प्रचंड कचरा पडला आहे. पॅगोडाच्या परिसरातही कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. दारूच्या बाटल्यांची खचही येथे पडला आहे.

वाहनांची वर्दळ वाढली : टेकडीवर जाण्यासाठी सिमेंट काँक्रिटचा रस्ता केल्याने येथे वाहनांची वर्दळ वाढली आहे. पदपथावर वाहने पार्क केली जातात. चार चाकी वाहनेही बेफाम वेगाने चालविली जातात. त्याचा उपद्रव आता टेकडीवर चालायला येणाऱ्या नागरिकांना होत आहे.

अपघातांचे प्रमाण वाढले : टेकडीवर सुसाट वेगाने वाहने चालविली जातात त्यामुळे येथे अपघातांचे प्रमाण वाढले आहे.

टेकडीच्या माथ्यावर वनविभागाच्या जागेत चालण्यासाठी ट्रॅक केला आहे. पण, त्यावर मुरूम टाकला असल्याने चालता येत नाही. प्रत्येक पावलावार पाय मुरगळण्याचा धोका वाढला आहे.

- श्रीकृष्ण जोशी

टेकडीवर आता सिमेंटचा वापर करून कोणतीच विकासकामे करू नका. आहे तशी टेकडी नैसर्गिक ठेवा. जंगलातील पाऊल वाटा जतन करा.

- सुकृत देव

टेकडी म्हणजे आता कचरापेटी झाली आहे. कोण कुठून कचरा आणून कुठेही टाकत आहे. त्यामुळे कचरा हे आता या टेकडीपुढील नवीन डोकेदुखी म्हणून पुढे आली आहे.

- विवेक बापट

या टेकडीवर पूर्वी खूप मोर असायचे. आता झाडे विरळ झाली आहेत. त्यामुळे मोरांचा अधिवास धोक्यात आला आहे. त्याचा थेट परिणाम मोरांची संख्या कमी होण्यावर झाल्याचे जाणवते.

- अमित शहाणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT