पुणे : काही दिवसांपूर्वी मुंबईतील एका डॉक्टरला आईस्क्रीममध्ये मानवी हाताचं बोट आढळून आल्यानं खळबळ उडाली होती. यानंतर या प्रकरणाचा तपास पोलिसांनी सुरु केला होता. या मानवी बोटाची डीएनए चाचणी देखील करण्यात आली. दरम्यान, ज्या आईस्क्रीमच्या फॅक्टरीत हे आईस्क्रीम तयार करण्यात आलं होतं ती फॅक्टरीही बंद करण्यात आली होती. पण आता या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. ते बोट नेमकं कोणाचं होतं? याची माहिती पोलिसांना मिळाली असून याचा खुलासा त्यांनी केला आहे. (Pune Yummo Ice Cream Case whose human finger found in ice cream police disclosed)
पोलिसांना चौकशीत ही माहिती मिळाली की, ज्या फॅक्टरीत हे आईस्क्रीम तयार झालं होतं त्या फॅक्टरीत काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याचं हे बोट आहे. काही दिवसांपूर्वी फॅक्टरीत काम करत असताना अपघातानं त्याचं बोट छाटलं गेलं होतं. यामुळं पोलिसांचा संशय बळावला की आईस्क्रीममध्ये आढळून आलेलं बोट हे याच कर्मचाऱ्याचं असावं. पण याची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी संबंधित कर्मचाऱ्याची डीएनए चाचणी केली असून त्याचा अहवाल तापसणीसाठी फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीला (एफएसएल) पाठवला आहे.
ही घटना समोर आल्यानंतर फूट सेफ्टी अँड स्टँडर्ड्स ऑथरिटी ऑफ इंडियानं (FSSAI) यापूर्वीच या आईस्क्रीम कंपनीचं लायसन्स रद्द केलं आहे.
मुंबईतील मालाड इथं राहणाऱ्या एका डॉक्टरनं ज्यांचं नाव ब्रेन्डन फेरारो असं आहे, यांनी तीन आईस्क्रीम कोन ऑनलाईन अॅपच्या माध्यमातून मागवले होते. त्याचवेळी आईस्कीम खात असताना फेरारो यांना बाईट करताना काहीतरी वेगळंच खात असल्याची जाणीव झाली. त्यांना वाटलं कदाचित आईस्क्रीममध्ये मोठा काजू किंवा बदाम असावा. त्यानंतर त्यांनी कोनमधील हे आईस्क्रीम बोटानं बाजूला केलं तर त्यांना धक्काच बसला. कारण या वस्तूवर त्यांना नख दिसलं! ही माझ्यासाठी थरारक घटना होती असं या डॉक्टरनं सांगितलं.
दरम्यान, या घटनेची चर्चा सुरु झाल्यानंतर हे आईस्क्रीम बनवणाऱ्या Yummo कंपनीनं स्पष्टीकरण दिलं की या आईस्क्रीमची निर्मिती थर्ट पार्टी कंपनीकडून केली जाते. त्यामुळं आम्ही या थर्ड पार्टी कंपनीचं काम थांबवलं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.