पुणे - राज्यात कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी राज्य सरकारने यंदा पहिल्यांदाच शाळा पूर्वतयारी पंधरवड्याचे आयोजन करण्याचा आदेश सर्व जिल्हा परिषदांना दिला आहे. यामुळे यंदाच्या शैक्षणिक वर्षात पटनोंदणी पंधरवडा आपोआप गायब झाला आहे. यामुळे प्रत्यक्ष ऑफलाइन शाळा सुरु होण्याच्या आधीचे १५ दिवस हा पंधरवडा साजरा करावा लागणार आहे.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
पुणे जिल्हा परिषदेच्या शाळा १ ऑगस्टपासून भरणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यात येत्या १५ जुलैपासून हा शाळा पूर्वतयारी पंधरवड्याचे आयोजन केले जाणार आहे.
राज्य सरकारने यंदाच्या शैक्षणिक वर्षात टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार पुणे जिल्हा परिषदेच्या काही शाळा दुसऱ्या टप्प्यात म्हणजेच येत्या १ ऑगस्टपासून सुरू होणार आहेत. या दुसऱ्या टप्प्यात केवळ इयत्ता सहावी ते आठवीचे वर्ग असलेल्या शाळा सुरू होणार असल्याचे जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सुनील कुऱ्हाडे यांनी आज (ता.२७) सांगितले.
पहिल्या टप्प्यातील शाळा येत्या १ जुलैपासून भरणार आहेत. या टप्प्यात नववी, दहावी आणि बारावीचे वर्ग सुरू होणार आहेत. मात्र पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शाळा नसल्याने, या पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषदेची एकही शाळा ऑफलाईन सुरू होणार नसल्याचेही कुऱ्हाडे यांनी स्पष्ट केले.
या शाळा पूर्णतयारी पंधरवड्यात शालेय व्यवस्थापन समितीची बैठक घेणे, विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करणे, शाळेची स्वच्छता करणे, शाळा निर्ज़ंतुकीकरण करणे आदी प्रमुख कामे केली जाणार आहेत.
शाळांनी काय करावे?
- शालेय व्यवस्थापन समिती सभा प्रत्यक्ष, ऑनलाइन, व्हाॅटसप किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आयोजित कराव्यात.
- स्थानिक पदाधिकाऱ्यांशी समन्वय साधणे.
- मोफत पाठ्यपुस्तके वाटप.
- शाळांची स्वच्छता, निर्जंतुकीकरण करणे.
- शाळेत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व शौचालयाची स्वच्छता करणे.
- गटागटाने पालक सभा घेऊन पालकांची कोरोनाबाबतची भीती घालवणे.
- बालरक्षक, शिक्षकांनी गृहभेटीद्वारे शाळाबाह्य मुलांचा शोध घेणे.
- विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक अद्ययावत करणे.
- गरीब विद्यार्थ्यांसाठी ग्रामपंचायतींच्या मदतीने टि. व्ही., रेडिओ आणि संगणकाची व्यवस्था करणे.
- ग्रंथालयातील पुस्तकांचे अवांतर वाचन, श्रमदान, कविता लेखन करणे.
- शिक्षकांचे आणि पालकांचे गुगल क्लासरुम, वेबिनार आणि डिजिटल शिक्षणासाठीचे सक्षमीकरण करणे.
- दीक्षा ॲपचा प्रसार व प्रचार करणे.
- ई-कंटेंट निर्मिती करणे.
- शाळेच्या विषयक जनजागृती करणे.
- सायबर सुरक्षेसाठी विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांचे उद्बबोधन करणे.
- गुगल फॉर्मद्वारे ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू करणे.
- दररोज किमान दहा ते पंधरा पालकांना भेटून विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आढावा घेणे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.