Leopard  sakal
पुणे

Leopard : बिबट्या बाहेर, तरी प्राणिसंग्रहालय सुरू ; सुमारे दोन हजार पर्यटकांच्या जिवाशी खेळ

बिबट्या त्याचा पिंजरा सोडून पाच ते सहा तास झाल्यानंतरही सापडला नाही. अशा वेळी राजीव गांधी प्राणिसंग्रहालय पर्यटकांसाठी का खुले ठेवले, एखादी दुर्घटना झाल्यास त्याची जबाबदारी कोणावर,

सकाळ वृत्तसेवा

कात्रज : बिबट्या त्याचा पिंजरा सोडून पाच ते सहा तास झाल्यानंतरही सापडला नाही. अशा वेळी राजीव गांधी प्राणिसंग्रहालय पर्यटकांसाठी का खुले ठेवले, एखादी दुर्घटना झाल्यास त्याची जबाबदारी कोणावर, असे प्रश्न आता वनखात्यातील अधिकाऱ्यांनी विचारले आहेत. त्यामुळे बिबट्या पिंजऱ्यातून निसटला त्या दिवशी प्राणिसंग्रहालय बंद ठेवलेच पाहिजे होते, असे स्पष्ट मतही विविध अधिकाऱ्यांनी नोंदविले.

प्राणी संग्रहालयातील पिंजऱ्यातून बिबट्या बाहेर पडल्यानंतर प्राणिसंग्रहालय सुरू ठेवत पर्यटकांच्या जिवाशी खेळ करण्याचा प्रकार प्रशासनाने केला. कार्यालयीन दिवशी साधारणतः दोन हजारांपर्यंत पर्यटक भेट देतात. अशा वेळी लोकांची सुरक्षितता हा महत्त्वाचा मुद्दा मानून प्राणिसंग्रहालय तातडीने बंद करणे आवश्यक असताना सायंकाळपर्यंत ते चालू ठेवले, असे स्पष्ट झाले आहे. सोमवारी (ता. ४) सकाळी साडेपाचच्या सुमारास बिबट्या बाहेर पडला. ही बाब सहा वाजता प्राणिसंग्रहालय प्रशासनाच्या लक्षात आली.

संग्रहालय पर्यटकांसाठी नऊ वाजता खुले करण्यात येते. मात्र तरीही ते बंद ठेवण्याचा निर्णय घेतला नाही, याला संग्रहालयातील कर्मचाऱ्यांनी दुजोरा दिला. पर्यटक संग्रहालयामध्ये असल्याने त्यांचा आवाज आणि गोंगाट असतो. त्यामुळे बिबट्याला असुरक्षित वाटल्यानेही तो बाहेर आला नसावा. केवळ बिबट्या असलेला परिसर पर्यटकांसाठी बंद केल्याचे संग्रहालय प्रशासनाकडून सांगण्यात येत असले, तरी हा पर्याय होऊ शकत नसल्याचे तज्ज्ञ सांगतात. पर्यटकांसाठी मंगळवारी (ता. ५) प्राणिसंग्रहालय बंद ठेवले होते. त्यामुळे दुरून आलेल्या पर्यटक निराश झाले.

आम्ही मंगळवारी सकाळी आळेफाट्यावरून प्राणिसंग्रहालय पाहण्यासाठी आलो. मात्र आम्हाला माहीत नव्हते असा काही प्रकार घडला आहे.

त्यामुळे आता एवढ्या लांबून येऊन लहान मुले नाराज झाली आहेत.

- सोनल पाडेकर, पर्यटक

सोमवारी रात्री जेव्हा बिबट्या पिंजऱ्याबाहेर पडल्याच्या बातम्या आल्या, त्या वेळी घबराट पसरली होती. आमच्या सोसायटीतील अनेकांनी तसे फोन केले. मंगळवारीही दिवसभर लोक प्राणिसंग्रहालयाच्या परिसरात जाण्यासाठी घाबरत होते.

- बाळासाहेब थोरात, स्थानिक

बिबट्या पिंजऱ्यातून निसटल्याचे लक्षात आल्यानंतर तातडीेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेने नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणे गरजेचेेेेेेेेेे होते. त्यामुळे त्या दिवशी प्राणिसंग्रहालय बंद ठेवणे आवश्यक होते.

- सुशांत वानखेडे, निवृत्त वन अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बुधप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT