Pune Jilha Parishad Sakal
पुणे

पुणे : झेडपीच्या सिईओंच्या अधिकारांचे पुन्हा विकेंद्रीकरण

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या (CEO) टेबलावरील फायलींचा खच कमी करणे, किरकोळ कामांसाठी ग्रामस्थ, कर्मचारी यांना झेडपीकडे खेटे मारावे लागणारे खेटे कमी व्हावेत, या उद्देशाने तालुकापातळीवर गट विकास अधिकारी (BDO) आणि जिल्हास्तरावर खातेप्रमुखांना आता पुन्हा एकदा सिईंओंचे काही अधिकार प्रदान केले जाणार आहेत. याबाबतचा निर्णय सिईओ आयुष प्रसाद यांनी शुक्रवारी (ता.२१) घेतला आहे. (Pune Jilha Parishad)

आयुष प्रसाद यांनीच याआधी २५ जानेवारी २०२१ रोजी एका आदेशाद्वारे हे अधिकार रद्द केले होते. या आदेशामुळे सर्व अधिकार पुन्हा सीईओंकडे केंद्रित झाले होते. परिणामी खातेप्रमुख आणि गट विकास अधिकारी केवळ नामधारी झाले होते. मात्र प्रसाद यांनी आता त्यांचा अधिकार केंद्रीकरणाचा निर्णय रद्द करुन पुन्हा त्यांच्या अधिकारांचे विकेंद्रीकरण केले आहे.

या प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांमध्ये आर्थिक, आस्थापनाविषयक आणि कारवाईबाबतच्या अधिकारांचा समावेश आहे. यामुळे आता पुन्हा ग्रामपंचायतींची लेखा परीक्षणविषयकचे सर्व अधिकार, कर्मचाऱ्यांची वैद्यकीय देयके, रजा, कामात चुक करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर निलंबन किंवा सक्तीच्या रजेची कारवाई करण्याबाबतचे अधिकार खातेप्रमुख आणि बिडीओंना मिळाले आहेत. परिणामी कर्मचाऱ्यांना अगदी ५० हजार रुपयांपर्यंतच्या वैद्यकीय देयकासाठीही सिईओंकडे मारावे लागणारे खेटेही आता बंद होणार आहेत.

पुणे जिल्हा परिषदेच्या तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही. राधा यांनी पहिल्यांदा २००१ मध्ये सिईओंचे काही अधिकार जिल्हास्तरावर खातेप्रमुख आणि तालुकास्तरावर गट विकास अधिकाऱ्यांना प्रदान केले होते. सन २००१ पासून जानेवारी २०२१ पर्यंत विविध मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी याबाबतचे वेगवेगळे १५ आदेश काढले होते. हे सर्व आदेश आयुष प्रसाद यांनी २५ जानेवारी २०२१ ला रद्द केले होते.

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांचे कार्यालयीन कामकाज सोईचे व्हावे, या उद्देशाने महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ मधील नियम ९५ अनुसार हे अधिकार पुन्हा एकदा खातेप्रमुख आणि गट विकास अधिकाऱ्यांना प्रदान करण्यात आल्याचे आयुष प्रसाद यांनी शुक्रवारी (ता. २१) सांगितले.

सिईओंचे कोणते अधिकार खातेप्रमुखांना देण्यात आलेले आहेत, याचा आढावा घेणे, त्यात सुधारणा करणे आणि काही ठिकाणी या अधिकारांचा गैरवापर होत असल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे केवळ तात्पुरते हे अधिकार रद्द करण्यात आले होते. पण आता ते पुन्हा प्रदान केले आहेत.

-आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाख देणार; मुख्यमंत्री शिंदेंचा आमदार बरळला

SIM Card Rules : दूरसंचार विभागाने लागू केले सिम कार्ड खरेदीचे नवे नियम; लगेच करून घ्या ई-KYC, सोपी प्रोसेस एका क्लिकमध्ये..

'कोल्हापूर-पुणे वंदे भारत'चे वेळापत्रक जारी; कशी करता येईल Online Booking, कुठे असणार थांबा? जाणून घ्या..

Aditi -Siddharth Wedding : प्रेम जे कधीच संपणार नाही...अखेर अदिती -सिध्दार्थने बांधली लग्नगाठ ; साध्या पद्धतीत पार पडला विवाहाचा थाट

Sharad Pawar Letter: 32 लाख उमेदवारांसाठी शरद पवार मैदानात, CM एकनाथ शिंदे यांना कशासाठी लिहिले पत्र?

SCROLL FOR NEXT