pune zp sakal
पुणे

ZP Recruitment : झेडपी नोकरीसाठी अर्जाचा आज शेवटचा दिवस

पुणे जिल्हा परिषदेतील नोकर भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी इच्छुकांना अर्ज करण्यासाठी आता अवघा एक दिवस उरला आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - पुणे जिल्हा परिषदेतील नोकर भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी इच्छुकांना अर्ज करण्यासाठी आता अवघा एक दिवस उरला आहे. यानुसार यासाठी इच्छुकांना येत्या शुक्रवारपर्यंत (ता. २५) ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.

या भरतीसाठी घेण्यात येणाऱ्या लेखी परीक्षेसाठी ऑनलाइन पद्धतीने करावयाच्या अर्जासोबत कोणतीही कागदपत्रे जोडण्याची गरज नसून, केवळ दिलेल्या मुदतीत अर्ज आणि लेखी परीक्षेचे शुल्क भरणे अनिवार्य आहे. या भरतीसाठी २०० गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे.

या भरती प्रक्रियेत जिल्हा परिषदेतील विविध संवर्गातील १ हजार रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यामध्ये सर्वाधिक ४३६ महिला आरोग्य सेवकांच्या तर, सर्वांत कमी म्हणजे केवळ १ जागा रिगमनची (दोरखंडवाला) जागा भरली जाणार आहे.

रिक्त जागांमध्ये प्रामुख्याने आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सेवक, औषध निर्माण अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, कंत्राटी ग्रामसेवक, कनिष्ठ अभियंता कनिष्ठ लेखाधिकारी, वरिष्ठ सहायक, कनिष्ठ सहायक, विस्तार अधिकारी आदी विविध संवर्गातील पदांचा समावेश आहे.

लेखी परीक्षेच्या अभ्यासक्रमाचे स्वरूप

या भरती प्रक्रियेत पात्र उमेदवारांची निवड करण्यासाठी प्रत्येकी एकूण २०० गुणांची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. लेखी परीक्षेसाठी मराठी भाषा, इंग्रजी भाषा, सामान्य ज्ञान (जनरल नॉलेज), बुद्धिमापन चाचणी व गणित आदी विषयांवर आधारित आणि संबंधित पदाच्या अर्हतेनुसार तांत्रिक प्रश्‍न विचारले जाणार आहेत.

यासाठी प्रत्येकी दोन गुणांचे एकूण १०० प्रश्‍न विचारले जाणार आहेत. या एकूण प्रश्‍नांपैकी मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बुद्धिमापन (गणितासह) या विषयांवरील प्रत्येकी १५ आणि तांत्रिक विषयातील ४० प्रश्‍न विचारले जाणार आहेत.

ऑनलाइन अर्ज कोठे कराल?

या कर्मचारी भरतीच्या लेखी परीक्षेसाठी https:ibpsonline.ibps.in/zpvpiun23/ या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन अर्ज करावेत. परीक्षेसाठीच्या अधिक माहितीसाठी पुणे जिल्हा परिषदेच्या www.zppune.org या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गावडे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मालाडमध्ये भाजपाचे उमेदवार विनोद शेलार आघाडीवर

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: राहुरी विधानसभा मतदारसंघात प्राजक्त तनपुरे ३४९ मतांनी आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Maharashtra Assembly 2024 Result : फडणवीस की पटोले; ठाकरे की शिंदे; काका की पुतण्या? इथे पाहा सर्वांत वेगवान आणि अचूक निकाल LIVE Video

SCROLL FOR NEXT