zp schools esakal
पुणे

Pune News : जिल्हा परिषदेच्या मुख्याध्यापकांच्या रिक्त जागांची संख्या वाढली

सकाळ वृत्तसेवा

पुणे - जिल्हा परिषदेच्या शाळांवरील मुख्याध्यापकांची रिक्त पदे भरण्यासाठी मुख्याध्याकपदी पदोन्नती देण्यासाठीची प्रक्रिया मागील पाच वर्षांपासून रखडली आहे. यामुळे सद्यःस्थितीत पुणे जिल्ह्यातील सुमारे तीनशे शाळांवरील मुख्याध्यापकांची पदे रिक्त झाली आहेत. या रिक्त पदांवर सध्या संबंधित शाळांवरील सेवाज्येष्ठतेनुसार ज्येष्ठ असलेले उपशिक्षकच प्रभारी मुख्याध्यापक म्हणून काम पाहत आहेत. याचा परिणाम शैक्षणिक गुणवत्तेवर होऊ लागला आहे. गाला आहे.

जिल्हा परिषद शाळेतील उपशिक्षकाचे मुख्य काम हे विद्यार्थ्यांना शिकविण्याचे असते. मुख्याध्यापकांच्या खांद्यावर प्रशासकीय कामाचे मोठे ओझे असते. त्यामुळे मुळचा उपशिक्षक हा प्रभारी मुख्याध्यापक म्हणून काम करत असल्यास, त्याच्याकडील प्रशासकीय बोजामुळे तो विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी वेळ देऊ शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे.

त्यामुळे प्रभारी मुख्याध्यापकांना त्यांचे मूळ काम करता यावे, यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने मुख्याध्यापकांच्या रिक्त जागा त्वरित पदोन्नतीने भराव्यात, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाचे राज्य अध्यक्ष गौतम कांबळे यांनी केली आहे.

यासाठी आपसी जिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांची सेवा ज्येष्ठता यादी जाहीर करावी, विषयनिहाय गरजेपेक्षा जास्त झालेल्या आणि मागणी असलेल्या पदवीधर शिक्षकांना पदावन्नत करून, त्यांची पुन्हा उपशिक्षकपदी नियुक्ती करावी, जिल्हा बदलीने आलेल्या सर्व शिक्षकांची जिल्हा परिषदेमध्ये रुजू झालेली तारीख हीच शाळेवर रुजू झाल्याची तारीख ग्राह्य धरण्यात यावी, आंतरजिल्हा व जिल्हांतर्गत शिक्षक बदली प्रक्रियेत शिक्षकांवर अन्याय होऊ नये, याची खबरदारी घ्यावी आदी मागण्या कांबळे यांनी केल्या आहेत.

पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या ३ हजार ७१७ आहेत. यापैकी इयत्ता सातवीपर्यंत वर्ग असलेल्या ७५० शाळांचा समावेश आहे. उर्वरित शाळांपैकी सुमारे ५० शाळांमध्ये शिक्षण हक्क कायद्यातील तरतुदीनुसार इयत्ता पाचवी आणि आठवीचे वर्ग सुरु झालेले आहेत. याव्यतिरिक्त अन्य सर्व शाळांमध्ये इयत्ता चौथीपर्यंतचे वर्ग आहेत. जिल्ह्यातील एकूण शाळांपैकी निम्म्ह्याहून अधिक प्राथमिक शाळा या द्विशिक्षकी आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baba Siddique Murder Case: बाबा सिद्दीकींच्या हत्येमागे नेमकं कारण काय? भुजबळ म्हणाले, "मला तर वाटतेय..."

Who Killed Baba Siddique: 2019 मध्ये हत्या, तुरुंगात बिश्नोई गँगशी ओळख अन् मुंबईत गोळीबार... कोण आहे बाबा सिद्दीकींची हत्या करणारा कर्नेल सिंग?

गोफण | आमच्याही पक्षात कलाकार पाहिजे!

On This Day: भारताने २०१९ साली कसोटी क्रिकेटमध्ये केला होता हा विक्रम; ऑस्ट्रेलियाला टाकले होते मागे

Jupiter Red Spot : गुरू ग्रहावरच्या 'रेड स्पॉट'मध्ये दिसली अनोखी हालचाल, शास्त्रज्ञही आश्चर्यचकित,नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT